संजय लांडगे, वाडा
सारशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आरती ठाकरे यांची बिनविरोध निवड,
वाडा तालुक्यातील सारशी मालोंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आरती अनिल ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.मावळत्या उपसरपंच उज्वला बांगर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ॲड.दिनेश कोदे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलवण्यात आली.यावेळी उपसरपंच पदासाठी आरती अनिल ठाकरे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ठाकरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिपाली कोदे,नरेश फडवले, उज्वला बांगर,जितेश कोंढारी उपस्थित होते.नवनिर्वाचित उपसरपंच आरती ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फटाक्यांच्या आतषबाजीत ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी युवा कार्यकर्ते जयूर ठाकरे,अनिल ठाकरे ग्रामविकास अधिकारी अरुणा शेखर मडके आदींसह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.

