- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, येणाऱ्या काळात लाखभर ” लाडक्या बहिणी,” होणार ” सावत्र बहिणी,” विधानसभा निवडणूका संपल्यानंतर राज्य सरकार विविध जाचक अटी व कडक निर्बंध लादून लाडक्या बहिणी योजनेचा गळा घोटू पाहत आहे.या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीला सुमारे ४५० कोटी रु.चुना लागल्याचे स्पष्ट झाले आहे.ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवणे, अशक्यप्राय असल्याचे दिसून आल्यामुळे राज्य सरकार आता वेगाने कामाला लागले आहे.गेल्या महिनाभरात सरकारने योजनेचे निकष बदलल्यामुळे सुमारे ९ लाख लाडक्या बहिणी या योजनेतून बाहेर फेकल्या गेल्या.सध्या या योजनेचा फायदा २ लाख ३ हजार महिलांना देण्यात येत आहे.ही संख्या निम्यावर आणण्याचा राज्यसरकारचा प्रयत्न आहे. महिलांच्या मतांवर डोळा ठेवून महायुती सरकारने मध्य प्रदेश सरकारच्या ” लाडली…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ज्या अधिकाऱ्यांना प्रमाणिकपणे काम करायचे नाही,त्यांनी स्वयंखुशीने निघून जावे – पालकमंत्री नाईक, काल पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मुख्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. अपेक्षेनुसार या जनता दरबाराला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या दरबारात सुमारे साडेसातशे निवेदने दाखल झाली.त्यापैकी ३५ ते ४० निवेदने निकाली काढण्यात आली.आलेल्या एकूण तक्रारीपैकी ५ % प्रकरणाचा निपटारा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.उर्वरित तक्रार अर्जावर संबंधित विभागाकडून खुलासा मागवण्यात येणार आहे.संबंधित विभागाकडून खुलासे आल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्पष्ट केले.पण या जनता दरबारामध्ये नाईक यांनी प्रशासकीय व लोकांच्या समस्या/ अडचणी सोडवण्यासंदर्भात अधिकाऱ्याकडून होणारी दिरंगाई व…
सुरेश वैद्य,सफाळे, जनता दरबारास नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद, प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत.तसेच हे आपल्याच कुटूंबाचे घटक आहेत,हे नागरिकांनी लक्षात घ्यावे.तसेच शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी नागरिकांची कामे तत्काळ करावी,अशा सूचना वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज जनता दरबारामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच तक्रारी अर्जावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी वनमंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृह,पालघर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीस दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री गणेश नाईक यांनी अभिवादन केले. या जनता दरबारामध्ये विविध शासकीय…
दीपक मोहिते, रिसॉर्ट्स नियामानुकूल करण्यात यावीत, पालघर जिल्ह्यातील पश्चिम पट्टय़ातील समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्टस आणि हॉटेल मालकांच्या मागे नेहमी खंबीरपणे उभ्या राहणार्या दहिसर विधानसभेच्या आ. मनिषा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य रामदास मेहेर यांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारी असलेली सर्व रिसॉर्ट,हॉटेल,कॅफे आणि लॉज यांना नियमाकूल करण्यासाठी निवेदन दिले.याप्रसंगी पालघर जिल्ह्यातील सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते. या निवेदनात स्थानिकांना रोजगार मिळवून देणाऱ्या या व्यवसायावर अधून मधून कारवाया करण्यात येत असतात.येथील व्यवसायिक सतत भितीच्या सावटाखाली असतात,त्यामुळे ही सर्व रिसॉर्ट्स,कॅफे व हॉटेल्स नियमानुकूल करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.सदर प्रसंगी पालघर जिल्ह्याचे…
सुरेश काटे,तलासरी तलासरीत पंतप्रधान आवास योजनेपासून लाभार्थी वंचित, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून देशात लाखो गोरगरिबांना घरे देण्याचा कार्यक्रम सुरू असताना, केवळ काही जाचक अटीमुळे अनेक नागरिक या योजनेपासून वंचित आहेत. तलासरी नगरपंचायत स्थापन झाल्यापासून पंतप्रधान आवास योजनेचा लाभ एकाही नागरिकाला मिळालेला नाही.त्यामुळे या योजनेच्या अटी आणि नियम शिथिल करण्यात यावेत,अशी मागणी नगरसेवक आणि भाजपाचे शहराध्यक्ष सुरेंद्र निकुंभ यांनी पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली आहे. निकुंभ यांनी यापूर्वी वारंवार याबाबत आवाज उठवला आहे.शासनाशी पत्रव्यवहार देखील केला आहे.परंतु, अद्याप त्यांच्या पत्राची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.तलासरी नगरपंचायतीमधील हद्दीत हजारो आदिवासी नागरिक राहतात.