सचिन परब,विरार
जनसेवा फाउंडेशन संस्थेतर्फे आरमार प्रतिष्ठान ग्रंथालयाला ग्रंथाची भेट,
समाजातील तरुणाईला शैक्षणिक व व्यवसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पाठ्यपुस्तकी ज्ञानासह विविध क्षेत्रातील ज्ञान गरजेचे आहे.
यामुळे वाचन संस्कृती बळकट करण्यासाठी अर्नाळा आरमार प्रतिष्ठानच्या संकल्पनेतून ग्रंथालय उभारण्यात आले आहे.
या उपक्रमाला स्थानिक पातळीवर उदंड प्रतिसाद मिळत आहे.अत्याधुनिक आणि मोबाईलच्या स्क्रीनवर गुरफटून गेलेल्या समाज वातावरणात पुस्तक वाचन संस्कृती जपली पाहिजे.या संकल्पनेला शाबासकी म्हणून,जनसेवा फाऊंडेशन संस्थेतर्फे विविध विषयांवरील शेकडो पुस्तके आरमार प्रतिष्ठान ग्रंथालयाला भेट देण्यात आली.याप्रसंगी आरमार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रथमेश बावकर,सचिव भागेश बावकर,खजिनदार सिताराम घरत,सदस्य समीर अत्तार व अभय पुजारी उपस्थित होते.यावेळी अर्नाळा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी जनसेवा फाऊंडेशनचे आभार मानले आहेत.

