संजय नेवे,विक्रमगड
खा.डॉ.हेमंत सावरा यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विविध मागण्यासाठी साकडे,
पालघर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून,जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि औद्योगिक विकास होत आहे. जिल्ह्यात वाढवण बंदर आणि विमानतळ असे दोन महत्वाकांक्षी प्रकल्प होत आहेत. तसेच तारापूर हे देशातील एक महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून नावारूपाला आले आहे.त्यामुळे पालघर येथे महत्त्वाच्या गाड्यांच्या थांब्यांसाठी मागणी करण्यात येत आहे.
पालघर जिल्हा मुख्यालय असूनही गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे पालघर स्थानकावर देण्यात आलेले नाहीत.प्रवाशांची वाढती संख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता,गाड्यांचे थांबे देणे आवश्यक आहे.
त्यामध्ये खालील गाड्यांचा समावेश आहे:
कच्छ एक्सप्रेस,दादर बिकानेर एक्सप्रेस,बांद्रा-सूरत इंटरसिटी एक्सप्रेस,बांद्रा-गाझीपूर एक्सप्रेस.
खा. सवरा यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे मागणी केली आहे.
या मागणीमुळे प्रवाशांना दिलासा मिळेल आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
तसेच स्थानिक रेल्वे सेवा विस्तारासाठी महत्त्वाच्या मागण्याकरण्यात आल्या असुन
डहाणू-दादर नवीन लोकल गाडी सुरू करावी.संध्याकाळी 6:15 ते 6:30 दरम्यान डहाणू ते दादर नवीन लोकल सुरू करावी.
संध्यकाळच्या सुमारास अंधेरी-विरार सामान्य लोकल गाडी सुरू करावी,
वसई-विरार परिसर झपाट्याने विकसित होत आहे,त्यामुळे प्रवाशांसाठी नवीन लोकल आवश्यक आहे.
सायंकाळी साडेपाच वाजता अंधेरी ते विरार सामान्य लोकल सुरू करावी.
पहाटे चार वाजता डहाणू-चर्चगेट नवीन लोकल सुरू करावी.पूर्वी दुध विक्रेते, भाजीपाला व फुलांचे विक्रेते लोकशक्ती एक्स्प्रेसने सफाळा स्थानकाहून दादर बाजारात जात असत.सध्या पर्यायी सुविधा नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे डहाणू-चर्चगेट पहाटे लोकल सुरू करावी.
विरार-डहाणू लोकल प्रकल्पाचा विस्तार करावा
विरार-डहाणू लोकलचे घोलवड,उमरगाव किंवा भिलाडपर्यंत विस्तारीकरण करावे.डहाणूपर्यंत नेण्यात येणाऱ्या मेमू ट्रेन भिलाडपर्यंत न्याव्यात.
सर्व जलद गाड्या डहाणूऐवजी वापीपर्यंत वाढवाव्यात.
नवीन लोकल मार्ग – दिवा-भिवंडी-अनगाव-अंबाडी-कुडूस-वाडा-विक्रमगड
भिवंडी आणि वाडा हे मोठे औद्योगिक केंद्रे होत आहेत.
या नव्या लोकल मार्गामुळे वाहतूक सुलभ होईल, रोजगाराच्या संधी वाढतील आणि मुंबईतील गर्दी कमी होईल.
विकासाच्या दृष्टीने रेल्वे विस्तार अनिवार्य आहे.
पालघर जिल्हा वेगाने औद्योगिक आणि आर्थिक केंद्र बनत आहे.त्यामुळे रेल्वे नेटवर्क मजबूत करणे,अत्यंत महत्त्वाचे आहे.या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करून प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि लोकांना दिलासा देणारी रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती केली आहे.सदर विनंतीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

