- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
अनिल वैद्य,नाशिक, तृणधान्याचे महत्व लोकाभिमूख होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार- कृषीमंत्री कोकाटे, नाशिक,तृणधान्यांमधील पोषणमुल्यांमुळे त्यांचे आहारातील आरोग्यविषयक महत्व अनन्यसाधारण आहे.हे लक्षात घेवून नागरिकांनी दैनंदिन आहारात तृणधान्यांचा समावेश वाढवणे आवश्यक आहे.तृणधान्याचे महत्व अधिक लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने तसेच जिल्हा व तालुकास्तरावर तृणधान्य उत्पादक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील,असे प्रतिपादन कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी केले. कृषी पणन मंडळाचे विभागीय कार्यालय नाशिक यांच्यातर्फे उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालय गंगापूर रोड,नाशिक येथे आयोजित ” मिलेट महोत्सव-२०२5,” कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी,महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणेचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे,कृषी पणन मंडळ विभागीय कार्यालय नाशिकचे उपसरव्यवस्थापक एस.वाय. पुरी,कृषी महाविद्यालयाचे…
अनिकेत मेहेर,डहाणू, अशोक धोडी यांची कार गुजरात राज्यातील भिलाड येथे दगडखाणीच्या तलावात सापडली, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे डहाणू तालुका संघटक हे गेल्या अकरा दिवसापासून बेपत्ता होते.पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर आज त्यांची कार गुजरातच्या भिलाड गावातील दगडखाणीच्या तलावात सापडली आहॆ.ती कार बाहेर काढण्याचे काम पोलिसाकडून सुरु आहे. ही कार बाहेर काढल्यानंतर अशोक धोडी यांचे नेमके काय झाले हे स्पष्ट होईल. गेल्या २० जाने.रोजी सांयकाळी अशोक धोडी यांचे अपहरण करण्यात आले होते.त्या दिवशी त्यांनी आपण डहाणू येथून घरी येत असल्याचे आपल्या पत्नीला कळवले होते.त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला होता. त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर पोलीसानी सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली.सीसीटीव्ही तपासल्यानंतर त्यांची गाडी गुजरातच्या…
मनिष धानू,डहाणू, डहाणू फेस्टिवलला ५ लाख नागरिक भेट देतील – पालकमंत्री नाईक, डहाणू महोत्सवाचे यंदाचे हे तिसरे वर्ष असून पहिल्या वर्षी दीड लाख नागरिकानी या फेस्टिवलला भेट दिली होती.दुसऱ्या वर्षी ही संख्या दुपट्टीने वाढली होती.यावर्षी पाच लाख नागरिक,या महोत्सवामध्ये सहभागी होतील,असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी उदघाटन प्रसंगी व्यक्त केला. ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले,डहाणू तालुका हा चिकूसाठी जगप्रसिद्ध आहे.तसेच या डहाणू महोत्सवाला जिल्ह्यातील जनसामान्यांचा मोठा पाठिंबा मिळणार असून हा जिल्हा आणि आसपासच्या परिसराची ओळख ही चौथी मुंबई म्हणून होणार आहे. डहाणू येथील सिव्यू पार्क,डहाणू-आगर रोड येथे डहाणू नगरपरिषद यांच्यातर्फे आयोजित डहाणू पर्यटन महोत्सव ३.० उद्घाटन…
दीपक मोहिते, संवेदना, रेल्वे अधिकाऱ्याकडून जिल्ह्यातील कोकणवासीयांना सावत्रपणाची वागणूक, वसईहुन थेट सावंतवाडी अशी गाडी सुरू करा,अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून डहाणू-भाईंदर परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांनी लावून धरली आहे.पण रेल्वे बोर्ड त्यांच्या या मागणीला सातत्याने केराची टोपली दाखवत आहे.वसई,मीरा- भाईंदर,पालघर व डहाणू या चार तालुक्यात सुमारे १० ते १५ लाख कोकणवासीय नागरिक राहत आहेत. सध्या या मार्गावर दररोज चार ते पाच गाड्या सावंतवाडीला येजा करत असतात,पण या गाड्यामध्ये वसई पालघर व डहाणू येथील प्रवाशांसाठी पुरेसा आरक्षण कोटा नसल्यामुळे त्यांचे मोठ्याप्रमाणात हाल होत असतात.या सर्व गाड्या इतर राज्यातून येत असतात,त्यामुळे येथील प्रवाशांना पुरेसे आरक्षण मिळत नाही.त्यामुळे त्यांना महागड्या खाजगी बसेसचा पर्याय स्विकारावा लागतो.अशावेळी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ईडीच्या जाळ्यात वसई – विरार भागातील बडे मासे गावणार ? वसई विरार भागातील काही लोकप्रतिनिधी,बांधकाम विकासक,महानगर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी व बांधकाम/ पाणीपुरवठा कंत्राटदार ईडीच्या रडारवर असून या सर्वांना ईडीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.महानगरपालिकेत काही वर्षांपासून सुरू असलेला भ्रष्टाचार ( १२२ कोटी रु.) पाणीपुरवठा व बांधकाम विभागात लोकप्रतिनिधी व एका अधिकाऱ्यांकडून झालेला प्रचंड भ्रष्टाचार,तसेच ज्या बिल्डर्स व लोकप्रतिनिधींनी वाधवान बांधकाम समूहाशी आर्थिक व्यवहार केले आहेत,ते सारे आता ईडीच्या रडारवर आले आहेत.लवकरच या सगळ्यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात येणार असल्याचे कळते. अडीच वर्षांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पहाटेच्या सुमारास एका उद्योग समूहावर धाड टाकली होती.आता महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा ईडीने डोकं…
