दीपक मोहिते,
स.गो.वर्टी मेमो.ट्रस्टतर्फे वसईत व्याख्यानाचे आयोजन,
थोर समाजवादी नेते व १९५२ ते १९६२ या काळातमाजी आमदार असलेले.प्रा.स.गो.वर्टीसरांची येत्या १ जून रोजी जयंती आहे, त्यानिमित्ताने वसईत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
न्यू इंग्लिश हायस्कुल येथे संध्या ४.३० होणाऱ्या या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे उपस्थित राहणार आहेत.वसईला एक थोर व्यसंगी बुद्धिमान, चारित्र्यसंपन्न आणि निस्पृह नेतृत्व,अशी वर्टीसरांची ओळख आहे.
निष्ठावंत व प्रामाणिक समाजवादी विचारवंत म्हणून कार्य करताना त्यांनी अन्याय,भ्रष्टाचारी व अनिष्ट प्रवृत्ती विरुद्ध आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी निकराची झुंज दिली.
” चले जाव,” चळवळीत म. गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत सरांनी स्वतःला झोकून दिले. तसेच वसईतील अनेक तरुणांना आपल्याबरोबर या चळवळीत सहभागी केले.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही संयुक्त महाराष्ट्र आंदोलन,मिठागर कामगारांचा लढा,रेल्वे आंदोलन व अखेरीस हरित वसई आंदोलन,इ.अनेक लढ्यात वर्टीसर सतत आघाडीवर राहिले.
सरांच्या त्यागी जीवन कार्यातून व्यक्त होणारा सामाजिक शैक्षणिक व वैचारिक वारसा पुढे चालू ठेवावा,या हेतूने वसईतील समाजवादी परिवाराने प्रा. स गो. वर्टी फाउंडेशनची स्थापना केली.वसईच्या सर्वांगीण कल्याणासाठी झटणाऱ्या संराची पवित्र स्मृती चिरंतन रहावी,म्हणून फाउंडेशनतर्फे वर्टीसराना अभिप्रेत असलेले अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून संराच्या जयंती निमित्ताने ” सध्याची राजकीय व सामाजिक परिस्थिती,” या विषयावर जेष्ठ पत्रकार व विचारवंत,लोकमत दैनिकाचे संपादक संजय आवटे यांचे व्याख्यान रवि.१ जून २०२५ रोजी संध्या.४.३० वा.न्यू इंग्लिश स्कूल,वसई येथे आयोजित करण्यात आले आहे.
नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकातर्फे करण्यात आले आहे.
धन्यवाद!!!

