वसंत भोईर,वाडा
नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत द्या-आ.दरोडा,
वाडा तालुक्यासह पालघर व ठाणे जिल्ह्यात आज
दुपारच्या सुमारास चक्रीवादळाने मोठे थैमान घातले होते.तसेच मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा पडला. या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिकांच्या घराचे पत्रे शेतकरी कडधान्य व आंबा बागायतदरांचे तसेच वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्यात यावी,अशी मागणी आ.दौलत दरोडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन केली आहे.
या नुकसानीबाबत आपल्या शासनाने गंभीर दखल घेऊन वाडा व शहापूर या दोन्ही तालुक्यातील नागरिक,शेतकरी व वीटभट्टी व्यावसायिक अशा नुकसानग्रस्तांचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून मोठी मदत करण्यात यावी अशी आ.दरोडा यांनी विनंती केली आहे.

