संजय नेवे,विक्रमगड
विक्रमगड तालुक्यात खा. हेमंत सवरा यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी,
गेल्या दोन दिवसात विक्रमगड तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली. या अस्मानी संकटात तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
या नुकसानाची पाहणी करण्यासाठी पालघर जिल्ह्याचे खा.हेमंत सवरा यांनी आज तालुक्याचा दौरा केला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून यावेळी खा.सवरा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्तांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी, असे आदेश दिले.तसेच तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून विजपुरवठा खंडित झाला असुन वादळी वाऱ्यामुळे वीजेचे अनेक वीजेचे पोल जमीनदोस्त झाले आहेत.त्यासंदर्भातही महावितरणच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी चर्चा केली.या पाहणी दौऱ्यामध्ये पालघर जिल्हा परिषदचे माजी कृषी सभापती संदिप पावडे व भाजपा विक्रमगड मंडळ अध्यक्ष रविंद्र भडांगे,विक्रमगडच्या तहसीलदार चारुशीला पवार व संबंधित विभागातील तलाठी व महावितरणचे अधिकारी उपस्थित होते.

