- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
जव्हार प्रतिनिधी, ग्रामसंवाद सरपंच संघाच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी निलेश भोये यांची निवड, ग्रामसंवाद सरपंच संघाच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी जुनी जव्हार ग्रामपंचायतीचे युवा सरपंच निलेश भोये यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती संघाचे प्रदेशाध्यक्ष अजिनाथ धामणे यांच्या हस्ते करण्यात आली.ग्रामसंवाद सरपंच संघ हे राज्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले एक प्रभावी संघटन आहे. सरपंच,उपसरपंच व सदस्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून देत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी गावपातळीवर प्रभावीपणे करण्याचा संघाचा मुख्य उद्देश आहे.नवनियुक्त पालघर जिल्हाध्यक्ष निलेश भोये,हे आदिवासी आणि दुर्गम भाग असलेल्या जव्हार तालुक्यातील जुनी जव्हार ग्रामपंचायतीचे सरपंच असून त्यांनी आतापर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत.शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी…
सुरेश काटे,तलासरी, तलासरीच्या कुर्झे धरणक्षेत्रात दुर्मिळ पक्षांचे वास्तव्य, पालघर जिल्ह्याला सध्या पक्षांचे वैभव लाभले आहे. समुद्र किनारा,खाडीपट्टा खारफुटीचा प्रवेश,मिठागरे, भातशेती,शहरी भाग,आर्द्र व मिश्र पानगळीचे जंगल येथे विविध पक्षी आले आहेत. त्यामुळे येथे पक्ष्यांची विविधता ही मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. दरवषी थंडी पडू लागली की येथे मोठ्या प्रमाणात परदेशातील पाहुणे स्थलांतर करून या भागात येतात.सध्या तलासरी तालुक्यातील कुर्झे धरण परिसरात पाहुण्या पक्ष्यांची वर्दळ वाढली आहे.विहार करणाऱ्या रंगीबेरंगी विविध जातीच्या आकर्षक पक्ष्यांच्या मनमोहक हालचाली पाहण्यासाठी परिसरात पक्षीप्रेमी येत आहेत.कुर्झे धरण परिसरात हिवाळी हंगामात विविध स्थलांतरीत पक्षांची गर्दी वाढते,त्यामध्ये जलचर पक्षांची संख्या अधिक असते.हिवाळ्याचा हंगाम अंतिम टप्यात आला असूनही पाहुणे पक्ष्यांचा मुकाम धरण…
अनंत भोईर,पालघर, ३० जाने.ते १ फेब्रु.दरम्यान ” पालघर सरस,” चे आयोजन, पालघर राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा परिषद पालघर व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर सरस २०२४ -२५ येत्या ३० जाने.ते १ फेब्रु.या काळात पार पडणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी व स्वयंसहायता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पालघर जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन दरवर्षी राबवण्यात येते.यावर्षीही आर्यन हायस्कूल मैदान,पालघर येथे ३० जाने.ते १ फेब्रु.या काळात ” सरस भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव,”संपन्न होणार आहे. जिल्हाभरातील ४५ महिला गट या प्रदर्शनामध्ये सहभागी होणार असून खानावळ आणि इतर वस्तूंची…
वसंत भोईर,वाडा कुडूस येथे श्रीराम सेवा संस्थेतर्फे कलश व भव्य शोभायात्रेचे आयोजन, तालुक्यातील कुडूस येथे श्रीराम सेवा संस्थेतर्फे श्रीराम मंदीर स्थापना दिनाचे औचित्य साधून कलश व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या यात्रेत कुडूस व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यात महीला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. गेल्या वर्षी २२ जाने.२४ रोजी रोजी आयोध्या येथे रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.देशभरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण तयार झाले होते.या दिनाचे औचित्य साधून ही शोभायात्रा काढण्यात आली असल्याचे श्रीराम सेवा संस्थेचे अध्यक्ष दिनेश पांडेय यांनी सांगीतले. या निमित्ताने श्रीराम संस्थेच्या वतीने कुडूस येथे २२ ते ३० जाने.संध्याकाळी ७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत राम…
संजय लांडगे,वाडा, सरपंच अवनी सांबरे प्रजासत्ताक दिनी जाणार दिल्लीला, वाडा तालुक्यातील हमरापुर ग्रामपंचायतच्या सरपंच अवनी सांबरे प्रजासत्ताक दिनी दिल्लीला जाणार आहेत. पालघर जिल्ह्यात हमरापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच सांबरे यांना हा मान मिळाला आहे.नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून ग्रामपंचायतीच्या सरपंच अवनी अजय सांबरे व त्यांचे पती अजय गजानन सांबरे सांबरे यांना आमंत्रित केले आहे.यासंदर्भात नुकतेच पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरपंच यांना पत्र पाठवले आहे. यावर्षी दिल्ली येथे संपन्न होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडकरीता जिल्ह्यातून हमरापूर ग्रामपंचायतची निवड करण्यात आली आहे.या ग्रामपंचायतीला प्रथमच मान मिळाला असून नवी दिल्ली येथे भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये उपस्थित राहण्यासाठी राज्यातून प्रत्येक…
