- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अधिवेशनात सध्या चाललंय तरी काय ? राज्याचे अधिवेशन आता संपत आले आहे,मात्र या अधिवेशनात किती कामकाज झाले ? हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे.दररोज होणारा गोंधळ,आरोप- प्रत्यारोपाचा गदारोळ इ.कारणामुळे प्रत्यक्षात किती विषयावर चर्चा झाली हे सांगणे कठीण आहे.सत्ताधारी पक्ष हा महागाई,कायदा व सुव्यवस्थेची ढासळती स्थिती,ग्रामीण भागातील जनतेचे मूलभूत प्रश्न व शेतकऱ्यांच्या आत्महत्या इ.प्रश्नावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध हातखंडे वापरत आहे.सत्ताधारी पक्षाची ही चाल ओळखून विरोधी पक्षानी वागायला हवे,पण तसे होताना पाहायला मिळत नाही.विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाच्या सापळ्यात अडकत आहे. ऍक्शनवर रिऍक्शनच्या या खेळात राज्याचे मात्र अपरिमित नुकसान होत आहे.अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च कोटी रु.च्या…
दीपक मोहिते, ” उपरती,” हर्ष सेन मृत्यूप्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.. वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासन किती मुर्दाड आहे,हे त्यानी नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयावरून अधोरेखित झाले आहे.काल त्यांनी महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या खेळाच्या मैदानावर व्यवसायिक कार्यक्रमांना परवानगी देणार नाही,असा निर्णय जाहीर केला.हा निर्णय स्तुत्य असला तरी त्यासाठी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला,याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. चार दिवसापूर्वी वसई पूर्वेस एव्हरशाइन सिटी येथे असलेल्या खेळाच्या मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात हर्ष सेन नावाचा तरुण वीजेचा झटका बसून मृत्यूमुखी पडला.या घटनेला जबाबदार असलेला आयोजक,ठेकेदार व संबधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी पोलिसांकडे केली.त्यानंतर…
संजय लांडगे, वाडा सारशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आरती ठाकरे यांची बिनविरोध निवड, वाडा तालुक्यातील सारशी मालोंडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आरती अनिल ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे.मावळत्या उपसरपंच उज्वला बांगर यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच ॲड.दिनेश कोदे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलवण्यात आली.यावेळी उपसरपंच पदासाठी आरती अनिल ठाकरे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ठाकरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिपाली कोदे,नरेश फडवले, उज्वला बांगर,जितेश कोंढारी उपस्थित होते.नवनिर्वाचित उपसरपंच आरती ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फटाक्यांच्या आतषबाजीत ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत…
सुनीता मराठे,बोरिवली बोरिवली येथे येथील गोखले हायस्कुलमध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, गोखले एज्युकेशन सोसायटीचे ना.गोपाळ कृष्ण गोखले हायस्कूल,रोटरी क्लब ऑफ मुंबई नॅशनल पार्क बोरिवली ( पूर्व ) व शाळेचा अभ्युदय माजी विद्यार्थी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचे वार्षिक आरोग्य तपासणी शिबीर नुकतेच पार पडले. या शिबिरात ३६५ विद्यार्थ्यांची नेत्र चिकित्सा , दंत चिकित्सा व रक्तगट चिकित्सा करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ मुंबई नॅशनल पार्कचे खजिनदार राजगौडा पाटील,नेत्र शल्यचिकित्सक डॉ.मानस गोरे,आर.एन.शिंदे ॲन्ड सन्सच्या नेत्र तज्ज्ञ डॉ.निता शिंदे,दंततज्ज्ञ डॉ.मंगेश भट, डॉ.यतीन अल्हार,प्रिस्टीन हेल्थ केअरच्या प्रतिनिधी प्रिती खानविलकर,अमन कुमार,नूर शेख,अभुदय माजी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष राजेश म्हात्रे,सदस्य कुलकर्णी,महेश मोगरे,अस्मिता घोण व श्रुतिका सुर्वे यांचे…
अनंत भोईर, पालघर पालघर जिल्ह्यात एकाच दिवशी ६० हजार २८८ घरकुलांचा शुभारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवस कृती कार्यक्रम अंतर्गत पालघर जिल्ह्यात ६० हजार ८९२ घरकुलांना मंजुरी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी ६० हजार २८८ घरकुले मंजुर करणार आली आहेत.घरकुल लाभार्थी संवाद अभियान २०२५ स्वप्न घरकुलाचे साथ शासनाची” या उपक्रमांतर्गत आज अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांसोबत संवाद साधला.या ऐतिहासिक अभियानाचा शुभारंभ आज मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख,गटविकास अधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाभरात पार पडला. तसेच जिल्ह्यात उमेद…
