Author: दीपक मोहिते

जव्हार प्रतिनिधी, जव्हार-गरदवाडी येथे विहिरीचे लोकार्पण, ग्रामपंचायत कासटवाडीचे सरपंच कल्पेश विनायक राऊत यांच्या अथक प्रयत्नातून आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने केलेल्या योजनाबद्ध कामामुळे मौजे गरदवाडी येथील आंब्याच्या पाडा परिसरात नवीन विहिरीचे लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. या लोकार्पण सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गरदवाडीतील कातकरी वस्तीतील पाण्याची टंचाई लक्षात घेता विहीर हा गावासाठी एक महत्त्वाचा आणि अत्यावश्यक प्रकल्प होता.ग्रामपंचायतच्या १५ वा वित्त आयोगाचा निधी तसेच शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या विहिरीचे काम पूर्ण करण्यात आले.या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळणार आहे.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच कल्पेश राऊत यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, आदिवासी विकास विभाग, पीएम जनमन,आदी-आदर्श,…

Read More

जव्हार प्रतिनिधी, विद्यार्थी केंद्रित गुणवत्ता वाढीसाठी जव्हार शिक्षण विभागाने सुरू केला उपक्रम, पंचायत समिती जव्हार जिल्हा पालघर प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित अध्ययन साहित्य नवनिर्मिती योजना -कार्यशाळा, प्रदर्शन २०२४- २५ मोठ्या उत्साहात पार पडला.यावेळी पंचायत समिती जव्हारच्या गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व मनीषा डांगे, विस्तार अधिकारी ( शिक्षण विभाग ) केंद्रप्रमुख,शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मनीषा डांगे यांनी केले.त्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यानी विद्यार्थी व शिक्षक यांना अध्ययन साहित्य नवनिर्मिती योजना कार्यशाळा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अध्ययनशीलता वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, अध्ययन प्रक्रिया आनंददायी सुलभ करणे,अध्ययनातले अडथळे दूर करणे,अशा उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत…

Read More

शुभम सावंत,विरार उत्कर्ष महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न, विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच बारावीनंतर विवा महाविद्यालयात शिकवण्यात येणाऱ्या विषयावर ” करिअरचे पर्याय,” या विषयावर सेमिनार घेण्यात आला.यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विवा लॉ कॉलेजचे प्राचार्य ठाकूर जेठानी,विवा कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य वैभव पाटील,बँकिंग आणि इन्शुरन्स विषय विभागप्रमुख डॉ.रोशनी नागर,विवा पदवी महाविद्यालयाच्या प्रा.सॅन्ड्रा आल्मेडा,डेटा सायन्सच्या विषय विभाग प्रमुख प्रा.श्वेता यंदे यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मुग्धा लेले,उपप्राचार्य रमेश पाटील,उपप्राचार्या हेमा पाटील यांनी करिअर सेमिनार या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला कल्पना राऊत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.या करिअर सेमिनारचा लाभ…

Read More

दीपक मोहिते, राजकीय वाव व्यवसायिक स्वार्थापोटी अनेक कुटुंबे दुभंगली, हल्लीच्या काळात रक्ताच्या नात्यापेक्षा सत्तेचा हव्यास व स्वार्थ मोठा ठरला आहे.राजकारणात शिरलेल्या घराणेशाही प्रवृत्तीमुळे आज अनेक कुटुंबे दुभंगली गेली आहेत.भाजप हा काँग्रेस पक्षातील घराणेशाहीवर आजवर टीकेची झोड उठवत होता,पण आज त्या पक्षालाही घराणेशाहीचा शाप लागला आहे.मात्र याच घराणेशाहीमुळे राजकीय क्षेत्रात वावरणारी अनेक कुटुंबे उध्वस्त झाली.त्यामध्ये गांधी,ठाकरे,मुंडे ही तर व्यवसायिक क्षेत्रातील अंबानी,हिरानंदानी,केसरी पाटील टूर्स,सिंघानिया व हावरे कुटुंबाचा त्यामध्ये समावेश आहे.सत्ता व अधिकार यांचे समान वाटप होत असेस्तोवर ही कुटुंबे एकत्रित होती.पण कालांतराने गृहकलहाची वात पेटली व कुटुंबे दुभंगली.सत्ता व स्वार्थ,अशा दोन कारणामुळे हे सारं घडतंय.आपल्या कुटुंब व्यवस्थेत आता मी व माझे कुटुंब…

