जव्हार प्रतिनिधी,
वाहतुकीचे नियम व सुरक्षा विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रम,
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी ” वाहतुकीचे नियम व सुरक्षा,” या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास वसई विभागाचे सहा.आरटीओ,जे.टी.झांबरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते,तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. मेश्राम यांनी भूषवले.जे.टी.झांबरे यांनी विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियमांचे महत्त्व आणि रस्त्यावरील सुरक्षितता याविषयी परिपूर्ण माहिती दिली.त्यानी अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन कसे करावे,याविषयी विद्यार्थ्यांना सांगितले.प्राचार्य डॉ.एम.आर.मेश्राम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विविध अपघात आणि ते टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर आपली मते मांडली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र कदम यांनी केले.त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेच्या विविध बाबींबद्दल अधिक जागरूकतेचे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अभिजीत बांबरे यांनी केले. तर प्रा.मंगेश भले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तरांद्वारे वाहतूक सुरक्षेच्या वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा झाली.सुमारे २०० विद्यार्थी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभागी झाले आणि या मार्गदर्शन सत्राचा लाभ घेतला.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी जागरूकता निर्माण करण्यात यशस्वी ठरला.

