Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राजकारणाच्या जीवघेण्या खेळात,पालघरवासियांची अवस्था,” सहन होत नाही आणि सांगताही येत नाही,” पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे दौरे,जनता दरबार, आढावा बैठकी व गावांना भेटी,अशा वारंवार होणाऱ्या गैरलागू उपक्रमामुळे पालघर जिल्ह्याचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत होत आहॆ.जिल्हा परिषद,जिल्हाधिकारी,प्रांत कार्यालय,तहसीलदार व पंचायत समित्या, नगरपरिषदा,नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन व उपक्रम राबवण्यात शक्ती व प्रचंड सार्वजनिक पैसा खर्ची पडत आहॆ. त्यामुळे प्रशासकीय कामकाजही दिवसेंदिवस विस्कळीत होत चालले आहॆ.या सर्व कार्यालयाचे तमाम अधिकारी व कर्मचारीवर्गाला दप्तर घेऊन पालकमंत्र्यांच्या मागे धावे लागत आहॆ.मात्र लोकांची कामे मात्र मार्गी लागत नाहीत.त्यामुळे पालकमंत्र्यांनी हा तमाशा बंद करावा,अशी मागणी करण्यात येत आहॆ. लोकांची कामे…

Read More

सफाळे प्रतिनिधी, सफाळ्यात महावितरणचा भोंगळ कारभार,ग्रामस्थ त्रस्त, महावितरणच्या सफाळे विभागात गेल्या काही दिवसापासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहॆ. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.दोन दिवसापूर्वी पालघर बिडको भागात ३३ के.व्ही.लाईन जळाल्यामुळे रात्री साडेसातच्या सुमारास सफाळे आणि आसपासच्या परिसरात खंडीत झाला.तो वीजपुरवठा तब्बल १५ तासानंतर सुरळीत झाला. सफाळे पूर्व आणि पश्चिम भागातील विविध गावापाड्यात गेल्या काही दिवसापासून सतत वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे नोकरदारवर्ग, विद्यार्थी,व्यापारी यांच्यासह बँका तसेच विविध ऑनलाईन व्यवहाराला फटका बसला आहे.महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात नागरिकांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे. सफाळे पूर्व-पश्चिम भागात अनेक गावे असून शेती वाड्या,दुग्ध व्यवसाय,करत असतात. यंदा मेच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर परिसरात सातत्याने वीजपुरवठा…

Read More

दीपक मोहिते, जागतिक पर्यावरण दिन विशेष, पर्यावरणाचे बिघडते संतुलन ; मानवाची वाटचाल विनाशाकडे, आज जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येत आहे.पर्यावरणाचे महत्व व भविष्यातील संकटे,यावर सतत विचारमंथन होणे,गरजेचे आहे.आपण सारे दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो व त्यानंतर मात्र ” ये रे माझ्या मागल्या,” असेच होत असते.यावरून असे स्पष्ट की आपल्याला केवळ ५ जून एकमेव दिवसाचे महत्व असते.या दिनी पर्यावरण विषयक कार्यक्रम व उपक्रमाची अक्षरशः रेलचेल असते.उर्वरित ३६४ दिवस आपण व आपले राज्यकर्ते या ज्वलंत विषयाकडे ढुंकूनही बघत नाहीत.त्यामुळे आपल्या देशाच्या पर्यावरणाचे संतुलन पार विस्कळीत झाले आहे.अवकाळी पाऊस,अवेळी पाऊस पडणे,दुष्काळ,अधूनमधून ओला दुष्काळ,अशा घटना आपल्या पाचवीला पूजल्या आहेत. पर्यावरण व…

Read More

वसंत भोईर,वाडा प्रदूषणामुळे मुलांचे आरोग्य धोक्यात ; तोरणे शाळा बंद ठेवण्याचा इशारा, वाडा तालुक्यातील तोरणे ग्रामपंचायत हद्दीतील मे. शिवकृपा स्टील अँड अलाइज प्रा.लि.या रासायनिक कंपनीमुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे.परिणामी,या परिसरातील नागरिकांचे व जि.प.शाळेतील मुलांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांनी या कंपनी विरोधात लेखी व तोंडी तक्रारी केल्या,मात्र कंपनी मालक त्याला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे कंपनी ठोस उपाययोजना करत नाही,तोवर शाळा बंद करण्याचा इशारा भूमिपुत्र विकास फाउंडेशनने दिला आहे. मे. शिवकृपा स्टील अन अलाईज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेतून निघणारा घातक धूर दिवसाढवळ्या हवेत सोडला जातो.या वायुप्रदूषणामुळे शाळेत शिकणाऱ्या सुमारे ५० विद्यार्थ्यांच्या आरोग्याला तसेच हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण…

Read More

दीपक मोहिते, ” निवडणूक रणसंग्राम,” स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ; जागा कमी व इच्छुकांची भाऊगर्दी, जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणूका या कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणून ओळखल्या जातात.त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्त्यांची संख्या मोठी असते.लहानातला लहान कार्यकर्ता हा देखील या निवडणुकीत इच्छुक असतो.राज्यात गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाना न्यायालयाच्या आदेशामुळे आता लवकरच मुहूर्त लागणार आहे.त्यामुळे या निवडणुकीची तयारी करीत असलेल्या कार्यकर्त्यामध्ये सध्या उत्साहाचे वातावरण आहे.दुसरीकडे महायुतीमधील तीन घटक पक्ष आगामी काळात होत असलेली ही निवडणूक युती करून लढवणार की स्वबळावर लढणार,यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.द दरम्यान मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी महायुती एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे.जागा…