वसंत भोईर,वाडा, आबिटघर येथे महिलांचा भव्य मेळावा, माध्यमिक विद्यालय आबिटघर येथे महिलांसाठी विशेष मेळावा आयोजित करण्यात आला होता.महिला आणि बालकल्याण समिती सभापती रोहीणी शेलार,सभापती पं.स.वाडा, अश्विनी लहांगे जि.प.सदस्या, भक्ती वलटे,उपसभापती जगदीश पाटील,पं.स.सदस्य शांताराम माळी,अमोल पाटील,सागर ठाकरे,अस्मिता बिर्जे ( बालविकास प्रकल्प अधिकारी ) यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी विशेष रंगत आणली.कायदेविषयक मार्गदर्शन,बाळंत विडा किट वाटप,आरोग्य तपासणी, हळदीकुंकू समारंभ, स्त्रीभ्रूणहत्या व बालविवाहावर आधारित नाटिका,आहार प्रदर्शन,रांगोळी प्रदर्शन आणि पूर्व प्राथमिक शिक्षण स्टॉल यांचा समावेश होता. यावेळी दिलीप माने (महिला समुपदेशक), गायकर (आस्था फाउंडेशन ), सपना पाटील, उत्कर्षा मॅडम ( लर्निंग स्पेस…
सुलभा रानडे,रत्नागिरी, मिरकरवाडा बंदरातील ३०० अनधिकृत बांधकामांवर पडणार हातोडा, जिल्ह्यातील मिरकरवाडा बंदर परिसरात फोफावलेल्या अनधिकृत बांधकामावर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे.बंदराच्या विकासाच्या कामात अडथळा येऊ नये,यासाठी संबधित व्यक्तींना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मिरकरवाडा बंदराच्या ११ हे.जमिनीवर कोट्यवधी रु.खर्च करून बंदर नव्याने विकसित करण्यात येत आहे.नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या सुसज्ज अशा या बंदरात ३०० ट्रॉलर्स व २०० पर्ससीन नौका,अशा एकूण ५०० नौका उभ्या राहू शकतील.या बंदराच्या विकासासाठी आर्थिक निधीही मंजूर करण्यात आला आहे.त्यासाठी आवश्यक ती जमीन मोकळी करून देणे आवश्यक आहे.सध्या या जमिनीवर ३०० हुन अधिक अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली आहेत.त्यामध्ये माशांची जाळी,नौकाचे सामान,सुकी मच्छी,तसेच माशांची खरेदी-विक्री केंद्र याचा…
नवीन पाटील,सफाळे, बोईसर येथे पांचाळ महिला मंडळातर्फे कॅन्सर विषयक मार्गदर्शन, बोईसर महिला मंडळातर्फे मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी-कुंकू समारंभ साजरा करण्यात आला.यावेळी रोटरी क्लब ऑफ बोईसर,डॉ. सोनम खंदेजोड यांनी उपस्थित महिलांना ब्रेस्ट कँसर विषयी विशेष माहिती देऊन मार्गदर्शन केले. पौष महिन्यात येणारी संक्रात ही लहान मुलं,नवं वधू-वर तसेच महिला वर्गासाठी एकमेकांच्या भेटीची,दागिने घालून नटण्याची व तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणत आनंद साजरा करण्याची संधी घेऊन येत असते. मैत्री व स्नेहपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी संक्रातीच्या निमित्ताने एकमेकींना वाण देण्याची प्रथा देखील आपल्या कडे आहे.हीच प्रथा कायम ठेवत,आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांचे आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष व कॅन्सरचे वाढते प्रमाण पाहता याबद्दल महिलांमध्ये जागृती…
अनिल वैद्य,नाशिक, नाशिक येथे भारतीय लष्कराचे सामर्थ्य दाखवणारी प्रात्यक्षिके, भारतीय लष्कराच्या तोफखाना दलाच्या विविध तोफांनी आज नाशिकच्या देवळाली यांच्या फायरिंग रेंजमध्ये विविध लक्ष्यावर अचूक निशाणा साधत शत्रूच्या वरात धडकी भरवणाऱ्या भारतीय लष्कराच्या शक्तीचे प्रदर्शन घडवले.भारतीय सैन्य दलातील महत्त्वाचा भाग असलेल्या तोफखाना दलाचे प्रात्यक्षिके आज नाशिक मधील देवळाली फायरिंग रेंजमध्ये झाली.अतिविशिष्ट सेवा मेडल प्राप्त कमांडेड स्कूल ऑफ आर्टिलरी लेफ्टनंट जनरल नवनीतसिंह सरना यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तोफखाना दलाच्या विविध लक्ष्यावर अचूक मारा करत आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन घडवले.या प्रात्यक्षिकात लष्करात कार्यरत असलेल्या चित्ता चेतक या हेलिकॉप्टर्स तसेच नाईन पॅराशुट फिल्ड रेजिमेंटच्या पॅरोट सहभागी झाले होते.या प्रात्यक्षिकाबरोबर फायरिंग रेंजच्या परिसरात तोफा आणि विविध…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” नव्या नवरीची नऊ दिवसाची नवलाई,” संपवून आता कामाला लागा…. विधानसभा निवडणूक होऊन आता दोन महिन्याचा काळ लोटला आहे.” नव्या नवरीची नऊ दिवसाची नवलाई,” संपवून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी कामाला लागायला हवे.आतापर्यंत सत्कार व सोहळे उदंड झाले,निवडणुकीच्या काळात आपण रयतेला जी आश्वासने दिली,त्याची पूर्तता करण्यासाठी आता पावले उचलण्याची गरज आहे.तत्कालीन लोकप्रतिनिधीच्या कारभारावर ताशेरे ओढत आपण निवडून आलो,आता आपली जबाबदारी आहे की आपण जी आश्वासने रयतेला दिली,त्याला आता न्याय दिला पाहिजे. पालघर जिल्हा हा सर्वसमावेशक,असा जिल्हा आहे.या जिल्ह्यात आदिवासी,कुणबी,आगरी,भंडारी,कोळी-मांगेला, ख्रिस्ती,गुजराती,उत्तर भारतीय व अन्य समाज, असे अठरापगड जाती-धर्माचे लोक वर्षानुवर्षे राहत आहेत.२०१४ साली ठाणे जिल्ह्याचे विभाजन करुन नव्याने पालघर जिल्हा…
