- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
जव्हार,प्रतिनिधी, कौलाळे गटात रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार, तालुक्यातील कौलाळे गटात एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तीन जिल्ह्यातील स्पर्धकांनी हजेरी लावली होती.तर पंचक्रोशीतील दोन हजार शेतकऱ्यांनी मनसोक्तपणे स्पर्धेचा आनंद घेतला.गेल्या तीन वर्षांपासून न्यायालयाने बंदी हटवल्याने महाराष्ट्रामध्ये पुन्हा बैलगाडा शर्यती जोमात सुरू झाल्या आहेत.या निर्णयानंतर गेल्या तीन वर्षांपासून पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुकाच्या गारादेवी मैदानावर पुन्हा एकदा शर्यतीचा थरार बघायला मिळाला. दरम्यान झाप ग्रामपंचायत सरपंच व बहुजन विकास आघाडी पक्षाचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांच्या संकल्पनेतून काल कौलाळे गटात बैलगाडा शर्यत आयोजीत करण्यात आली होती.यासाठी पालघर, ठाणे व नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी आपली बैल जोडी…
सुरेश काटे,तलासरी, विभागीय क्रीडा स्पर्धेत झरी शाळेची उत्तुंग भरारी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल शेंडेगाव,शहापूर येथे आदिवासी विकास विभागांतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा,२७ ते २९डिसें.या कालावधीत पार पडल्या. स्पर्धेत ठाणे विभागातून डहाणू,घोडेगाव, पेण,जव्हार,शहापूर,सोलापूर हे सहा प्रकल्प सहभागी झाले होते. आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत डहाणू प्रकल्पाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक ७८ विद्यार्थी हे ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम विद्यालय,झरी तालुका तलासरी या शाळेचे असून झरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी डहाणू प्रकल्पातून सहभागी होऊन विविध क्रीडा प्रकारात उत्तुंग भरारी मारली. शाळेच्या प्राचार्या सि.बस्तियान फर्नांडीस,सर्व सहभागी विद्यार्थी,शिक्षकांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल ज्ञानमाता सदन संस्था तलासरी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,डहाणू यांच्याकडून तसेच…
नवीन पाटील, सफाळे, ३१ डिसें. सेलिब्रेशनसाठी केळवे बीच सज्ज… ३१ डिसे.साजरा करण्यासाठी पालघर तालुक्यातील केळवे बीचला पर्यटकांची पसंती मिळत असून मुंबई, ठाणे, गुजरात आदी भागातून शेकडो पर्यटक नव्या वर्षाच्या स्वागतासह गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी येथे मोठी गर्दी करणार आहेत.याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,यासाठी केळवे सागरी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. केळवारोड स्थानकाच्या पश्चिमकिनारपट्टी भागातील निसर्गरम्य आणि स्वच्छ व सुंदर समुद्र लाभलेल्या केळवे बीचला वर्षभर पर्यटकांची मोठी गर्दी होत असते.उद्या मंगळ.३१ डिसें.२०२४ या वर्षांचा शेवटचा दिवस असून दुसऱ्या दिवशी बुधवार आल्याने सरत्या वर्षाला गुड बाय व नव्या नवर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची थोडी अडचण…
वसंत भोईर,वाडा, दुधाला अनुदान मिळालं ; शेतकऱ्यांचे घर आनंदात न्हालं ! सहकारी दूध संघ, खाजगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी आधी प्रति लिटर पाच रु.तर नंतरच्या कालावधीत सात रु.चे अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागातर्फे राबवण्यात येत आहे.या अनुदानाचा लाभ तिमाही टप्प्यात मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या चढ-उतारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील सहकारी दूध उत्पादक संघ,खाजगी प्रकल्पांना गाईचे दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रु.अनुदान देण्याचा निर्णय ५ जाने.रोजी घेण्यात आला होता.त्यानंतर १ ऑक्टो.२०२४ पासून दोन रुपयांची वाढ करून आता सात रु.…
वसई कला क्रीडा महोत्सवाची स्मरणिका म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी उपयुक्त ठेवा — अंबरीश मिश्र गेली ३५ वर्षे सुरु असलेला वसई तालुका कला – क्रीडा महोत्सव,हा राज्यातील एकमेव महोत्सव असावा.३५ व्या महोत्सवा निमित्ताने तयार केलेली स्मरणिका म्हणजे येणाऱ्या पिढीसाठी उपयुक्त असा दस्तऐवज आहे.हितेंद्र ठाकूर यांच्या दूरदृष्टीमुळे हे शक्य झाले आहे.असे उदगार जेष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र यांनी स्मरणीका प्रकाशन समारंभात काढले,. वसई तालुका कला क्रिडा महोत्सवात ३५ व्या वर्षानिमित्त ” दृष्टिक्षेप, ” या स्मरणिकेचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र,यांच्या हस्ते आणि युवा नेते क्षितीज ठाकूर,डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे,प्रकाश वनमाळी, केवल वर्तक,यांच्या उपस्थितीत नरवीर चिमाजी आप्पा मैदानावरील रंगमंचावर करण्यात आले. मकरंद सावे,यांनी स्मरणिकेतील लेखांबद्दल…
