संजय नेवे,विक्रमगड,
पौर्णिमा पवार यांच्यासमवेत तालुक्यातील १२०० महिलांचा भाजपात प्रवेश,
काल विकमगड तालुका भाजपतर्फे महिलांचा महापक्ष प्रवेश व मेळावा आयोजन करण्यांत आले होते.यावेळी पौर्णिमा पवार व सुंनदा तरे या प्रमुख कार्यकर्त्या समवेत १२०० महिलांनी एकाचवेळी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष व आमदार चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी या कार्यक्रमास महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर या उपस्थित होत्या.मंत्री झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम असल्याचे सांगत पालघर जिल्हा व ग्रामीण भागात यापुढे महिलांचे आरोग्य सेवा चांगल्या करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी पालघर जिल्हाचा आढावा घेतला.या भागात बाल विवाहामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्याने बाल विवाह थांबले पाहीजेत व त्यासाठी प्रत्येकाने ठोस भुमिका बजावली पाहीजे.बाल विवाह थांबवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तर आ.चित्रा वाघ यांनी महिलांना मार्गदर्शन करतांना म्हणाल्या,प्रथम पौर्णिमा पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले.केंद्र व राज्य शासनाने महिलांसाठी अनेक योजना तयार केल्या आहेत त्या योजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.त्यामुळे महिलांना कुणावर अवलंबुन न राहाता स्वतः सक्षम राहीले पाहीजे.स्वतःबरोबर कुटुंबाचा विकास साधला पाहीजे,तसेच कोणत्याही महिलेला कोणतीही अडचण उपस्थित झाल्यास वा कुणी त्रास देत असल्यास ११२ क्रमांकावर तक्रार केल्यास तत्काळ पोलिस त्या ठिकाणी हजर राहुन तुम्हांस सुरक्षा प्रदान करतील,अशी तरतूद सरकारने केली आहे.येणारा प्रत्येक दिवस आपला आहे.तुम्ही भाजपा या विशाल पक्षात प्रवेश केल्याने तुम्हांला सन्मान दिला जाईल.महिलांची ताकद प्रचंड आहे,असे स्पष्ट करत उपस्थितांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.तर पौर्णिमा पवार यांनी जोमाने काम करण्याची ग्वाही दिली.
यावेळी व्यासपिठावर बाबजी कोठोळे खा.डॉ.हेंमत सवरा,विक्रमगड विधानसभा आ.हरिश्चद्र भोये,महिला प्रमुख वीणाताई देखमुख,भाजपा जिल्हाध्यक्ष भरत राजपूत,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पंकज कोरे,सुरेखा थेतले,कृषी सभापती संदिप पावडे,सुशिल औसरकर,तालुका अध्यक्ष दिपक पावडे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पुंडलिक भानुशाली,भाजपा तालुका कार्यकारणी भाजपा महिला कार्यकारणी युवा मोर्चा पदाधिकारी व भाजपाचे इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

