वसंत भोईर,वाडा
वाड्यातील बँक अधिकाऱ्यांना मनसेचा खणखणीत इशारा,
गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या विशाल मेळाव्यात राज ठाकरे यांनी बँकामधील व्यवहार मराठीतून होतो की नाही,याची पाहणी करावी. तशी ती होत नसेल तर मनसे सैनिकांनी बँकाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्यावी,असे आदेश दिले होते.
त्यामुळे मनसे सैनिकांनी आजपासून त्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यास सुरुवात केली आहे. वाड्यातील सर्व बँकांचा व्यवहार मराठीत करण्याची मागणी मनसेने रेटली आहे.
तालुकातील सर्व बँकांचा दैनंदिन व्यवहार हा मराठी भाषेतून व्हावा,या मागणीसाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून वाड्यातील बँकांचे अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन मराठीत व्यवहार करण्याची मागणी केली आहे. त्याची अंमलबजावणी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने प्रशासनाला दिला आहे.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष कांतीकुमार ठाकरे,कामगार नेते देवेंद्र भानुषाली,सचिव स्वप्निल मोरे, उपाध्यक्ष रवी जाधव,शहर प्रमुख मधुकर म्हात्रे,उपाध्यक्ष संतोष भोमटे,सहसचिव मनोज चौधरी,नितीन भोईर, हेमंत जाधव,आदेश डेंगाने, ओमकार साळुंखे,करण यादव,किरण मोरे,हर्ष भानुषाली आदी पदाधिकारी उपस्थित होते.
.