Read More

सुरेश वैद्य,पालघर पालघर जिल्ह्यात जलस्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणाचे प्रशिक्षण, जलजीवन मिशन अंतर्गत ” हर घर नल से जल,” पाणी पुरवठा करण्य़ात येणार आहॆ. त्यासाठी जलस्त्रोतांना दुषित आणि प्रदुषणापासून संरक्षण देण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणांची गरज ओळखुन शासनातर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या निवड सुचीतील मुख्य संसाधन संस्थेतर्फे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जलस्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील पाच प्रतिनिधींचे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहॆ. तसेच डहाणु तालुक्यामध्येही लक्ष्मी प्लाझा हॉल,डहाणु येथेही शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.सदर प्रशिक्षणाला ग्राम पाणी पुरवठा समिती अध्यक्ष,सरपंच,ग्रामसेवक व इतर सदस्य उपस्थित होते. पाणीटंचाई दूर करणे, आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाला…

Read More

नदीम शेख,पालघर पालघर जिल्हा जमीन भरपाईसाठी राज्य मंजुरीची प्रतिक्षा, पालघर जिल्ह्यात खावडा ट्रान्समिशन प्रकल्पांतर्गत राज्य सरकारकडून जमीन भरपाईसाठी मंजुरीची प्रतीक्षा असताना,जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र पीक भरपाई मिळू लागली आहे. आत्तापर्यंत ” राईट ऑफ वे,” प्रक्रियेनुसार जव्हार,वाडा, विक्रमगड आणि भिवंडी या चार तालुक्यांतील ६६ शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे.ही भरपाई ट्रान्समिशन टॉवर्सच्या उभारणीसह सुरू असलेल्या बांधकामामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा उद्देश प्रभावित शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक आधार देणे आहे,जेणेकरून ते अडचणीच्या काळात टिकून राहू शकतील.काही शेतांत पाया घालण्याचे काम पूर्ण झाले असून,काही ठिकाणी बांधकाम अजूनही सुरू आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्यानुसार पीक भरपाई मिळत आहे. प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी…

Read More

दीपक मोहिते, “हल्लाबोल,” शिंदे गटाचे मंत्री अजित पवारांच्या मनमानी कारभारावर नाराज, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच शिवसेनेच्या मंत्र्यांची एक महत्त्वपूर्व बैठक पार पडली.ही बैठक स्वतंत्रपणे घेण्यात आली असून यावेळी शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रत्येक मंत्र्यासोबत शिंदे समोरासमोर चर्चा केली. मात्र,प्रत्येक खात्याचा आढावा घेत असताना शिंदेंच्या सर्व मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतची नाराजी बोलून दाखवली.त्यामुळे शिंदें गटाचे मंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याचे उघड झाले आहॆ.अर्थमंत्री असलेले अजित पवार हे निधीचे वाटप करताना दुजाभाव करतात,असा आरोप त्यांच्यावर सतत होत असतो. महाविकास आघाडीत असतानाही पवार यांनी अशाप्रकारचा मनमानी कारभार केला होता.त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये त्याना अर्थखाते त्यांच्याकडे देण्यात येऊ नये,अशी मागणी करण्यात…

Read More

दीपक मोहिते, ” बॉटमलाईन, ” पंतप्रधान नरेंद्र मोदी जी – ७ परिषदेला जाणार नाहीत, जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कॅनडामध्ये जी – ७ शिखर परिषद होत आहे. मात्र,आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले आहे.भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंध, तसेच,त्यांच्या सुरक्षेची चिंता आणि भारताला अद्यापपर्यंत अधिकृत निमंत्रण न आल्याची अनेक कारणे,यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्व घडामोडीवरून जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या जी – ७ शिखर संमेलनाचं भारताला अद्यापपर्यंत आमंत्रण मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यासंदर्भात अधिकृत माहीती आली नसली तरी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर यांची हत्या झाल्यानंतर भारत-कॅनडाचे संबंध बिघडले आहेत.ही पार्श्वभूमी…

Read More

संजय नेवे,विक्रमगड  विक्रमगड तालुक्यातील टेटवाली गावाला पालकमंत्र्यांची भेट, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी विक्रमगड तालुक्यातील नुकसानग्रस्त टेटवाली गावाची काल पाहणी दौरा केला.यावेळी नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबाला नुकसान भरपाई तत्काळ मिळेल,असे वाटत होते,परंतु नुकसानभरपाई न मिळाल्यामुळे बाधित कुटुंबे नाराज झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी नुकसानग्रस्तांना सीएसआर फंडातून तातडीची मदत व अन्न धान्य देण्याचे आश्वासन दिले होते. गेल्या आठवड्यात विक्रमगड तालुक्यातील टेटवालीसह नऊ गावाचे वादळी वाऱ्याने प्रचंड नुकसान केले होते.अनेक घरावरील छप्परे,कौले व पत्रे उडाले होते,तर काही घरांच्या भिंती पडल्या होत्या.या घटनेत दहा ग्रामस्थ जख्मी झाले होते. तर वीज कोसळून शेतकऱ्यांचे दोन बैलही मृत्युमुखी पडले होते. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांच्या…

Read More