संजय लांडगे,वाडा
गारगाव आश्रम शाळेत व्यवसाय मार्गदर्शन शिबीर उत्साहात संपन्न,
वाडा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा शाळेत काल १० वी व १२ वी नंतर करियरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एस.एम. बनसोडे होते.कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली,त्यानंतर विद्यार्थ्यांकडून ईश्वरस्तवन व स्वागतगीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.एस.वाघ-उच्च माध्य.शिक्षक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला.तसेच शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांमध्ये अक्षय इंगळे, अध्यक्ष शांताई नर्सिंग कॉलेज पालघर,राहुल बनसोड सहाय्यक प्राध्यापक वरिष्ठ महाविद्यालय ओंदे,प्रा.डॉ. चांदोजी गायकवाड-वरिष्ठ महाविद्यालय ओंदे,प्रा.गौरव मोहिते,विभाग प्रमुख,हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय हारोसाळे,सोनाली वेखंडे-संगणक प्रशिक्षिका वाडा,विजय डाखोरे-पोलीस उपनिरीक्षक वाडा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
अक्षय इंगळे यांनी बारावीनंतर नर्सिंग पदवी शिक्षणाची व त्यानंतर असलेल्या करियर संधीची उपस्थित विद्यार्थी व पालकांना माहिती दिली.राहुल बनसोड व प्रा.डॉ.चांदोजी गायकवाड यांनी अध्ययन क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध करियर संधीची माहिती व सखोल मार्गदर्शन केले.प्रा.गौरव मोहिते यांनी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील विविध करियर संधीची विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.श्रीम.सोनाली वेखंडे यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एम.एस.सी. -आय.टी. या कोर्सचे महत्व विशद करून सांगितले तसेच १० वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी या कोर्सला प्रवेश घेण्याचे आवाहन केले.विजय डाखोरे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या लेखी व मैदानी चाचणीच्या तयारी संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच पदवी शिक्षणानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासन सेवेत विविध अधिकारी पदापर्यंत कसे पोहोचावे,या विषयी इत्थंभूत माहिती दिली. नुकतेच १० वी व १२ वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी,त्यांचे पालक व नागरिक यांनी या करियर मार्गदर्शन कार्यक्रमाचा लाभ घेतला.या कार्यक्रमात शंभरहून अधिक विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

