- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, प्रादेशिक पक्ष संपवणे,हा भाजपचा छुपा अजेंडा… शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर गेल्या तेरा वर्षात भाजपने शिवसेनेला संपवण्याचे कसे प्रयत्न केले व त्यामध्ये ते कसे यशस्वी झाले ? यावर प्रकाश टाकल्यास भाजप प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठी कशी कटकारस्थाने करतो,हे दिसून येते.आप,तृणमूल काँग्रेस,शिवसेना,बसपा, समाजवादी पक्ष व ईशान्येकडील लहान पक्षापैकी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला ते धक्का देऊ शकले नाहीत.प्रादेशिक पक्षाशी सर्वप्रथम हातमिळवणी करून सत्तेत सहभागी व्हायचं आणि नंतर त्या प्रादेशिक पक्षाचे खच्चीकरण करायचे,अशी ही भाजपची मोडस ऑपरेंडी आहे.आंध्र प्रदेशमध्ये भाजपने माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस पार्टीला असंच संपवले.त्यासाठी त्यांनी तेलगू देशमच्या चंद्राबाबू नायडू यांना हाताशी धरले.बिहारमध्येही त्यांनी अशीच…
दीपक मोहिते, इतिहासाची मोडतोड, नितेश राणे यांना गडकरी,भागवत व बावनकुळे यांच्याकडून, ” घरचा आहेर,” काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैनात मुस्लीम मावळे नव्हते,असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं होतं.त्याचे राज्यभरात जोरदार पडसाद उमटत आहे.त्यांचे हे वक्तव्य भाजपच्या नेत्यांच्याही पचनी पडले नाही.तसेच अनेक इतिहास संशोधकांनी राणे यांचे विधान खोडून काढले आहेत. ” केंद्रीयमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी ” छत्रपती शिवाजी महाराज हे १०० % सेक्युलर होते,” गडकरी यांच्या विधानामुळे नितेश राणेंच्या त्या वक्तव्याची अक्षरश: पिसे निघाली. दिल्लीमधील एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलंय.त्यांच्या या वक्तव्याला भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही समर्थन दिलं.तर सरसंघाचलक मोहन भागवत यांनी छत्रपती…
सुशील भोईर,वसई कामणवासिय येत्या ९ एप्रिल रोजी आपल्या मागण्यासाठी आंदोलन छेडणार, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रिती दिनेश म्हात्रे,यांनी आपल्या प्रभागात भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महानगरपालिकेच्या ” जी,” प्रभाग समिती क्षेत्रात वॉर्ड क्र.८९ व परिसरातील कामण,देवदळ,कोल्ही, चिंचोटी,बापाणे,सातीवली, गिदराईपाडा या गावात गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत असुन या विषयी मनपा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने व तक्रारी अर्ज दिले.पण प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही.त्यामुळे आता आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहोत.६९ गावाची ग्रामीण पाणीपुरवठा योजना त्वरित सुरु करा,पाड्यापाड्यावर बोअरिंग मारा,परिसरातील विहिरीची स्वच्छता व दुरुस्ती करा, टँकरने पाणीपुरवठा सुरु करा,कामण येथे धूळ खात पडलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या पाणीपुरवठा…
शशिकांत ठाकूर,कासा डहाणूत दरवर्षी उन्हाळ्यात ताडगोळेना मोठी मागणी, डहाणू तालुक्याच्या बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी ताडगोळे आले असून यामध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला ताडगोळ्यांची विक्री सुरू झाली आहे.महालक्ष्मी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात ताडगोळे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.याठिकाणी गुजरात आणि मुंबई हून येणारे भाविक व ग्राहकांचा ताडगोळे खरेदी करण्याकडे कल अधिक आहे.या विक्रीतून आदिवासी बांधवांना चांगला रोजगार मिळत आहे. ताडगोळे या फळाला विशेष महत्त्व असून उन्हाळी फळ असलेल्या ताडगोळ्याला “आईस ऍपल,” असे म्हंटले जाते.पांढरेशुभ्र फळ,रसदार गर आणि चवीला गोड असलेले ताडगोळे ग्राहकांच्या पहिल्या पसंतीचे फळ आहे. उन्हाळ्यात ताडगोळ्यांचे सेवन शरीरासाठी लाभदायक असल्याने सध्या फळे खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करत आहेत. डहाणू,तलासरी…
संजय नेवे,विक्रमगड खा.डॉ.हेमंत सावरा यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विविध मागण्यासाठी साकडे, पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून,जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि औद्योगिक विकास होत आहे. जिल्ह्यात वाढवण बंदर आणि विमानतळ असे दोन महत्वाकांक्षी प्रकल्प होत आहेत. तसेच तारापूर हे देशातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे.त्यामुळे पालघर येथे महत्त्वाच्या गाड्यांच्या थांब्यांसाठी मागणी करण्यात येत आहे. पालघर जिल्हा मुख्यालय असूनही गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे पालघर स्थानकावर देण्यात आलेले नाहीत.प्रवाशांची वाढती संख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता,गाड्यांचे थांबे देणे आवश्यक आहे. त्यामध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे: कच्छ एक्सप्रेस,दादर बिकानेर एक्सप्रेस,बांद्रा-सूरत इंटरसिटी एक्सप्रेस,बांद्रा-गाझीपूर एक्सप्रेस. खा. सवरा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री…
