- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” जिल्हानिर्मिती,” प्रस्तावित नवीन २१ जिल्हे ; विकासाला गती।मिळणार.. येत्या २६ जाने. प्रजासत्ताक दिनी राज्यात २१ नव्या जिल्ह्याची निर्मीती होण्याची दाट शक्यता आहे.या नव्या जिल्ह्याचा समावेश झाल्यानंतर राज्यातील जिल्ह्याची एकूण संख्या ५७ इतकी होणार आहे. १ मे १९६० रोजी राज्य निर्मितीच्या वेळेस एकूण २५ जिल्हे होते.गेल्या ६५ वर्षात नव्याने ११ जिल्ह्याची भर पडली आहे.आता राज्य सरकार अनेक जिल्ह्याचे विभाजन करून नवीन २१ जिल्हे स्थापणार आहे.त्यामध्ये भुसावळ,संगमनेर,श्रीरामपूर,अहेरी,महाड,शिर्डी,मंडणगड,जव्हार,पुसद,अचलपूर, साकोली,बारामती,खामगाव,कल्याण,मीरा-भाईंदर, कळवण,किनवट,मालेगाव,अंबेजोगाई,उदगीर व माणदेश,यांचा त्यामध्ये समावेश आहे.नवा जिल्हा स्थापन करताना राज्यशासनाच्या तिजोरीवर प्रचंड आर्थिक ताण पडत असतो.त्यामुळे राज्यसरकारने ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नव्याने पालघर जिल्हा निर्मितीचा प्रश्न सुमारे तीन दशके लोंबकळत ठेवला…
सुनीता चव्हाण,पालघर, जलजीवन मिशन संदर्भात जिल्हास्तरीय प्रशिक्षण, जल जीवन मिशन पुर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजनांचे हस्तातंरण करून संचालन,देखभाल व दुरूस्ती विषयक ग्रामपंचायतीमधील पाच निवड केलेल्या प्रतिनिधींचे दुसऱ्या टप्यातील ( स्तर-3 ) चे दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन काल बायफ कार्यालय जव्हार येथे करण्यात आले होते.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रशिक्षण संपन्न झाले. जल सुरक्षक,ग्रामपंचायत अधिकारी,बचत गट सदस्य, आशा वर्कर,ग्रामपंचायत सदस्य आदी प्रशिक्षणार्थीनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. शासनाच्या धोरणानुसार ग्रामीण भागातील जनतेला शाश्वत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रत्येक व्यक्तिला ५५ लिटर प्रमाणे कुटूंबाला शाश्वत शुद्ध पाणी पुरवठा जलजीवन मिशन योजनेतून करावयाचे आहे. यामध्ये सर्वांनी यामध्ये…
जव्हार प्रतिनिधी, वाहतुकीचे नियम व सुरक्षा विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ” वाहतुकीचे नियम व सुरक्षा,” या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास वसई विभागाचे सहा.आरटीओ,जे.टी.झांबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम यांनी भूषवले.जे.टी.झांबरे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमांचे महत्त्व आणि रस्त्यावरील सुरक्षितता याविषयी परिपूर्ण माहिती दिली.त्यानी अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन कसे करावे,याविषयी विद्यार्थ्यांना सांगितले.प्राचार्य डॉ.एम.आर.मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विविध अपघात आणि ते टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर आपली मते मांडली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र कदम यांनी केले.त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेच्या विविध बाबींबद्दल अधिक जागरूकतेचे आवाहन…
संदीप जाधव,बोईसर बोईसरचा कला – क्रीडा महोत्सव भावी पिढीसाठी प्रेरणादायी… राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात मोठी औद्योगिक वसाहत,अशी तारापूर बोईसर एमआयडीसीची ओळख आहे. बोईसरमध्ये लहान मध्यम व मोठे असे मिळून एकूण दीड हजारांहून अधिक उद्योग आहेत.त्यामुळे देशाच्या विविध प्रांतातील कामगार व मजूर बोईसरला रोजगारासाठी येत असतात.अशा औद्योगिक नगरीत सांस्कृतिक उपक्रम सुरु करुन नव्या पिढीतील शाळकरी विद्यार्थी व विद्यार्थींनीच्या सुप्त कलागुणांना संधी व उत्तम सांस्कृतिक व्यासपीठ मिळवून देण्याचे काम महाराष्ट् स्पोर्टस एज्युकेशन अकादमी या संस्थेतर्फे करण्यात येत असते.यंदा या चार दिवसीय ” बोईसर कला क्रीडा महोत्सव ” उपक्रमात पालघर जिल्ह्यातील १६७ शाळांमधून १८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.ही…
दीपक मोहिते, ” साहित्यजत्रा,” १८ जाने.रोजी वसईत ” ३० वा साहित्य जल्लोष,” येत्या १८ जाने.रोजी वसई येथे ३० व्या ” साहित्य जल्लोष,” या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात ग्रंथदिंडी,कथकथन,कविता सादरीकरण,ग्रंथप्रकाशन व पारितोषिक वितरण, इ.साहित्य कार्यक्रमाची रेलचेल आहे. वसई रोड येथील वायएमसीए सभागृह माणिकपूर,येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे,यांच्या हस्ते होणार आहे.पहिल्या सत्रात सकाळी ९.०० वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.त्यानंतर १०.०० वाजता साहित्य जल्लोष,या सोहळ्याचे उद्घाटन होईल,त्यानंतर ग्रंथप्रकाशन पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल. दुसऱ्या सत्रात ” अभिजात मराठी भाषा आणि आपली जबाबदारी,” महेश म्हात्रे,संजय पाटील,ऍड.प्रदीप सामंत,सॅबी कोरिया,राणी दुर्वे,आदी मान्यवर सहभागी होणार…
