Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, स.गो.वर्टी मेमो.ट्रस्टतर्फे वसईत व्याख्यानाचे आयोजन, थोर समाजवादी नेते व १९५२ ते १९६२ या काळातमाजी आमदार असलेले.प्रा.स.गो.वर्टीसरांची येत्या १ जून रोजी जयंती आहे, त्यानिमित्ताने वसईत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश हायस्कुल येथे संध्या ४.३० होणाऱ्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे उपस्थित राहणार आहेत.वसईला एक थोर व्यसंगी बुद्धिमान, चारित्र्यसंपन्न आणि निस्पृह नेतृत्व,अशी वर्टीसरांची ओळख आहे. निष्ठावंत व प्रामाणिक समाजवादी विचारवंत म्हणून कार्य करताना त्यांनी अन्याय,भ्रष्टाचारी व अनिष्ट प्रवृत्ती विरुद्ध आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी निकराची झुंज दिली. ” चले जाव,” चळवळीत म. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरांनी स्वतःला झोकून दिले. तसेच वसईतील अनेक तरुणांना आपल्याबरोबर…

Read More

सचिन परब,विरार जनसेवा फाउंडेशन संस्थेतर्फे आरमार प्रतिष्ठान ग्रंथालयाला ग्रंथाची भेट, समाजातील तरुणाईला शैक्षणिक व व्यवसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाठ्यपुस्तकी ज्ञानासह विविध क्षेत्रातील ज्ञान गरजेचे आहे. यामुळे वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी अर्नाळा आरमार प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून ग्रंथालय उभारण्यात आले आहे. या उपक्रमाला स्थानिक पातळीवर उदंड प्रतिसाद मिळत आहे.अत्याधुनिक आणि मोबाईलच्या स्क्रीनवर गुरफटून गेलेल्या समाज वातावरणात पुस्तक वाचन संस्कृती जपली पाहिजे.या संकल्पनेला शाबासकी म्हणून,जनसेवा फाऊंडेशन संस्थेतर्फे विविध विषयांवरील शेकडो पुस्तके आरमार प्रतिष्ठान ग्रंथालयाला भेट देण्यात आली.याप्रसंगी आरमार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश बावकर,सचिव भागेश बावकर,खजिनदार सिताराम घरत,सदस्य समीर अत्तार व अभय पुजारी उपस्थित होते.यावेळी अर्नाळा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जनसेवा फाऊंडेशनचे आभार मानले आहेत.

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्ह्याचा गौरव ; दोन ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने ” यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५,” अंतर्गत आयोजित उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था,गुणवंत अधिकारी आणि कर्मचारी गौरव पुरस्कार सोहळा आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबई येथे पार पडला. या कार्यक्रमाला महामहीम राज्यपाल पी.सी.राधाकृष्णन उपस्थित होते.तसेच ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग मंत्री जयकुमार गोरे व गृहराज्यमंत्री ( शहरे ), योगेश कदम हे देखील या सोहोळ्यास आवर्जून उपस्थित होते. सन २०२२-२३ साठी नितीन देऊ पवार,ग्रामपंचायत अधिकारी,मनोर ( ता.पालघर ) आणि सन २०२३-२४ करीता दिपक पांडुरंग पाटील,ग्रामपंचायत अधिकारी,गोऱ्हे ( ता. वाडा ) यांना हा गौरव प्राप्त झाला…

Read More

नदीम शेख,पालघर मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मोसमी पावसाने येत्या दोन दिवसात राज्यातील अधिक भागांत,तसेच मुंबई, पुणे,सोलापूर,कर्नाटक राज्यातील बेंगळुरू, तामिळनाडूचे उर्वरित भाग, तेलंगणा,आंध्रप्रदेश आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये आगमन केले आहे. आगामी ३ दिवसांत मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग,महाराष्ट्रा,कर्नाटकमधील अनेक क्षेत्रे,तेलंगणा, आंध्रप्रदेश,पश्चिम व उत्तर बंगालच्या उपसागर परिसर तसेच ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल,सिक्कीममध्येही पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटक राज्यातील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असुन मराठवाडा आणि शेजारी असलेल्या भागांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाला आहे.या वातावरणाच्या प्रभावामुळे…

Read More

दीपक मोहिते, महानगरपालिका निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अस्तित्व नगण्य असेल… गेल्या चार दिवसात वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार प्रमुख पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मुलाखती आम्ही प्रसिद्ध केल्या.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या ऑक्टो. किंवा नोव्हें.महिन्यात राजकीय पक्षाची कशी तयारी आहे,यावर आपण प्रकाशझोत टाकला.आमच्या वेबपोर्टलने सुरू केलेल्या या उपक्रमाला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर त्या पक्षांची महानगरपालिका निवडणुकीत काय स्थिती असेल ? यावर आम्ही सविस्तर विवेचन केले.डोळ्यात अंजन घालणारे हे विवेचन पक्षाचे अनेक नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पसंतीला उतरले.तर काही मूठभर राजकारण्यांच्या मात्र गळी उतरले नाही.त्यांनी थोडीफार नाराजी देखील व्यक्त केली. ९७…

