Author: दीपक मोहिते

वसंत भोईर,वाडा टायर रिसायकलिंग कारखाने दिवसा बंद,रात्री सुरू… टायर रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्यांमुळे वाडा तालुक्यातील हवा दूषित झाली आहॆ.त्यामुळे वडवली गावाच्या हद्दीत असलेल्या दहा प्रदूषणकारी कारखाने पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केले होते.बंद केलेले हे कारखाने शासनाचे आदेश धाब्यावर बसवून रात्री खुलेआम चालू असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे. तालुक्यातील वडवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जुने टायर जाळून त्यापासून ऑइल व तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे.त्यातून बाहेर पडणारे प्रदूषित रासायनिक सांडपाणी हे येथील नैसर्गिक नाल्यात टाकले जात असल्याने नाल्यातील मासे मृत्यूमुखी पडतात.तर दूषित पाणी प्यायल्याने आजवर अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.या प्रदूषणाबाबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही…

Read More

सविता केळकर यांच्या फेसबुक वॉल वरून, मोटरमन दररोज नवीन मरण बघत असतो….. सीएसटीवरून शेवटची लोकल निघते,१२.३७ ला आणि ती शेवटची लोकल असते.१२ वाजून ३७ मिनिटांनी निघालेली ही लोकल तीनच्या सुमारास कर्जतला पोहोचते. तेथून ती रिटर्न निघते,साधारणपणे साडेचारच्या सुमारास.मधल्या काळात मोटरमन आणि गार्ड आराम करतात,ते त्यांच्यासाठी खास बनवलेल्या रेस्ट रुम मध्ये.प्रत्येक मोटरमन आणि लोकल गार्ड यांच्यासाठी ड्युटी अवर्स असतात,फक्त चार तास.हे चार तास ट्रेनच्या रनिंग टाईमनुसार मोजले जातात.त्यात ट्रेन कुठे व किती वेळ थांबली,वगैरे ग्राह्य धरलं जात नाही.पण त्या चार तासात पूर्ण वेळ डोळ्यात तेल घालून एकटक एका नजरेनं एकाच दिशेत सतत पाहत राहणं,योग्य अंतरावर प्रॉपर नोटिफिकेशन देणं,दर चारशे मीटरवर येणाऱ्या…

Read More

दीपक मोहिते, आ. गावित व जिल्हाधिकारी जाखड यांच्या उपस्थितीत बाधिताची बैठक संपन्न, जिल्ह्यातील डी.एफ.सी.सी. प्रकल्प,देहर्जे प्रकल्प,खडखड धरण प्रकल्प,लेंडी प्रकल्प, मुंबई – वडोदरा महामार्ग, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच एमआरव्हीसी व बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासंदर्भात सर्व आ. गावित व जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड,संबंधित अधिकारी तसेच प्रकल्पबाधित शेतकरी व नागरिक यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस विशाल खत्री, सहा.जिल्हाधिकारी डहाणू, अपुर्वा बसूर,सहा. जिल्हाधिकारी जव्हार, भूसंपादन समन्वय उपजिल्हाधिकारी महेश सागर,पुनर्वसन उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण,उपविभागीय अधिकारी वाडा,संदिप चव्हाण,प्रभारी उपविभागीय अधिकारी पालघर रविंद्र राजपूत,जिल्हा अधिक्षक, भूमी अभिलेख,नरेंद्र पाटील, देहर्जे व लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिनेश शेवाळे, अमोल फुंदे, अधिक्षक अभियंता,पाटबंधारे प्रकल्प, सहा. संचालक,नगररचना भाग्यश्री धवळसंक तसेच…

Read More

दीपक मोहिते, ” निर्लज्जपणा,” गिर गया,फिर भी टांग उपर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने जी सैन्य कारवाई केली.त्याने पाकिस्तानला त्यांची युद्धक्षमता दाखवून दिली. ७ ते १० मे दरम्यान झालेल्या चार दिवसाच्या यूद्धात पाकिस्तानने भारताकडून जबर मार खाल्ला. पाकिस्तानची सैन्य प्रतिष्ठा धुळीस मिळाली.मात्र, त्यानंतरही पाकिस्तानला अक्कल आलेली नाही. पाकिस्तानचा जिहादी मानसिकतेचा लष्कर प्रमुख असिम मुनीरने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे.इस्लामाबाद,दक्षिण आशियामध्ये भारताचे वर्चस्व कधीच मान्य करणार नाही, असं आसिन मुनीरने म्हटलं आहे.स्वतःचा देश यूद्धात हरल्यानंतरही स्वत:ला फिल्ड मार्शल पदवी लावून घेणारा आसिम मुनीर हा पहिलाच लष्करप्रमुख असावा. भारताने सिंधू जल करार स्थगित करुन पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे.भारताने केलेल्या या वॉटर…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ; ओबीसी समाजाला अनन्यसाधारण महत्व, यावर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जातीपातीवर आधारीत होतील,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या मतदारांनी महायुतीच्या अनेक उमेदवारांना मराठा आरक्षणप्रश्नी हिसका दाखवल्यानंतर महायुतीचे नेते आता सावध झाले आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीला तारले.त्यामुळे त्या निवडणुकीत जातीपातीचे राजकारण दुर्लक्षित झाले.पण लवकरच होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकामध्ये मात्र ओबीसी व इतर समाज असा सामना रंगण्याची शक्यता आहे.तसे झाल्यास आपण सारे एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचलो आहोत,असे समजायला हरकत नाही. पालघर व ठाणे जिल्ह्यात ओबीसींची लोकसंख्या जवळपास ५२ % च्या…

