जव्हार प्रतिनिधी,
ग्रामसंवाद सरपंच संघाच्या पालघर जिल्हाध्यक्षपदी निलेश भोये यांची निवड,
ग्रामसंवाद सरपंच संघाच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी जुनी जव्हार ग्रामपंचायतीचे युवा सरपंच निलेश भोये यांची निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती संघाचे प्रदेशाध्यक्ष अजिनाथ धामणे यांच्या हस्ते करण्यात आली.ग्रामसंवाद सरपंच संघ हे राज्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले एक प्रभावी संघटन आहे.
सरपंच,उपसरपंच व सदस्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून देत शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी गावपातळीवर प्रभावीपणे करण्याचा संघाचा मुख्य उद्देश आहे.नवनियुक्त पालघर जिल्हाध्यक्ष निलेश भोये,हे आदिवासी आणि दुर्गम भाग असलेल्या जव्हार तालुक्यातील जुनी जव्हार ग्रामपंचायतीचे सरपंच असून त्यांनी आतापर्यंत आपल्या कार्यक्षेत्रात अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत.शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी नेतृत्व केले असून अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभागी झाले होते.तसेच, त्यांनी जुनी जव्हार ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामे व योजना प्रभावीपणे राबवून गावातील सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासाचा लाभ पोहोचवला आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना अधिक सक्षम व स्वायत्त करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

