संजय लांडगे,वाडा,
क्रीडा क्षेत्राला सुगीचे दिवस येणार आहेत- खा.डॉ.हेमंत सावरा,
आपला देश क्रीडाक्षेत्रात अव्वल व सर्वोत्कृष्ठ असून तो ऑलम्पिकमध्येही असायलाच हवा,या दृष्टीकोनातून क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.पण त्याच बरोबर राज्य सरकार व जिल्हा क्रीडा नियोजन कडूनही प्रयत्न होत आहेत.
पालघर व वाडा तालुक्यातील कोणे येथे क्रीडा संकुल होणार आहे,त्याच्या तांत्रिक बाबी दूर झाल्यामुळे हे क्रीडा संकून लवकरच खेळाडूंसाठी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सामाजिक संस्था व सी.एस.आर.चा निधी देखील मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे.पुढील काळात क्रीडा क्षेत्राला सुगीचे दिवस येणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी केले. ते वाडा तालुक्यातील अंभई येथील आत्मा मालिक शाळेच्या वार्षिक क्रीडा महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलचा वार्षिक आत्मक्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये संकुलातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय,राज्यस्तरीय,विभाग,
जिल्हा व तालुकास्तरीय,अशा सर्वच पातळीवर मिळवलेल्या प्राविण्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पदक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
आत्मक्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खा.डॉ.हेमंत विष्णू सवरा,वाडा तालुका क्रीडा केंद्रप्रमुख प्रशांत पारगावकर, रोटरी क्लब ऑफ वाडाचे अध्यक्ष प्रफुल्ल बोकंद,जिल्हा सचिव अमित पाटील, संकुलाचे अध्यक्ष विलास आक्रे पाटील,कार्याध्यक्ष अभिजीत पाटील,विश्वस्त श्रीमती शोभाताई राऊत,गावचे पोलीस पाटील भाऊ निपुर्ते, गावच्या सरपंच पल्लवी गोवारी,रोटरी क्लब ऑफ वाडाचे वैद्यकीय सल्लागार अमेय पाटील,माजी उपप्राचार्य दांडेकर कॉलेज पालघर संजय महाजन,महाराष्ट्र प्रदेश कृषी आघाडी राजेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संकुलातील क्रीडा शिक्षक प्रदीप पाटील,हॉकी कोच तथा क्रीडा शिक्षक विकास माने, विद्यार्थी व अध्यापक वृंद, विभागप्रमुख,सर्व सांस्कृतिक विभाग,वसतिगृह विभाग, शालेय शिक्षकेतर सेवकवृंद व तसेच,स्टोअर व भोजनालय व विभाग यांनी बहुमोल कामगिरी बजावली.अतिशय उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भावेश पाटील व प्रदीप पाटील यांनी केले.

