संजय नेवे,विक्रमगड
सेवा विवेक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट,
बांबू हस्तकलेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत असलेल्या सेवा विवेक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान संस्थेच्या कार्याचा आढावा घेत विविध सामाजिक आणि विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.गेल्या १४ वर्षांपासून सेवा विवेक संस्था आदिवासी बांधवांना सन्मानजनक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे.
संस्थेच्या वतीने महामहीम राष्ट्रपतींना पालघरच्या प्रसिद्ध बांबू कलेतून साकारलेली भेटवस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती महोदया यांनी संस्थेच्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त करत यापुढील वाटचालीसाठी मौलिक मार्गदर्शन केले.
ही भेट सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरली.सेवा विवेक संस्थेला राष्ट्रपतींनी सदिच्छा भेट द्यावी,अशी विनंती संस्थेच्यावतीने करण्यात आली.
या विशेष प्रसंगी खा.डॉ हेमंत विष्णु सवरा,पद्मश्री रमेश पतंगे,सेवा विवेक संस्थेचे प्रमुख पदाधिकारी प्रदीप गुप्ता,लूकेश बंड,आदिवासी महिला भगिनी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

