- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा चिंचेच्या झाडापासून भरघोस उत्पन्न,चिंचेची झाडे शेतकऱ्यांना ठरताहेत वरदान, निरनिराळ्या हवामानात चांगले वाढणारे,अत्यंत हलक्या जमिनीत,माळरान व डोंगरउतारावर कुठेही चांगले वाढणारे चिंचेचे झाड हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.चिंच हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे कोरडवाहू पीक असून दरवर्षी लाखोंचे उत्पन्न मिळवून देणारे म्हणून ओळखले जाते.चिंच वृक्ष हा मूळ आफ्रिकेतील असून अति प्राचीन काळापासून भारतीय भूमीत त्याचे उत्पादन घेण्यात येत आहे.जागतिक पातळीवर सर्वाधिक चिंचेची उत्पादन भारतात होते.चिंच या पिकाचे एकदा लावण्यात आलेले रोप अनेक वर्ष उत्पन्न देते.चिंचेला बहुगुणी पीक म्हणून ओळखले जाते.त्यामुळे शेतकरी जास्तीत जास्त चिंच लागवडीकडे वळत आहेत. चिंचेचा उपयोग घरगुती वापरासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.चिंच वाळवून बाराही महिने वापरली जाते. दुसऱ्या…
सुशील भोईर,वसई वसई येथे भीषण आगीत ३० ते ३५ झोपड्या भस्मसात :आग लागली की लावण्यात आली ? वसई पश्चिमेस दत्तानी मॉलच्या मागच्या बाजूस असलेल्या झोपड्पट्टीला शनिवारी रात्री भीषण आग लागली. रात्री आठ ते सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली.या दुर्देवी घटनेमध्ये ३० ते ३५ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.त्यामुळे अनेक गोरगरिबांचे संसार रस्त्यावर आले आहेत. वसई पश्चिमेस दत्तानी मॉलच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत मोलमजुरी करणारे बांधव झोपड्या बांधून राहत होते.शनिवारी रात्री अचानकपणे या झोपड्यांना आग लागली. या आगीची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच तामतलाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.मात्र आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन यंत्रणेने सनसिटी…
दीपक मोहिते, राज्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट,धरणातील पाणीसाठा खालावत चालला आहे, राज्याच्या तलावातील पाण्याची स्थिती चिंताजनक असुन यंदा जनतेला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.उन्हाळ्याची तीव्रता वाढताच राज्याच्या धरणांतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे.मार्च महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांतच राज्यातील सुमारे साडेतीन हजार मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांतील पाणीसाठा ५१ टक्क्यांवर आला आहे. पुढील काही दिवसांत उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्रावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.फेब्रु.च्या अखेरीस सुरू झालेल्या उन्हाच्या कडाक्याने पाण्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.धरणांतील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवनही होत आहे.परिणामी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” भाजपमध्ये निष्ठावंताची प्रचंड हेटाळणी,फडणवीस यांच्या लेखी पक्षनिष्ठा नगण्य, विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी काल भाजपने आपले ३ उमेदवार जाहीर केले आहेत.यामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना आणि प्रामुख्याने माधव भंडारी यांना डावलण्यात आले आहे. भाजप स्वतःला इतरांपेक्षा स्वतःला वेगळा पक्ष म्हणवतो, पण सध्या हा पक्ष देखील काँग्रेसच्या वळणावर येऊन पोहोचला आहे.इतर पक्षाचे आमदार व खासदार फोडणे, त्यांना लाभाची पदे देणे,इ. गैरकामांना अक्षरशः ऊत आला आहे.तपास यंत्रणाचा ससेमिरा चुकवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अनेकांना गेल्या बारा वर्षात भाजपने लाभाच्या पदाची खिरापती वाटल्या.संपूर्ण राजकीय जीवन काँग्रेसमध्ये घालवलेल्या विखेंना महसूल, जलसंधारण अशी महत्वाची खाती मिळाली.एका दिवसात भाजपमध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खासदारकी मिळाली. मात्र…
जव्हार प्रतिनिधी, व्याख्याते व शिक्षक नितीन आहेर शैक्षणिक व सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित, समाजहित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी भरीव योगदान देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन,मलकापूर यांच्या वतीने ” राष्ट्रभक्ती सेवा पुरस्कार २०२५, ” राज्यस्तरीय वितरण सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सुत्रसंचालक तथा व्याख्याते जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक नितीन वामनराव आहेर यांना ” शैक्षणिक व सामाजिक कार्य पुरस्कार,” देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नितीन आहेर यांचे सामाजिक कार्यात नेहमीच योगदान असुन कोरोना काळात त्यांनी आरोग्य विभागाला अडीच लाखांचा कोविड निधी…
