संजय लांडगे,वाडा,
वाडा येथे जनसंवाद अभियानाचा अनोखा उपक्रम,
वाडा तालुक्यातील कुडूस येथील नॅशनल कॉलेज व ह.वि.पाटील कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रोजेक्टरचा वापर करून विद्यार्थ्यांना सायबर क्राईम प्रतिबंधक उपायाबाबत लघू चित्रफीत दाखवत माहिती दिली आहे.
पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्याभरात जनसंवाद अभियान अंतर्गत शाळकरी मूले,मुली,महिला,कामगार व जेष्ठ नागरिक,अशा सर्व घटकांना नवीन कायद्यांची माहिती देण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले आहॆ.
त्या अनुषंगाने आज कुडूस व चिंचघर येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरद्वारे
सायबर क्राईम प्रतिबंधक उपायाबाबत लघू चित्रफीत दाखवत माहिती दिली आहे. नविन कायद्याविषयी जनजागृती केली.यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गिते व पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी मोकळे पणाने विद्यार्थ्यांशी संवाद साधला व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. तर ऍड.तृप्ती पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.याप्रसंगी मंचावर सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पदाधिकारी,शिक्षक व पालक तर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