संजय लांडगे,वाडा, क्रीडा क्षेत्राला सुगीचे दिवस येणार आहेत- खा.डॉ.हेमंत सावरा, आपला देश क्रीडाक्षेत्रात अव्वल व सर्वोत्कृष्ठ असून तो ऑलम्पिकमध्येही असायलाच हवा,या दृष्टीकोनातून क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.पण त्याच बरोबर राज्य सरकार व जिल्हा क्रीडा नियोजन कडूनही प्रयत्न होत आहेत. पालघर व वाडा तालुक्यातील कोणे येथे क्रीडा संकुल होणार आहे,त्याच्या तांत्रिक बाबी दूर झाल्यामुळे हे क्रीडा संकून लवकरच खेळाडूंसाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सामाजिक संस्था व सी.एस.आर.चा निधी देखील मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे.पुढील काळात क्रीडा क्षेत्राला सुगीचे दिवस येणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी केले. ते वाडा तालुक्यातील अंभई येथील आत्मा मालिक शाळेच्या वार्षिक क्रीडा…
विरार प.येथे ९.फेब्रू.रोजी विरार रन २०२५,चे आयोजन, विराट फाऊंडेशन,अमेय क्लासिक क्लब आणि यंगस्टार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विरार रन २०२५ रवि.९ फेब्रु.रोजी होणार आहे.तर या मिनी मॅरॅथॉनमध्ये १.५ की.मी.३ की.मी आणि १० की.मी.दौड असेल.वयोगट १० ते १२,१२ ते १४ आणि १४ ते १५,असे मुले व मुलींचे गट असतील तर या गटासाठी ३ कि.मी.ची रन आयोजित करण्यात आली आहे.तर त्यावरील वयोगटासाठी १० कि.मी.ची रन ठेवण्यात आली आहे.तसेच १ कि.मी.ची फन रन ठेवण्यात आली असून ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी वॉकॅथॉन आयोजित करण्यात आली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विरार रनमध्ये पर्यावरण,निसर्गाचा समतोल, मानसिक आरोग्य,नशा मुक्ती असे विविध सामाजिक संदेश देण्यात येणार…
संजय नेवे,विक्रमगड, पौर्णिमा पवार यांच्यासमवेत तालुक्यातील १२०० महिलांचा भाजपात प्रवेश, काल विकमगड तालुका भाजपतर्फे महिलांचा महापक्ष प्रवेश व मेळावा आयोजन करण्यांत आले होते.यावेळी पौर्णिमा पवार व सुंनदा तरे या प्रमुख कार्यकर्त्या समवेत १२०० महिलांनी एकाचवेळी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष व आमदार चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी या कार्यक्रमास महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर या उपस्थित होत्या.मंत्री झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम असल्याचे सांगत पालघर जिल्हा व ग्रामीण भागात यापुढे महिलांचे आरोग्य सेवा चांगल्या करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी पालघर जिल्हाचा आढावा घेतला.या भागात बाल विवाहामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याने बाल विवाह थांबले पाहीजेत व त्यासाठी…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन,” भाग क्र.२,( अंतिम ) गयाराम होऊनही पदरात काही पडणार नाही…. कालच्या पहिल्या भागात महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या हालचालीवर प्रकाशझोत टाकला होता.आज आपण भावी काळात आयाराम – गयारामची स्थिती कशी राहील ? यावर आपण बोलणार आहोत.दोन दिवसापूर्वी विरार येथे बहुजन विकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी केलेल्या जोशपूर्ण भाषणानंतर वातावरण पार बदलून गेले आहे.पण राजकारणात कधीही आणि काहीही घडू शकते,अशा शक्यतेमुळे आगामी काळात काही मूठभर मंडळी कशा हालचाली करतात,यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे. आज ही जी मंडळी पडद्याआड आहेत,ते आज ना उद्या समोर येतील.जे काही मूठभर लोक तळ्यात-मळ्यात आहेत,त्यांनी उघडपणे…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे व्यवसाय करिअर मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन, के.व्ही.हायस्कूल व आर. वाय.ज्युनियर कॉलेज येथे व्यवसाय करिअर मार्गदर्शन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहाचे पहिले पुष्प ज्येष्ठ समुपदेशिका व शाळेच्या १९८६ दहावी बॅचच्या विद्यार्थिनी वास्तुविशारद मंजुषा कुलकर्णी यांनी गुंफले. याप्रसंगी शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य अवधूत गावड यांनी उच्चविद्याविभूषित,वीस वर्षापेक्षा अधिक काळ करियर कौन्सिल क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनुभवसंपन्न व शेकडो तरुण तरुणींनी देशात व परदेशात शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध करून भविष्य उज्ज्वल करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मंजुषा कुलकर्णी आहेत.त्या हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनी असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.अशा शब्दात त्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या श्रेष्ठ महाराष्ट्र पोर्टलला भेट देऊन देश विदेशातील शिक्षणाच्या…