दीपक मोहिते, ” उपरती,” राज ठाकरे यांनी आत्मचिंतन करायला हवं, विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे शल्य अद्याप टोचत असल्यामुळे काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार व विरोधी पक्षांवर गरळ ओकली.ते पक्षाच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.यावेळी त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर कडाडून हल्ला चढवला.अनेक उदाहरणे देत त्यांनी महायुतीच्या विजयाचे वाभाडे काढले.पण या मेळाव्यात उत्साह व जोश याचा अभाव होता. यावेळी केलेल्या भाषणात ते पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणाऱ्या अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत ४१ जागा मिळतात,यावर विश्वास तरी कसा ठेवायचा ? निवडून आलेल्या त्यांच्या आमदारांनाही अद्याप आपण विजयी झालो आहोत,यावर विश्वास बसलेला नाही.त्यांच्या या बोलण्यातून निवडणूक प्रक्रियेत फार मोठी…
संजय लांडगे,वाडा, वाडा येथे जनसंवाद अभियानाचा अनोखा उपक्रम, वाडा तालुक्यातील कुडूस येथील नॅशनल कॉलेज व ह.वि.पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रोजेक्टरचा वापर करून विद्यार्थ्यांना सायबर क्राईम प्रतिबंधक उपायाबाबत लघू चित्रफीत दाखवत माहिती दिली आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्याभरात जनसंवाद अभियान अंतर्गत शाळकरी मूले,मुली,महिला,कामगार व जेष्ठ नागरिक,अशा सर्व घटकांना नवीन कायद्यांची माहिती देण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले आहॆ. त्या अनुषंगाने आज कुडूस व चिंचघर येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरद्वारे सायबर क्राईम प्रतिबंधक उपायाबाबत लघू चित्रफीत दाखवत माहिती दिली आहे. नविन कायद्याविषयी जनजागृती केली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिते व पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी मोकळे पणाने…
दीपक मोहिते, आत्मपरीक्षण गरजेचे, पक्षप्रमुखांच्या जवळच्या गोतावळ्यातील लोकांमुळे अनेक राजकीय पक्षाची वाताहत, विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला जोरदार गळती लागली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसला ( शरद पवार ) लागलेल्या गळतीचे प्रमाण मर्यादित असले तरी शिवसेना ( उबठा ) गट मात्र गळतीमुळे दिवसेंदिवस क्षीण होत चालला आहे.ही गळती रोखणे,दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनाही शक्य नाही. शिवसेनेत असलेले अंतर्गत वाद व उद्धव ठाकरे यांच्या अवतीभवती असलेले भाट यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते आता पक्षापासून दुरावू लागले आहेत.मुंबई,ठाणे अहिल्यानगर य जिल्ह्यातील अनेक नगरसेवक पदाधिकारी व शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत.आजच्या घडीला महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटालाही फारसे महत्व उरलेले…
दीपक मोहिते, ४१ अनधिकृत इमारती : अनधिकृत बांधकामे करणारे व मनपा अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त करा – आम आदमी पार्टी, नालासोपारा पूर्व भागात ४१ अनधिकृत इमारती बांधून रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या २०० कुटुंबाच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करा.तसेच या अनधिकृत इमारती उभारणारा समाजकंटक व मनपा अधिकाऱ्यांची मालमत्ता जप्त करा,अशी मागणी आम आदमी पार्टीचे पालघर जिल्हाध्यक्ष जॉन परेरा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहॆ. सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नालासोपारा पूर्व आचोळे येथील ४१ इमारती तोडण्याची कारवाई,वसई विरार शहर महानगरपालिकेने सुरू केली आहे व ती ३१ जाने.२०२५ पर्यंत पूर्ण करावयाची आहे. ही अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी महानगरपालिकेने आपली यंत्रणा पूर्ण ताकदिनीशी वापरण्यास सुरुवात…
दीपक मोहिते, जिल्ह्यात शासकीय कृषी व मत्स्य महाविद्यालय सुरू होणार – माजी आ.राजेश पाटील, पालघर जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात असलेले शासकीय कृषी आणि शासकीय मत्स्य महाविद्यालय लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी माजी आ.राजेश पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची २८ जाने.रोजी मंत्रालयात भेट घेतली.यावेळी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे सिनेट सदस्य विनायक काशिद उपस्थित होते. पालघर जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांसाठी संशोधन केंद्रे आणि कृषी क्षेत्रातील नवनवीन कल्पना विकसित करण्यावर या चर्चेत विशेष भर देण्यात आला. वसईची प्रसिद्ध केळी,जुनी लाल केळी,सफेद वेलची,आणि मोगरा यांसारख्या पिकांसाठी विशेष संशोधन व मार्गदर्शन केंद्रे स्थापन करण्यावर चर्चा झाली. शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला चालना…