Read More

जव्हार,प्रतिनिधी जव्हार येथे ५०% अनुदानावर शेतकऱ्यांना भात बियाणाचे  वाटप, जव्हार येथे  परिषद सेस फंड अंतर्गत शेतकऱ्यांना ५०% अनुदानावर सुधारित भात बियाण्यांचे आ.हरिश्चंद्र भोये यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला जिल्हा परिषद पालघरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पारसकर, गटविकास अधिकारी दत्तात्रय चित्ते, सहाय्यक गटविकास अधिकारी संदेश दुमाडा, कृषी अधिकारी प्रशांत पाटील तसेच कृषी विभागातील इतर प्रमुख अधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जव्हार परिसरातील शेतकरी हे भातशेती व्यवसायावर अवलंबून आहेत. यंदा वेळेवर आणि सवलतीच्या दरात गुणवत्तापूर्ण बियाणे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहॆ. भात बियाणे वाटप कार्यक्रमा दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया…

Read More

दीपक मोहिते, अर्नाळा किल्ल्याच्या किनारपट्टीला वादळीवाऱ्याचा तडाखा ; अनेक घरांची पडझड, गेल्या काही दिवसांपासून वसई तालुक्याच्या अर्नाळा,अर्नाळा किल्ला,कळंब व राजोडी या समुद्रकिनारी वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर कायम आहे.दोन दिवसापूर्वी वेगाने वाहणाऱ्या या वादळी वाऱ्याचा मोठा फटका किनारपट्टीला बसत आहे. काल सायंकाळी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे अर्नाळा किल्ला येथील अनेक घरावरील पत्रे उडून गेले.या घटनेमध्ये सात ते आठ घरांचे मोठे नुकसान झाले आहे.५ ते १० मिनिटे झालेल्या वादळाने स्थानिक ग्रामस्थाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. विरार पश्चिमेस समुद्रकिनारी असलेल्या तीन ते चार गावात दर पावसाळ्यात येथील स्थानिक ग्रामस्थाना नैसर्गिक संकटाना तोंड द्यावे लागते.यंदाही वसई विरार मध्ये वादळीवाऱ्यासह पावसाचे सत्र सुरूच आहे. दोनच दिवसांपूर्वी प्रादेशिक…

Read More

वसंत भोईर,वाडा भात बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची झुंबड, वाडा पंचायत समितीच्या कृषी विभागातर्फे गमहाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानित भात पिकांच्या बियाणांचे वितरण करण्यात आले. दरम्यान कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत नोंदणीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती.रांगेत उभे राहून कंटाळलेल्या अनेक शेतकऱ्यांवर अखेर बियाणे न घेताच घरी परतण्याची वेळ आली.कृषी विभागाच्या या भोंगळ कारभाराचा नाहक त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला.त्यामुळे कुणबी सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रदीप हरड यांनी वाटपाची सविस्तर माहिती देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावर्षी पाऊस मे महिन्यातच दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ झाली असून,शेतीची अवजारे व बी बियाणे जमा करण्याचे काम शेतकऱ्यांनी हाती घेतले…

Read More

दीपक मोहिते, दोघा भावांनी एकत्र आले पाहिजे, अन्यथा विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती अटळ आहॆ, ” हल्लाबोल,” गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय असलेली अनेक कुटुंबे गृहकलहामुळे दुभंगली गेली.त्यामध्ये ठाकरे,पवार,मुंडे व अन्य काही कुटुंबाचा समावेश आहे.अनेक वर्षे उलटून गेल्यानंतर आता ही कुटुंबे पुन्हा एकत्र येत असल्याच्या वावड्या उठू लागल्या आहेत.पण ते एकत्र येतील,असे वाटत नाही.यावर आम्ही अनेक लेख लिहिले,कारण सत्ता, स्वार्थ व नाती,ही कधीही एकत्र नांदत नाहीत.पण या लोकांचे एकत्र येणे,हा विषय चघळायला मिळाल्यामुळे अनेक वृत्तपत्राच्या कार्यालयाने आपल्या दैनिकाचे रकानेच्या रकाने भरले.वृत्तवाहिन्या व युट्युबर मंडळींनी त्याचा पुरेपूर फायदा उचलला. त्याचवेळी आमच्या वेबपोर्टलने मात्र हे कसे अशक्य आहे,ते आपल्या लेखातून वाचकांसमोर मांडले.असो,मात्र आज ही…

Read More

दीपक मोहिते, ” सावधगिरीचा काळ ” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आगामी काळ अग्निदिव्य ठरणार आहॆ… गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी तिसऱ्यांदा देशाची धुरा शिरावर घेताना,देशासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली होती.त्याचा अनुभव पावलोपावली आपण घेत आहोत.देशासमोर असलेल्या समस्यामध्ये देशाची सुरक्षा,काश्मीर राज्यातील अस्थिरता,अतिरेकी कारवाया, आंतरराष्ट्रीय बाजारात रु.चे होत असलेले अवमूल्यन,कर्जाचा वाढता बोझा,कृषी क्षेत्राची झालेली वाताहात,देशभरात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या,वस्तू आणि सेवाकराच्या प्रचलित पद्धतीमध्ये बदल,इ.देशांतर्गत महत्वाच्या प्रश्नानी,अक्राळ विक्राळ स्वरूप धारण केले आहे.अशा स्थितीत मोदी हे गेल्या वर्षी तिसरी इनिंग खेळण्यासाठी पुन्हा मैदानात उतरले व त्यांनी विरोधकांना नामोहरम करत पुन्हा बाजी मारली.गेल्या वेळी त्यांच्या पक्षाकडे सध्या बहुमत असले तरी गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत…

Read More