शुभम सावंत,विरार
विवा महाविद्यालय विरार येथे जुळल्या सुरेल तारा,
” सृजन विरार,” या संस्थेतर्फे रवि.२३ मार्च रोजी ” जुळल्या सुरेल तारा,” या शास्त्रीय संगीत वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विवा महाविद्यालय येथील विजयानंद पाटील रंगायतन येथे सायं. ७.०० वाजता हा कार्यक्रम होणार असून, विरार वसई परिसरात कदाचित पहिल्यांदाच संतूर वादन आणि व्हायोलिन आणि सारंगीच्या जुगलबंदीचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे.
पुण्याचे डॉक्टर शंतनू गोखले ( पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य ) हे संतूर वादन करणार असून,खास गोवा येथून येणारे,मूळचे ग्वाल्हेरचे सारंगी वादक वसीम खान ( उस्ताद मुन्ने खान आणि उस्ताद सरवर हुसेन यांचे शिष्य ) आणि गोव्याचेच व्हायोलिन वादक राजन माशेलकर (पंडित डी. के.दातार यांचे शिष्य) यांच्यामध्ये जुगलबंदी रंगणार आहे.दोन्ही सत्रांसाठी पुण्यातील आशय कुलकर्णी ( पंडित सुरेश तळवलकर यांचे शिष्य ) हे तबल्याची साथ देणार आहेत.
हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. मात्र प्रवेशिका घेणे आवश्यक आहे.या कार्यक्रमास रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रतिसाद द्यावा,असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
प्रवेशिकांसाठी संपर्क
संदीप फाटक : ९१२९१३२९१४

