वसंत भोईर,वाडा
पिकाला खत काय द्यायचे ?
” कृषीक,”ॲप वर कळणार,
खरीप हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विविध खतांसाठी होणाऱ्या धावपळीला यंदा ब्रेक बसणार आहे.राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे” कृषीक,” हे मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे.
या अॅपमुळे शेतकऱ्यांना घरबसल्या खतासाठीची माहिती देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात aali आहे. यामुळे खताच्या काळाबाजाराला आता आळा बसणार असून,शेतकऱ्यांना पारदर्शक सेवा मिळणार आहे.
खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची दरवर्षी खतासाठी होत असलेली धावपळ आता थांबणार आहे. शासनाच्या कृषी विभागाकडून `कृषीक ʼ नवे मोबाईल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅप द्वारे सरकारने खते व बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे.कृषीक अॅप मध्ये खत विक्रेत्यांची यादी,त्यांचे मोबाईल क्र.आणि त्यांच्या दुकानातील साठ्याची माहिती अपडेट करण्यात येणार आहे.त्यामुळे दुकानात खत उपलब्ध असूनही ते नाकारले गेले तर संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
कृषी केंद्रे अॅपशी जोडली गेली
पालघर जिल्ह्यातील कृषी केंद्र अॅपशी जोडली आहेत.पुढील खरीप हंगामासाठी लागणारी खते, उपलब्ध साठा इ. माहिती दर दोन दिवसांनी कृषी विभागातर्फे अपडेट होणार आहे.यामध्ये युरिया,डीएपी, एमओपी,एनपीके,एसएसपी इ.खतांचा समावेश आहे.
कृषीक अॅप ची वैशिष्ट्ये
खताचा साठा,प्रकार व उपलब्धता पिकांनुसार खताची मात्रा व वापर पद्धती, बाजार भाव,कृषी योजना व प्रशिक्षणाची माहिती, शेतकऱ्यांसाठी आवश्यक माहिती या ॲपच्या माध्यमातून पुरवण्यात येत आहे.
असे करा ॲप डाऊनलोड
मोबाईलवरील प्ले स्टोअरमध्ये कृषी क टाईप करून ॲप डाउन लोड करा. त्यावरील चावडी या पर्यायावर क्लिक करा.त्यानंतर ” खत उपलब्ध,” या पर्यायामध्ये जिल्हा व तालुका निवडा त्यावर आपल्या परिसरातील कृषी विक्रेत्यांकडे आपल्याला आवश्यक खतांचा साठा मिळेल.त्यानुसार तुम्हाला घरबसल्या जिल्ह्यातील खतांचा साठा कळणार आहे.
कृषी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पारदर्शक व सुलभ सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.कृषी विभागातर्फे दर दोन दिवसांनी खतांची, बियाणांची माहिती अद्ययावत करण्यात येणार आहे.
संदेश दुमाडा,वाडा पंचायत समिती,कृषी अधिकारी,

