दीपक मोहिते,
” बॉटमलाईन, ”
पंतप्रधान नरेंद्र मोदी जी – ७ परिषदेला जाणार नाहीत,
जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कॅनडामध्ये जी – ७ शिखर परिषद होत आहे. मात्र,आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता कमी असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाले आहे.भारत आणि कॅनडा यांच्यातील तणावपूर्ण संबंध, तसेच,त्यांच्या सुरक्षेची चिंता आणि भारताला अद्यापपर्यंत अधिकृत निमंत्रण न आल्याची अनेक कारणे,यामागे असल्याचे सांगण्यात येत आहे.
या सर्व घडामोडीवरून जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या जी – ७ शिखर संमेलनाचं भारताला अद्यापपर्यंत आमंत्रण मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.यासंदर्भात अधिकृत माहीती आली नसली तरी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर यांची हत्या झाल्यानंतर भारत-कॅनडाचे संबंध बिघडले आहेत.ही पार्श्वभूमी या सर्व घडामोडीमागे असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.
कॅनडात १५ ते १७ जून दरम्यान जी – ७ शिखर परिषदेचे आयोजन होत आहे.या शिखर परिषदेमध्ये युरोपियन समूह,आंतरराष्ट्रीय नाणे निधी,जागतिक बँक आणि संयुक्त राष्ट्रांसह अमेरिका, ब्रिटन,जर्मनी,फ्रान्स,इटली, जपान आणि कॅनडा हे प्रमुख देश सहभागी होत आहेत.दक्षिण आफ्रिका,युक्रेन आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशही या परिषदेत सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
जी – ७ शिखर परिषदेत भारताच्या उपस्थितीबाबत अद्याप शंका व्यक्त करण्यात येत आहे.भारताला जी – ७ शिखर परिषदेसाठी कोणतेही औपचारिक निमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटलं जात आहे. आणि जरी निमंत्रण मिळाले तरी, ” भारत या संमेलनास उपस्थित राहण्यास इच्छुक नाही,असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटले आहे.कॅनडामध्ये होणाऱ्या जी – ७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी यांच्या कोणत्याही संभाव्य भेटीबद्दल आपल्याकडे “ कोणतीही माहिती नाही,असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अलिकडेच सांगितले होते.दरम्यान
कॅनडाच्या नवीन सरकारने भारताशी संबंध पुन्हा सुरळीत करण्याचे संकेत दिले आहेत. आहे.नवनिर्वाचित मार्क कार्नी यांचे सरकार भारतासोबत मजबूत भागीदारी निर्माण करण्यास उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहॆ.परंतु खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमुळे संबंधांवर परिणाम झाल्याचेही त्यांनी मान्य केले आहे,असे कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अंकिता आनंद यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले आहे.
गेल्या वर्षी कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारत सरकारचा सहभाग असल्याचा थेट आरोप केला होता.त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध ताणले गेले.दरम्यान,भारताने या संदर्भातील सर्व आरोप फेटाळले असून ते निराधार असल्याचे म्हटले आहे.