Read More

दीपक मोहिते, ” ये रे माझ्या मागल्या,” …आणि आमच्या मराठी अस्मितेचा कडेलोट झाला, मनसेचे नेते राज ठाकरे यांनी पुन्हा कोलांटी उडी मारल्यामुळे मनसे सैनिक सध्या संभ्रमावस्थेत सापडले आहेत.गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मनसे सैनिकांना आदेश दिला होता की ” बँकेचे व्यवहार मराठी भाषेत होतो की नाही तपासा,आणि नसेल होत तर त्यांच्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्या.” त्यांच्या या आदेशानुसार मनसे सैनिकांनी बँकेत ” खळखट्याक,” सुरू केले. सलग दोन दिवस हा खेळ सुरू होता.दरम्यान मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी डोळे वटारत ” कोण कायदा हातात घेत असेल तर कठोर कारवाई करू,” असा इशारा दिल्यानंतर राज ठाकरे…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.१ ” ट्रम्प,ट्रम्प,” असे कोकलणाऱ्या पंतप्रधान मोदी यांना ट्रम्प यांनी चांगलाच धोबीपछाड दिला.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाची झोप उडवली आहे.त्यांच्या एका निर्णयाने अमेरिकेशी व्यापार करणारे सारे देश भितीच्या सावटाखाली आले आहेत.ट्रम्प यांनी २६ % आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक देशाची आर्थिक घडी विस्कळीत होण्याची भिती सर्वत्र व्यक्त होत आहे.त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या बाजारात भारतीय वस्तू प्रचंड महाग होतील व त्याचा थेट फायदा त्यांच्या देशातील उत्पादकांना होणार आहे.यातून ट्रम्प सरकारला प्रचंड असा महसूल मिळणार आहे.या सर्व घडामोडीमुळे भारतीय व्यापारी व शेतकरी उध्वस्त होणार आहेत.मोदी सरकारच्या कृषीविषयक दिशाहीन धोरणामुळे कृषी क्षेत्र गेल्या दहा वर्षांपासून…

Read More

वसंत भोईर,वाडा नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या-आ.दरोडा, वाडा तालुक्यासह पालघर व ठाणे जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास चक्रीवादळाने मोठे थैमान घातले होते.तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा पडला. या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांच्या घराचे पत्रे शेतकरी कडधान्य व आंबा बागायतदरांचे तसेच वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्यात यावी,अशी मागणी आ.दौलत दरोडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन केली आहे. या नुकसानीबाबत आपल्या शासनाने गंभीर दखल घेऊन वाडा व शहापूर या दोन्ही तालुक्यातील नागरिक,शेतकरी व वीटभट्टी व्यावसायिक अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून मोठी मदत करण्यात यावी अशी आ.दरोडा यांनी विनंती केली आहे.

Read More

संजय लांडगे,वाडा गारगाव आश्रम शाळेत व्यवसाय मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न, वाडा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शाळेत काल १० वी व १२ वी नंतर करियरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.एम. बनसोडे होते.कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली,त्यानंतर विद्यार्थ्यांकडून ईश्वरस्तवन व स्वागतगीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एस.वाघ-उच्च माध्य.शिक्षक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला.तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांमध्ये अक्षय इंगळे, अध्यक्ष शांताई नर्सिंग कॉलेज पालघर,राहुल बनसोड सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ महाविद्यालय ओंदे,प्रा.डॉ. चांदोजी गायकवाड-वरिष्ठ महाविद्यालय ओंदे,प्रा.गौरव मोहिते,विभाग प्रमुख,हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय हारोसाळे,सोनाली वेखंडे-संगणक प्रशिक्षिका वाडा,विजय डाखोरे-पोलीस उपनिरीक्षक…

Read More

सुरेश काटे,तलासरी, ” मोबाईलकडून मैदानाकडे, ” अभियानाला युवकांची साथ, यशराज रिसर्च फाउंडेशनतर्फे अणवीर गावातील युवकांसाठी मोबाईलकडून मैदानाकडे अभियान राबवण्यात येत असून या अभियानाला युवकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.अणवीर प्रीमियर लीग ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी तलासरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत देवरे,तलासरी तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी रत्नाकर अंबात,सावरोली अणवीर गावचे उपसरपंच जयवंत खुलात आणि यशराज रिसर्च फाउंडेशनचे प्रोग्राम लीड नामदेव गुलदगड उपस्थित होते. यशराज रिसर्च फाउंडेशनतर्फे दरवर्षी एप्रिल महिन्यात अणवीर गावातील युवकांसाठी व्हॉलिबॉल आणि क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले जाते.या स्पर्धांचा उद्देश हा फक्त खेळापुरता मर्यादित नाही,तर खेळाच्या माध्यमातून गावातील…

Read More

दीपक मोहिते, अश्विनी बिद्रे हत्या : अभय कुरुंदकर सह अन्य दोन जण दोषी तर अन्य एकाची निर्दोष सुटका, सहा.पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात आज पनवेल येथील सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अभय कुरुंदकर,महेश फाळणीकर व कुंदनलाल भंडारी या तिघांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.तर एकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.सहा.पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात अखेर निकाल लागला आहे.आरोपी अभय कुरुंदकरसह अन्य दोघांना हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.तर आरोपी क्र.दोन राजू पाटील याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.पनवेल येथील सत्र न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू आहे. १४ जुलै २०१६ रोजी अश्विनी बिद्रे…

Read More