सुरेश वैद्य,पालघर
पालघर जिल्ह्यात जलस्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणाचे प्रशिक्षण,
जलजीवन मिशन अंतर्गत ” हर घर नल से जल,” पाणी पुरवठा करण्य़ात येणार आहॆ. त्यासाठी जलस्त्रोतांना दुषित आणि प्रदुषणापासून संरक्षण देण्यासाठी स्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरणांची गरज ओळखुन शासनातर्फे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
केंद्र शासनाच्या निवड सुचीतील मुख्य संसाधन संस्थेतर्फे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जलस्त्रोत बळकटीकरण व शाश्वतीकरण अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील पाच प्रतिनिधींचे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहॆ.
तसेच डहाणु तालुक्यामध्येही लक्ष्मी प्लाझा हॉल,डहाणु येथेही शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.सदर प्रशिक्षणाला ग्राम पाणी पुरवठा समिती अध्यक्ष,सरपंच,ग्रामसेवक व इतर सदस्य उपस्थित होते.
पाणीटंचाई दूर करणे, आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाला प्रोत्साहन देणे, असा उद्देश असून,या माध्यमातून ग्रामीण समुदायांमध्ये सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी चालना देण्यात येत आहॆ.जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम सन २०१९ पासून राबवण्यात येत आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक कार्याक्रमांतर्गत घरगुती नळ कनेक्शनाद्वारे सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे,असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

