सुशील भोईर,वसई
कामणवासिय येत्या ९ एप्रिल रोजी आपल्या मागण्यासाठी आंदोलन छेडणार,
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका प्रिती दिनेश म्हात्रे,यांनी आपल्या प्रभागात भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्याबाबत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महानगरपालिकेच्या ” जी,” प्रभाग समिती क्षेत्रात वॉर्ड क्र.८९ व परिसरातील कामण,देवदळ,कोल्ही, चिंचोटी,बापाणे,सातीवली,
गिदराईपाडा या गावात गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणीटंचाई जाणवत असुन या विषयी मनपा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने व तक्रारी अर्ज दिले.पण प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही.त्यामुळे आता आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहोत.६९ गावाची ग्रामीण पाणीपुरवठा योजना त्वरित सुरु करा,पाड्यापाड्यावर बोअरिंग मारा,परिसरातील विहिरीची स्वच्छता व दुरुस्ती करा, टँकरने पाणीपुरवठा सुरु करा,कामण येथे धूळ खात पडलेल्या लघुपाटबंधारे विभागाच्या पाणीपुरवठा सुरु करा व कामण दलित वस्ती योजना त्वरित सुरु करा,अशा आमच्या मागण्या असुन त्या लवकर मार्गी लावा.अन्यथा ९ एप्रिल रोजी ” जी,” प्रभाग समिती कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा माजी नगरसेविका प्रिती दिनेश म्हात्रे आपल्या निवेदनात दिला आहे.