Read More

सुरेश वैद्य,पालघर पालघर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण, नुकसान झाल्यामुळे बाधितांना मदत देण्यासाठी रु.१ कोटी २० लाख १५ हजार १९५ इतका निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.दरम्यान जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे बागायत शेतीचे १ हजार ९२३ शेतकऱ्यांचे ५३७.६८ हेक्टर क्षेत्राचे ३३ % हून अधिक नुकसान झाले.फळपिकांचे ५ हजार ५९८ शेतकऱ्यांचे २ हजार १६२ हेक्टर क्षेत्राचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याने नुकसानीचे पंचनामे तलाठी,ग्रामवसेवक व कृषिसहायक यांच्याद्वारे करण्यात आले आहेत. बाधितांना मदत देण्यासाठी रु.९ कोटी २३ लाख ७७ हजार ८००…

Read More

वसंत भोईर,वाडा गातेस – वाडा येथे अविष्कार बालसंस्कार शिबिर संपन्न, वाडा तालूकाच्या गातेस या गावात अविष्कार बालसंस्कार शिबिराची सुरुवात गेल्या आठवड्यात झाली होती.काल या शिबिराचा सांगता समारंभ पार पडला.या बालसंस्कार शिबिराला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व हे शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले. मुलांना संस्कारक्षम करण्याचे काम पालक व शिक्षक करत असतात.आज अधुनिकतेच्या युगात लहान मुले मोबाईल,टिव्ही,व्हिडिओ गेममध्ये गुरफटलेली पाहायला मिळतात. शाळांना सुट्या पडल्या की ती आणखी मुक्त होतात.पालकांच्या कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांच्याकडे हवे तसे लक्ष देणे शक्य होत नाही. त्यात विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे मुलांचे लाड पुरवणारे आजी- आजोबा, काका – काकू यांच्याकडून त्यांना संस्कार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचा भावनिक संवाद तुटतो.अशावेळी…

Read More

जव्हार,प्रतिनिधी जव्हार तहसीलदा्रांकडून नुकसानग्रस्त गावांची पाहणी, जव्हार तालुक्यात दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने अनेक गावांमध्ये घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तहसीलदार गमन गावित यांनी गावाचा दौरा केला. तहसीलदार गावित यांनी ग्रामपंचायत वावर,जामसर, दाभलोन आणि किरमिरा या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पंचनामे सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली.त्यांनी नुकसानग्रस्त लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे दुःख जाणून घेतले आणि शासनाच्या वतीने शक्य ती मदत लवकरच पोहोचवण्यात येईल,असे आश्वासन दिले. यावेळी किरमीरा गावचे नुकसानग्रस्त लाभार्थी विलास गणपत दळवी यांनी सांगितले की, “ वादळी वाऱ्यामुळे माझ्या घराचे छप्पर उडून गेले असून संसारोपयोगी वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे.अशा परिस्थितीमध्ये तहसीलदारांनी दिलेले आश्वासन दिलासा देणारी…

Read More

वसंत भोईर,वाडा पिकाला खत काय द्यायचे ? ” कृषीक,”ॲप वर कळणार, खरीप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विविध खतांसाठी होणाऱ्या धावपळीला यंदा ब्रेक बसणार आहे.राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे” कृषीक,” हे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. या अॅपमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या खतासाठीची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात aali आहे. यामुळे खताच्या काळाबाजाराला आता आळा बसणार असून,शेतकऱ्यांना पारदर्शक सेवा मिळणार आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची दरवर्षी खतासाठी होत असलेली धावपळ आता थांबणार आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून `कृषीक ʼ नवे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅप द्वारे सरकारने खते व बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या विक्रेत्यांवर…

Read More

संजय नेवे,विक्रमगड विक्रमगड तालुक्यात खा. हेमंत सवरा यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, गेल्या दोन दिवसात विक्रमगड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली. या अस्मानी संकटात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे खा.हेमंत सवरा यांनी आज तालुक्याचा दौरा केला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून यावेळी खा.सवरा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी, असे आदेश दिले.तसेच तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून विजपुरवठा खंडित झाला असुन वादळी वाऱ्यामुळे वीजेचे अनेक वीजेचे पोल जमीनदोस्त झाले आहेत.त्यासंदर्भातही महावितरणच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी चर्चा केली.या पाहणी दौऱ्यामध्ये पालघर जिल्हा परिषदचे माजी कृषी सभापती संदिप पावडे व भाजपा विक्रमगड…

Read More