दीपक मोहिते, राज्यात नक्की काय चाललंय ? महाराष्ट्र जन सुरक्षा कायदा २०२४ ; सर्वसामान्यांची मुस्कटदाबी करणारा नसावा, राज्याच्या विधिमंडळ सचिवालयाने विधानसभा क्र.३३ विधेयक संदर्भात सर्वसामान्य जनता,विधिमंडळाचे माजी सदस्य,सामाजिक संघटना,संस्था,यांच्याकडून सूचना व सुधारणा संदर्भात अभिप्राय मागवले आहेत.गेल्या ११ जुलै २०२४ रोजी तत्कालीन महायुतीच्या सरकारने ” महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा अधिनियम २०२४,” आणले होते.बेकायदेशीर कृत्यांचा अत्यंत प्रभावीपणे प्रतिबंध करण्यासाठी व अन्य कारणासाठी हे विधेयक आणल्याचे सरकारने त्यावेळी स्पष्ट केले होते.या विधेयकाचा मुख्य हा उद्देश शहरी भागातील नक्षलवादाचा समूळ नायनाट करणे,असा आहे.पण या विधेयकाचा गैरवापर होईल,अशी भिती विरोधी पक्षांनी व्यक्त केल्यानंतर या विधेयकाचा मसुदा संयुक्त समितीकडे पाठवण्यात आला होता.या संदर्भात विधिमंडळ सचिवालयाने आता…
दीपक मोहिते, १९ मार्च रोजी विरार पूर्व भागात इफ्तार पार्टीचे आयोजन, सालाबादप्रमाणे यंदाही अंजुमन – ए – इस्लाम,या संस्थेतर्फे बुध.१९ मार्च रोजी सां.६.०० वाजता इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी आयोजकांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले आहे.यंदाचे हे ३३ वे वर्ष आहे.दरवर्षी संस्था मोठ्या उत्साहात इफ्तार पार्टीचे आयोजन करत आली आहे. अंजुमन – ए – इस्लाम ही संस्था गेली तीन दशके शिक्षण,सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहे.संस्थेतर्फे आजवर शेकडो उपक्रम राबवण्यात आले आहेत.सामाजिक सलोखा व बंधुभाव हा संस्थेचा पाया असून संस्था गोरगरीब विद्यार्थ्यांना आपल्या परीने शैक्षणिक साहित्य व इतर मदत करत असते. विरार पूर्व भागातील मंगल हॉल,चंदनसार विरार येथे…
दीपक मोहिते, सामाजिक कार्यकर्ते मनोज कामडी,आदर्श समाजरत्न पुरस्काराने सन्मानित, सामाजिक बांधिलकीतून निस्वार्थ सेवा करणाऱ्या आणि समाजासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने माणुसकी मल्टिपर्पज फाऊंडेशन, मलकापूरच्या वतीने ” राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार २०२५,” राज्यस्तरीय वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.हा भव्य सोहळा १६ मार्च २०२५ रोजी तालुका शिक्षक संघ पतसंस्था हॉल, ४० बिघा,मलकापूर,जि. बुलढाणा येथे पार पडला. या कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील शिरोशी गावातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व तालूका व्यवस्थापक पेसा मनोज कामडी यांना ” आदर्श समाजरत्न पुरस्कार,” देऊन गौरवण्यात आले.ग्रामीण व आदिवासी भागातील गरजू नागरिकांना मदतीचा हात देणारे,महिला सक्षमीकरण व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मनोज…
शुभम सावंत,विरार बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या : शिक्षिका आणि प्राचार्याविरुद्ध गुन्हा दाखल, आपली शिक्षण व्यवस्था कायम प्रकाशझोतात असते,परीक्षेचे पेपर फुटणे,परीक्षेत सर्रास कॉपी करणे,उत्तर पत्रिका गहाळ होणे,असले प्रकार आपल्या पाचवीला पुजले आहेत.शिक्षण विभागात कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही.शिक्षणाचा सुमार दर्जा,शिक्षकांची अपुरी संख्या,त्यामुळे शाळेची पटसंख्या खालावणे व वेगाने बंद पडणाऱ्या शाळा इ. कारणामुळे आपले शिक्षण विभाग बदनाम झाले आहे. सध्या पालघर जिल्ह्यात असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणाने आपल्या शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. बारावी वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका जळल्या प्रकरणी संबंधित शिक्षिका आणि महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात विरारच्या बोळींज पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षिकीने या उत्तरपत्रिका बेकायदेशीरपणे…
वसंत भोईर,वाडा वाड्यात सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर, तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून वाडा तालुका देखरेख संघ,वाडा ग्रुप सेवा सहकारी संस्था,चांबळे सेवा सहकारी संस्था,आंबिस्ते सेवा सहकारी संस्था या चार सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका येत्या एप्रिलमध्ये होणार आहेत.या संस्थांची निवडणूक १९एप्रिल रोजी होणार असून १३ ते २० मार्च पर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याची करायची आहेत.तर २४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान माघार घेता येणार आहे. वाडा तालुका देखरेख संघ ही वाडा तालुक्यातील सेवा सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे.या संस्थेची इमारत असुन त्यामध्ये व्यापारी गाळे व संस्थेचे प्रशस्त कार्यालय आहे.मात्र तांत्रिक कारणामुळे ही इमारत वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.आगामी पंचवार्षिक निवडणुकीत नव्याने…
