नदीम शेख,पालघर
मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन,
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण पश्चिम मोसमी पावसाने येत्या दोन दिवसात राज्यातील अधिक भागांत,तसेच मुंबई, पुणे,सोलापूर,कर्नाटक राज्यातील बेंगळुरू, तामिळनाडूचे उर्वरित भाग, तेलंगणा,आंध्रप्रदेश आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये आगमन केले आहे.
आगामी ३ दिवसांत मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग,महाराष्ट्रा,कर्नाटकमधील अनेक क्षेत्रे,तेलंगणा, आंध्रप्रदेश,पश्चिम व उत्तर बंगालच्या उपसागर परिसर तसेच ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल,सिक्कीममध्येही पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटक राज्यातील भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असुन मराठवाडा आणि शेजारी असलेल्या भागांत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित झाला आहे.या वातावरणाच्या प्रभावामुळे पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रात पावसाची स्थिती कायम राहणार आहे. कोकण,मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांत सर्वत्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार,पालघर जिल्ह्यात पुढील पाच दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

