सुनीता मराठे,बोरिवली
बोरिवली येथे येथील गोखले हायस्कुलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न,
गोखले एज्युकेशन सोसायटीचे ना.गोपाळ कृष्ण गोखले हायस्कूल,रोटरी क्लब ऑफ मुंबई नॅशनल पार्क बोरिवली ( पूर्व ) व शाळेचा अभ्युदय माजी विद्यार्थी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे वार्षिक आरोग्य तपासणी शिबीर नुकतेच पार पडले.
या शिबिरात ३६५ विद्यार्थ्यांची नेत्र चिकित्सा , दंत चिकित्सा व रक्तगट चिकित्सा करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ मुंबई नॅशनल पार्कचे खजिनदार राजगौडा पाटील,नेत्र शल्यचिकित्सक डॉ.मानस गोरे,आर.एन.शिंदे ॲन्ड सन्सच्या नेत्र तज्ज्ञ डॉ.निता शिंदे,दंततज्ज्ञ डॉ.मंगेश भट, डॉ.यतीन अल्हार,प्रिस्टीन हेल्थ केअरच्या प्रतिनिधी प्रिती खानविलकर,अमन कुमार,नूर शेख,अभुदय माजी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष राजेश म्हात्रे,सदस्य कुलकर्णी,महेश मोगरे,अस्मिता घोण व श्रुतिका सुर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरात अजनेया व्हिझन ॲन्ड हेल्थ केअरचे नेत्र शल्यचिकित्सक डॉ.मानस गोरे यांनी सखोल नेत्र तपासणीची आवश्यकता असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या रुग्णालयात मोफत निदान – उपचार व चष्मे देण्याचे आश्वासन दिले आहए.या शिबिराचे आयोजन व नियोजनात पुढाकार घेऊन मदत व सहकार्य करणाऱ्या व्यक्तीचे विशेष आभार मानण्यात आले.