त्यांच्याकडं स्वतःच्या जमिनी नाहीत.ज्यांच्याकडे जमिनी आहेत,त्या वर्ग दोनच्या असल्यामुळे तेथेही…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे ३० जलचक्राचे वाटप,गरजू महिलांना मिळाला दिलासा, जव्हार तालुक्यातील टंचाईग्रस्त झाप गावात वेल्स ऑन व्हील्स संस्थेच्या वतीने आज ३० पाण्याचे रोलर ड्रम ( जलचक्र ) वाटप करण्यात आले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहाज मेनन यांच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम राबवण्यात आला. या माध्यमातून पाणी वाहून नेण्याची पारंपरिक डोक्यावर हंडा ठेवून चालण्याची पद्धत संपुष्टात येणार असून,गरजू महिला व मुलींना मोठा दिलासा मिळणार आहे. झाप गावातील पाण्याच्या टंचाईची माहिती मिळाल्यानंतर संस्थेचे प्रतिनिधी नारायण गभाले यांनी गावाला भेट दिली. गावातील वस्तीची पाहणी करून त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. गावातील नागरिक व महिलांशी संवाद साधून पाणीटंचाईमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली.यामध्ये मुलींना…
नाशिक विशेष प्रतिनिधी, फसवणूक केल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावास व ५० हजार रु.दंड, १९९५ ते ९७ च्या दरम्यान माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात,त्या सदनिका घेतल्या होत्या.त्यावेळेस त्यांनी आमचं उत्पन्न हे कमी आहे, आणि आमचे दुसरं घर नाही.अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली होती.त्या सदनिका त्यांना शासनाच्या १० % कोट्यातून मिळाल्या होत्या.मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केली होती.१९९५ साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा होता आरोप माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनीही केला होता.याचिका दाखल केली होती,याबाबत नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.हे प्रकरण १९९७ पासून सुरु…
संजय लांडगे,वाडा वाडा – कोनसई येथे आगीत घर जळून खाक : लाखो रु.चे नुकसान, वाडा तालुक्यातील कोनसई गावातील एका शेतकऱ्याच्या घराला रात्रीच्या सुमारास आग लागली.या आगीत त्यांचे राहते घर जळून खाक झाले आहे. कोनसई गावातील शेतकरी नंदकुमार यादव मोकाशी व बाळकृष्ण यादव मोकाशी या दोघा भावंडांचे घर असून कामानिमित्त बाळकृष्ण मोकाशी हे वाड्यात राहतात तर नंदकुमार मोकाशी हे आपल्या कुटुंबासह येथे राहात होते.रात्री साधारण दीडच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असे बाळकृष्ण मोकाशी यांनी सांगितले. मोकाशी यांच्या घराचे छत कौलारू असून त्यामध्ये जास्तीत जास्त लाकडांचा वापर केला होता.त्यामुळे आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केले व बघता बघता घर…
सुरेश वैद्य,सफाळे शिक्षण महर्षी र.स.राऊत यांचे शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान – पालकमंत्री नाईक, समाजातील अशिक्षित समूहाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करून समाजातील अनेक घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील केले.शिक्षण महर्षी रघुनाथ सखाराम राऊत यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करून भरीव योगदान दिले असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. माहिम शिक्षण संस्थेच्या संकूल क्र.२ चे रघुनाथ सखाराम राऊत संकूल असे नामकरण व उद्घाटन माहिम – पालघर येथे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा.हेमंत सवरा,आ.राजेंद्र गावित,जिल्हाधिकारी गोविंद बोडके,माहिम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजय ठाकूर, उपाध्यक्षा निलम राऊत, , शिक्षणाधिकारी…
दीपक मोहिते, नवनिर्वाचित निवडणूक आयुक्तांकडून मतदारांना फार मोठ्या अपेक्षा, भारताचे २६ वे मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त पदी नव्याने नियुक्त झालेले हे १९८८ च्या बॅचचे केरळ केडरचे अधिकारी आहेत.राज्य व केंद्रीय स्तरावर त्यांनी अनेक पदावर काम केले असून केंद्रीय गृहमंत्रालयात काम करताना त्यांनी अनेक महत्वाच्या विषयी त्यांनी प्रभावी भूमिका पार पाडली होती.३७० कलम रद्द केल्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये ज्ञानेश कुमार यांचे फार मोठे योगदान होते.त्यांची प्रशासकीय वाटचाल लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यांची राममंदिर ट्रस्टच्या सदस्यपदी निवड केली होती.असे हे ज्ञानेशकुमार,यांनी तत्कालीन निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्याकडून नुकतीच सूत्रे हाती घेतली. आपल्या देशाचा केंद्रीय निवडणूक आयोग हा गेल्या दहा वर्षात एक…