दीपक मोहिते, क्रूरकर्मा अब्दुल रहमान नक्की,याचे पाकिस्तानात निधन, मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदचा मेहुणा व याकामी आर्थिक मदत करणारा लष्कर-ए-तय्यबाचा उपप्रमुख अब्दुल रहमान मक्की यांचे लाहोर येथे नुकतेच निधन झाले.गेल्या काही दिवसांपासून हा नक्की अथरुणांवर खिळला होता.मुंबई शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १७५ नागरिक मृत्युमुखी पडले तर ३०० जण गंभीर जखमी झाले होते.या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र समितीच्या सुरक्षा परिषदेने त्याला दहशतवादी घोषित केले होते.२०१९ मध्ये त्याला ३६ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ” काश्मीर जर पाकिस्तानला न दिल्यास भारतात रक्ताच्या नद्या वाहतील,” अशी त्याने भारताला धमकी दिली होती.दहशतवादी निर्माण करण्यासाठी सुमारे ४ लाख…
संदीप जाधव,बोईसर, तारापूर येथे रासायनिक कंपनीला भीषण आग ; अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू, तारापूर एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीला सायंकाळी भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.ही कंपनी स्टार्लिंग हॉटेलसमोर,प्लॉट नंबर के – ६ येथे आहे.आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमनदलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की,आग लागल्यानंतर कंपनीतून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता,जो दूरवरूनही दिसत होता. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक टीम काम करत आहेत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळाभोवती बंदोबस्त वाढवला असून परिसराला घेराव घातला आहे.सुदैवाने,या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती…
वसंत भोईर,वाडा, जयवंत वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडा येथे मल्टीस्किल प्रशिक्षण संपन्न, जयवंत दादा वाडेकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ( आदिवासी ),वाडा येथे प्रशिक्षणार्थींकरिता सहा दिवसांचे मल्टी स्किल प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. एशियन पेंट कंपनीच्या सामाजिक दायित्व उपक्रमातून संस्थेच्या ८० प्रशिक्षणार्थीना बेसिक पेंटिंग आणि प्लंबिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. २१ ते २६ ऑक्टो.२०२४ या कालावधीमध्ये पहिला टप्पा ४० प्रशिक्षणार्थी आणि २३ ते २८ डिसें.२०२४ या कालावधीत दुसऱ्या टप्पा ४० प्रशिक्षणार्थी,असे आयोजन होते.यामध्ये प्रशिक्षणार्थीना रंगकामाची प्राथमिक माहिती देण्यात आली.स्वच्छता करण्याकरताची साधने, अवजारे,त्यानंतर रंग देण्याकरिता वापरण्यात येणारी हत्यारे,अवजारे,ब्रश आणि रंगांचे विविध दर्जा नुसार करण्यात आलेले वर्गीकरण हे शिकवण्यात आले.प्रात्यक्षिकाचा भाग म्हणून संस्थेतील…
सद्दाम शेख,मोखाडा, महिलेचा मृत्यू,हा व्यवस्थेने घेतलेला बळी- माजी आ. सुनील भुसारा, मोखाडा तालुक्यातील कोलध्याचा पाडा येथे आशा भुसारा या महिलेच्या प्रसूती नंतर मृत्यू झाला.तिला उपचारासाठी मोखाडा ते जव्हार आणि जव्हार हून नाशिक असा प्रवास करावा लागला.त्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने हा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे तर आम्ही दोन दिवस अगोदर दाखल करूनही दिरंगाई केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. माजी आ.सुनील भुसारा यांनी या आज मयत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि सांत्वन केले.तसेच नातेवाईकांडून या घटनेची माहिती घेतली,यावेळी त्यांनी महिलेचा झालेला मृत्यू हा व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याचे सांगितले.या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक…
वसंत भोईर,वाडा, लाडक्या बहिणींना दिलासा,शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी ? राज्यातील नवीन सरकारने कारभाराला सुरुवात केली आहे.हिवाळी अधिवेशनही नुकतेच पार पडले.लाडक्या बहिणींना खात्यात डिसें.चा हप्ता येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता सरकारने जाहीररित्या दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार ?असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. महायुती सरकार राज्यात आल्यास २०१९ पासून ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे अशांची सरसकट कर्जमाफी करू,अशी घोषणा करण्यात आली होती.तसे घोषणापत्र सुद्धा भाजपतर्फे प्रसिद्धीस देण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.मात्र तसे झाले नाही, सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी जाहीर करून एकदाचा सातबारा कोरा करावा,अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्यात २००२ पासून…