संजय नेवे,विक्रमगड सेवा विवेक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट, बांबू हस्तकलेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सशक्तीकरणासाठी कार्यरत असलेल्या सेवा विवेक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची सदिच्छा भेट घेतली.या भेटीदरम्यान संस्थेच्या कार्याचा आढावा घेत विविध सामाजिक आणि विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.गेल्या १४ वर्षांपासून सेवा विवेक संस्था आदिवासी बांधवांना सन्मानजनक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने महामहीम राष्ट्रपतींना पालघरच्या प्रसिद्ध बांबू कलेतून साकारलेली भेटवस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले.राष्ट्रपती महोदया यांनी संस्थेच्या कार्याबद्दल कौतुक व्यक्त करत यापुढील वाटचालीसाठी मौलिक मार्गदर्शन केले. ही भेट सकारात्मक आणि प्रेरणादायी ठरली.सेवा विवेक संस्थेला राष्ट्रपतींनी सदिच्छा भेट…
वसंत भोईर,वाडा चांबळे गावात ग्रामदेवतांची सोंगे व महिषासुर वध,ठरताहेत आकर्षण, तालुक्यातील चांबळे गावात गेल्या अनेक वर्षापासून रंगपंचमी उत्सव साजरा केला जातो.यंदा ” दिलेर डाकू,” हे लोकनाट्य सादर करण्यात आले.हनुमान प्रसादिक मंडळाने हे लोकनाट्य बसवले होते. त्याला गावातील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले. आज सकाळी ७.०० वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत ग्रामदेवतेची सोंगे काढण्यात आली होती. दरवर्षी होणाऱ्या रंगपंचमी उत्सवाला व त्यानिमित्ताने स्थानिक कलाकार सादर करीत असणाऱ्या नाटकाला शतकाची परंपरा आहे. रंगपंचमी पंचमी उत्सव व त्या निमित्ताने सादर केले जाणारे नाटक व ग्रामदेवतांची सोंगे गेल्या चार ते पाच पिढ्यांपासून अखंडपणे सुरू आहे. दुसऱ्या दिवशी गावदेवी, वेताळ,वीरभद्र या ग्रामदेवतांची सोंगे काढण्यात येतात.यावेळी सादर होणाऱ्या…
जव्हार, प्रतिनिधी, हिरडपाडा माध्यमिक आश्रम शाळेचा ” मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा,” अभियानात भरीव यश, महाराष्ट्र शासनाच्या ” मुख्यमंत्री माझी,शाळा सुंदर शाळा,” – टप्पा 2 या उपक्रमांतर्गत पालघर जिल्ह्यातील शाळांची स्पर्धात्मक मूल्यमापन प्रक्रिया पार पडली.या अभियानात जव्हार तालुक्यातील श्री गगनगिरी आदिवासी शिक्षण प्रसारक संस्था संचलित, एकलव्य माध्यमिक आश्रमशाळा,हिरडपाडा या शाळेने तालुका स्तरावर प्रथम क्रमांक आणि जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे. राज्यातील शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण करून आदर्श शाळांचे उदाहरण उभे राहावे,यासाठी शासनाने ५ ऑगस्ट २०२४ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर हे अभियान राबवले.पालघर जिल्ह्यातील तब्बल ३ हजार १९८ शाळा या अभियानात सहभागी झाले होते.…
वसंत भोईर,वाडा कोकणातील खनिज संपत्ती भांडवलदारांच्या घशात, पालघर – डहाणूपासून सिंधुदूर्गपर्यंत असणारे विविध तेलसाठे,बॉक्साइट व अन्य खनिज संपत्ती ही अदानी – अंबानी या भांडवलदारांच्या घशात घालण्याचा डाव राज्य सरकारचा आहे.प्रचंड बहुमत असलेले भाजप सरकार,हे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी धार्मिक ध्रुविकरण करून समाजात फूट पाडत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज वाडा येथे केली. काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हर्षवधन सपकाळ यांनी आज प्रथमच पालघर जिल्ह्याचा दौरा केला.यावेळी वाडा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी वरील भूमिका मांडली.राज्यात शेतमालाला भाव नाही,शेतकरी प्रचंड संकटात आहे,बेरोजगारीने परमोच्च टोक गाठले आहे,सरकारकडे विकासासाठी पैसा नाही. राज्य सरकारने मांडलेल्या प्रचंड तुटीच्या…
वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्यातील जाळे गावात फुलला सूर्यफुलांचा मळा, शेतीची आवड, दांडगी इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर वाडा तालुक्यातील जाळे या खेडेगावातील तरुण शेतकऱ्याने यावर्षी आपल्या शेतीत किलबिया देणाऱ्या सूर्यफुलाचे उत्तम पीक घेतले आहे. शेतीची आवड असलेल्या जाळे येथील प्रदीप गोरे यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेऊन शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला.नंतर सुशिक्षित बेरोजगार म्हणून कर्ज घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय ही सुरू केला.अपार मेहनतीने त्यांचे हे दोन्ही व्यवसाय सध्या उत्तम प्रकारे सुरू असून,या व्यवसायाच्या जोरावर त्यांनी कुडूस बाजारपेठेत आता दूध डेअरी सुरू केली. खरीप हंगामात भातशेती व रब्बी हंगामात हरभरा,वाल, तूर,मुग,अशा विविध धान्याचे पीक घेणाऱ्या प्रदीप गोरे यांनी यावर्षी रब्बी हंगामात तेलबिया…
