दीपक मोहिते,
अश्विनी बिद्रे हत्या : अभय कुरुंदकर सह अन्य दोन जण दोषी तर अन्य एकाची निर्दोष सुटका,
सहा.पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे खून प्रकरणात आज पनवेल येथील सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे.
पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात अभय कुरुंदकर,महेश फाळणीकर व कुंदनलाल भंडारी या तिघांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे.तर एकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.सहा.पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात अखेर निकाल लागला आहे.आरोपी अभय कुरुंदकरसह अन्य दोघांना हत्येप्रकरणी सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे.तर आरोपी क्र.दोन राजू पाटील याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.पनवेल येथील सत्र न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू आहे.
१४ जुलै २०१६ रोजी अश्विनी बिद्रे या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. मात्र त्यानंतर थेट दोन वर्षांने म्हणजेच २०१८ मध्ये त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले होते.या प्रकरणात पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला अटक केली होती.तसंच,आणखी तीन आरोपींना देखील अटक करण्यात आली होती.सात वर्षांपासून चार आरोपी पोलीस कोठडीत आहेत.आज पनवेल सत्र न्यायालयात या प्रकरणावर अंतिम सुनावणी होती.कोर्टाने आरोपी अभय कुरुंदकरला दोषी ठरवले असुन आरोपी क्र.२ राजू पाटील यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.हत्येच्या कटात त्याचा काही संबंध असल्याचा पुरावा नसल्यामुळे त्याची सुटका करण्यात आली आहे.तर मुख्य आरोपी अभय कुरुंदकरवर अपहरण,हत्या आणि पुरावे नष्ट करणे,हे गुन्हे सिद्ध झाले आहेत.महेश फळणीकर व कुंदन भंडारी यांचा मृतदेहची विल्हेवाट लावण्यात सहभाग होता.
महिला पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्याचे व त्यानंतर दोन वर्षांनी त्यांचा खून झाल्याचे समोर आले होते.
अश्विनी बिद्रे यांच्या हत्येनंतर दोन वर्षांनंतर शोध मोहिम राबवण्यात आली होती.मात्र पुरावे गोळा करण्यात तपास अधिकारी अयशस्वी झाले,असं म्हणत कोर्टाने तपास यंत्रणाना चांगलेच फटकारले आहे.तसंच,अभय कुरुंदकरवर अनेक आरोप असताना त्याची राष्ट्रपती पुरस्कारासाठी शिफारस केली जाते,हे अत्यंत भयंकर असून राष्ट्रपती पदक शिफारस करणाऱ्या कमिटीवर न्यायाधीश संतापले आहेत.मुख्य आरोपी अभय कुरुंदकर आणि इतर दोन आरोपींना ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावणार असल्याचं सांगण्यात आले आहे.

