दीपक मोहिते,
” साहित्यजत्रा,”
१८ जाने.रोजी वसईत ” ३० वा साहित्य जल्लोष,”
येत्या १८ जाने.रोजी वसई येथे ३० व्या ” साहित्य जल्लोष,” या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात ग्रंथदिंडी,कथकथन,कविता सादरीकरण,ग्रंथप्रकाशन व पारितोषिक वितरण, इ.साहित्य कार्यक्रमाची रेलचेल आहे.
वसई रोड येथील वायएमसीए सभागृह माणिकपूर,येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे,यांच्या हस्ते होणार आहे.पहिल्या सत्रात सकाळी ९.०० वाजता ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे.त्यानंतर १०.०० वाजता साहित्य जल्लोष,या सोहळ्याचे उद्घाटन होईल,त्यानंतर ग्रंथप्रकाशन पारितोषिक वितरण सोहळा पार पडेल.
दुसऱ्या सत्रात ” अभिजात मराठी भाषा आणि आपली जबाबदारी,” महेश म्हात्रे,संजय पाटील,ऍड.प्रदीप सामंत,सॅबी कोरिया,राणी दुर्वे,आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.तिसऱ्या सत्रात कविसंमेलन होणार असून प्रसाद कुलकर्णी,प्रिया बापट,नंदू सावंत,हेमांगी नेरकर व धनश्री गणात्रा,यांना निमंत्रित करण्यात आले आहे.तसेच या कविसंमेलनात अनेक स्थानिक कवी व कवियत्रीना संधी देण्यात आली आहे.या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ.पल्लवी बनसोडे व सुषमा राऊत या दोघी संभाळणार आहेत.

