विरार प.येथे ९.फेब्रू.रोजी विरार रन २०२५,चे आयोजन,
विराट फाऊंडेशन,अमेय क्लासिक क्लब आणि यंगस्टार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विरार रन २०२५
रवि.९ फेब्रु.रोजी होणार आहे.तर या मिनी मॅरॅथॉनमध्ये १.५ की.मी.३ की.मी आणि १० की.मी.दौड असेल.वयोगट १० ते १२,१२ ते १४ आणि १४ ते १५,असे मुले व मुलींचे गट असतील तर या गटासाठी ३ कि.मी.ची रन आयोजित करण्यात आली आहे.तर त्यावरील वयोगटासाठी १० कि.मी.ची रन ठेवण्यात आली आहे.तसेच १ कि.मी.ची फन रन ठेवण्यात आली असून ६० वर्ष व त्यावरील जेष्ठ नागरिकांसाठी वॉकॅथॉन आयोजित करण्यात आली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विरार रनमध्ये पर्यावरण,निसर्गाचा समतोल, मानसिक आरोग्य,नशा मुक्ती असे विविध सामाजिक संदेश देण्यात येणार आहेत.तर लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.रवि. ९ फेब्रु.सकाळी ६.०० वाजता विरार रन यशवंत नगर अमेय क्लासिक क्लब विरार ( प.) येथून सुरू करण्यात येईल. तर नागरिकांनी जास्तीत जास्त क्रीडा व शारीरिक आरोग्य याकडे लक्ष दिलं पाहिजे,असा संदेश देत,ही मिनी मॅरेथॉन गेल्या १२ वर्षांपासून सुरू आहे,यंदाचे विरार रनचे हे १३ वे वर्ष आहे.यंग स्टार ट्रस्टचे अध्यक्ष माजी आ.हितेंद्र ठाकूर,माजी महापौर राजीव पाटील,युवामाजी आ.क्षितिज ठाकूर,प्रथम महिला महापौर प्रवीणा ठाकूर,बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील व सर्व विभागीय मंडळे यांच्या मार्गदर्शनाखाली विरार रन आयोजित करण्यात आली आहे.तर आपण विरार रन मध्ये उपस्थित राहून आपला सहभागी व्हावे,

