संजय लांडगे,वाडा
वाड्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी,
वाडा शहरातील सिद्धार्थ नगर येथे सिद्धार्थ युवक मित्र मंडळातर्फे विश्वभूषण, भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक अभिवादन सभा व त्यानंतर काल भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
सकाळी बुद्ध वंदना घेण्यात आली,यावेळी बौद्ध बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान प्रबोधन सत्रात भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पवार,रोशन पाटील, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष निलेश पाटील,पत्रकार युवराज ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.नुकत्याच पार पडलेल्या क्रीडा स्पर्धकांचा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.संध्याकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
सिद्धार्थ युवक मित्र मंडळाचे अध्यक्ष हेमंत थोरात व त्यांच्या अन्य सहकाऱ्याचे कार्यक्रम आयोजनात सहकार्य लाभले.

