सुरेश काटे,तलासरी,
विभागीय क्रीडा स्पर्धेत झरी शाळेची उत्तुंग भरारी
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल शेंडेगाव,शहापूर येथे आदिवासी विकास विभागांतर्गत विभागीय क्रीडा स्पर्धा,२७ ते २९डिसें.या कालावधीत पार पडल्या. स्पर्धेत ठाणे विभागातून डहाणू,घोडेगाव, पेण,जव्हार,शहापूर,सोलापूर हे सहा प्रकल्प सहभागी झाले होते.
आदिवासी विकास विभाग ठाणे अंतर्गत डहाणू प्रकल्पाने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत चॅम्पियन ट्रॉफी पटकावली. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक ७८ विद्यार्थी हे ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम विद्यालय,झरी तालुका तलासरी या शाळेचे असून झरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी डहाणू प्रकल्पातून सहभागी होऊन विविध क्रीडा प्रकारात उत्तुंग भरारी मारली.
शाळेच्या प्राचार्या सि.बस्तियान फर्नांडीस,सर्व सहभागी विद्यार्थी,शिक्षकांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल ज्ञानमाता सदन संस्था तलासरी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,डहाणू यांच्याकडून तसेच सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