सुरेश वैद्य,पालघर, माजी मुख्य कार्य.अधिकारी भानुदास पालवे यांचा निरोप समारंभ संपन्न, काल पालघर जिल्हा परिषदेच्या जननायक बिरसा मुंडा सभागृह,येथे जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभ तसेच नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या स्वागत समारंभाचा भव्य सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला माजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप,इजाज अहमद शरीख मसलत,मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे माजी जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील,विनया पाटील,काशिनाथ चौधरी,हबीब शेख,मंगेश भोईर,तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख,गटविकास अधिकारी,जिल्हा परिषद कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित…
दीपक मोहिते, भयावह वास्तव, राज्यात शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या लाखाच्या वर…. आपल्या शिक्षण व्यवस्थेवर आजवर खूप लिहिले गेले.पण शिक्षण व्यवस्थेमध्ये अपेक्षित सुधारणा व बदल होऊ शकले नाहीत.स्वातंत्र्याच्या साडेसात दशकानंतरही आपली शिक्षण व्यवस्था हेलकावे खात आहे. या काळात शहरी व ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेने बाळसं धरावे,यासाठी प्रयत्न करण्यात आले.पण परिस्थितीमध्ये बदल होऊ शकला नाही.नुकत्याच झालेल्या एका पहाणीत राज्यातील ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुले शाळाबाह्य असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार राज्यात तब्बल एक लाखाच्या वर शाळाबाह्य मुले आढळून आली असून,ती ६ ते १४ वयोगटातील आहेत,असे स्पष्ट झाले आहे. राज्यात शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा अस्तित्वात असतानाही राज्यात मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य मुले असल्याचा दावा…
वसंत भोईर,वाडा वाड्यातील बँक अधिकाऱ्यांना मनसेचा खणखणीत इशारा, गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या विशाल मेळाव्यात राज ठाकरे यांनी बँकामधील व्यवहार मराठीतून होतो की नाही,याची पाहणी करावी. तशी ती होत नसेल तर मनसे सैनिकांनी बँकाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्यावी,असे आदेश दिले होते. त्यामुळे मनसे सैनिकांनी आजपासून त्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यास सुरुवात केली आहे. वाड्यातील सर्व बँकांचा व्यवहार मराठीत करण्याची मागणी मनसेने रेटली आहे. तालुकातील सर्व बँकांचा दैनंदिन व्यवहार हा मराठी भाषेतून व्हावा,या मागणीसाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून वाड्यातील बँकांचे अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन मराठीत व्यवहार करण्याची मागणी केली आहे. त्याची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा…
वसंत भोईर,वाडा वाडा – बेरशेतीत मिरची पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव, तालुक्यातील बेरशेती या गावातील अनेक शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली होती. मात्र हवामान बदलामुळे मिरची पिकावर करपा या रोगाचा प्रादुर्भाव झाला व हाती आलेले पिक वाया गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून राज्यभरात ओळख आहे.वाड्याचा तांदूळ ” वाडा कोलम,” या नावाने प्रसिद्ध आहे,असे असले तरी भातशेती हा व्यवसाय पुर्णत: निसर्गावर अवलंबुन आहे. तसेच मजूरांचा तुटवडा,खते,बी-बियाणे, औषधे यांची भरमसाठ दरवाढ,आदी कारणामुळे भातशेतीचा व्यवसाय आता शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे येथील बहुतांशी शेतकरी हे भात पीक घेतल्यानंतर आपल्या शेतीत असलेल्या पाण्यावर विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करत असतात.यातून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पोलिसांनी प्रेक्षकांना नोटीसा देणे,ही कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी, कुणाल कामरा याला जेरबंद करण्यासाठी राज्य सरकार जंग जंग पछाडत आहे.पण कुणाल कामराही दररोज नवनवीन व्हिडीओ व ट्विट करून सरकारला डीवचत आहे.कुणाल कामरावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू झाले आहे.मात्र कुणाल कामरा मात्र राज्य सरकार व पोलिसांची खिल्ली उडवण्यात गर्क आहे.तो दररोज नवीन व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करत सुटला आहे. कुणाल कामराच्या त्या गाण्याला देश व परदेशातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.कुणाल कामरा यांच्या बँक खात्यामध्ये परदेशातून दररोज हजारो डॉलर्स जमा करण्यात येत आहेत.आतापर्यंत त्याच्या खात्यात पाच कोटी रु.जमा झाले आहेत.कुणाल हा हजर होत नसल्यामुळे…
