- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, उष्णतेत प्रचंड वाढ : राज्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, राज्यात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.उन्हात बचाव व्हावा,यासाठी संबंधित विभागाने उष्णतेच्या लाटांपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक माहिती जाहीर आहे.मार्च ते मे या तीन महिन्यात राज्यात उष्णतेमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने खालील गोष्टींची काळजी घ्यावी,असे आवाहन केले आहे. काय करावे – तहान लागली नसली,तरी जास्तीत जास्त पाणी प्यावे, हलके,पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल्स,छत्री/टोपी,बूट व चपल यांचा वापर करावा, प्रवासात पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी,छत्री किंवा रूमालाचा वापर करावा,तसेच ओल्या कपड्याने डोके,मान व चेहरा झाकून घ्यावा, शरीरातील…
संजय लांडगे,वाडा ट्रक मागून धडकल्यामुळे दुचाकीवरील एकजण जागीच ठार तर एक जखमी, वाडा तालुक्यातील सोनाळे व कळंभे गावादरम्यान काल सायंकाळी साडे सहाच्या सुमारास दोघेजण दुचाकीवरून कामानिमित्त सोनाळ्याहून काळभ्यांच्या दिशेने जात असताना येथील वळणावर एका ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.या घटनेत दुचाकी वर बसलेल्या दोघांपैकी एक जण ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे करण घाटाळ ( वय२१ ) असे नांव आहे.तर अरुण शरद वाघ ( वय२१ ) हा गंभीर जखमी जखमी झाला असून त्याच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हे दोघे सोनाळे (खुर्द) गावठाण येथील…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शिंदे व फडणवीस यांच्यामध्ये शह – काटशहाचे राजकारण सुरु, पालघर जिल्ह्याचे पाललमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुसक्या बांधण्यासाठी सध्या कंबर कसली आहे.त्यांनी ठाण्यात घेतलेल्या जनता दरबाराला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,तो पाहून एकनाथ शिंदे सावध झाले व त्यांनी आपले विश्वासू सहकारी व ठाण्याचे खा.नरेश म्हस्के यांना मैदानात उतरवले आहे. या खा.मस्के यांनी गणेश नाईक यांच्या नवी मुंबई या बालेकिल्यात जाऊन ” खासदार आपल्या दारी,” हा गणेश नाईक यांच्या जनता दरबाराला छेद देणारा उपक्रम यशस्वीपणे राबवला.विशेष म्हणजे खा.म्हस्के यांच्या उपक्रमालाही लोकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट…
दीपक मोहिते, … आणि तथाकथित पर्यावरणवादी पुन्हा खडबडून जागे झाले… एकेकाळी सरकार नागरीकरणाला अमर्याद परवानग्या देत हरित वसईचे लचके तोडत असल्याचा आरोप करणाऱ्या तथाकथित पर्यावरणवादी नेत्यांनी रान उठवले होते.आता त्याच नेत्यांवर कपाळावर हात मारून घ्यायची पाळी आली आहे.वसई विरार शहर महानगरपालिकेने आपल्या हद्दीत डम्पिंग ग्राउंड प्रस्तावित केल्यामुळे बिल्डर,राजकारणी व पर्यावरणवादी विरोधासाठी सरसावले आहेत. वसई विरार उपप्रदेशाच्या विकास क्षेत्रामध्ये महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ ( १ ) मधील तरतुदीनुसार काही किरकोळ सुधारणा करण्याचे ठरवले आहे.त्यानुसार महानगरपालिकेने क्षेत्रातील मौजे गास,गिरीज,चुळणे,आचोळे व दिवाणमान येथे असलेल्या मिठागरात एकूण १ हजार ५५० एकर जमिनीवर मल:प्रक्रिया,डम्पिंग ग्राउंड व अन्य आरक्षणे टाकली आहेत.…
भूषण वर्तक,केळवे, पालघर जिल्हा परिषदेच्या २१५ कामांचे पारदर्शक पद्धतीने वाटप, पालघर जिल्हा परिषदेच्या जिल्हा कामवाटप समितीकडून २७ फेब्रु.रोजी कामवाटप सभेचे आयोजन करण्यात आले.यासाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी मंजुरी दिलेली १० लाख रुपयांपर्यंतची एकूण २१५ कामे बांधकाम विभागाच्या कार्यालयाच्या नोटीस फलकावर ठळकपणे प्रकाशित करण्यात आली होती. जिल्हा कामवाटप समितीचे अध्यक्ष,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव व कार्यकारी अभियंता जागृती संखे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सभा हुतात्मा सभागृह,जिल्हा परिषद,पालघर येथे पार पडली. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि मजूर कामगार सहकारी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या प्रक्रियेत सहभागी झाले होते.पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने लॉटरी प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण २१५ विकासकामांचे…
दीपक मोहिते, विरार येथे झोपडपट्टी पुनर्वसन कार्यशाळा संपन्न, मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण-ठाणे आयोजित वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजना कार्यशाळेमध्ये विविध विभागाचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण विविध शासकीय, निमशासकीय,खाजगी जमिनीवर झोपडपट्टीधारकांचे राहणीमान प्राकृतिकदृष्ट्या उंचावण्यासाठी पक्की घरे देऊन मूलभूत नागरी व सामाजिक सुविधा देण्याबाबत कार्यशील आहे.वसई विरार शहरात येऊ घातलेल्या या पुनर्वसन प्रकल्पाचे नियोजनबद्ध आखणी व प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सदर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रा मध्ये झोपडपट्टीवासियांच्या दैनंदिन जीवनातील समस्या उदा. पक्की घरे,पाणीपुरवठा, वीजपुरवठा,क्रीडांगणे, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या व होणारी गैरसोय, शौचालये,घरांचे अपुरे क्षेत्रफळ,यासारख्या विविध समस्यांचा लेखाजोखा घेऊन…
वसंत भोईर, ब्लु बेरी कंपनीच्या निषेधार्थ श्रमजीवी संघटनेचे ठिय्या आंदोलन, मौजे- वावेघर ता.वाडा जि.पालघर येथील ब्लु बेरी ऍग्रो प्रॉडक्ट प्रा.लि.ही कंपनी मानवी वस्तीपासून अवघ्या १५ फुट अंतरावर आहे. शासकीय नियमानुसार औद्योगिक कंपनी व मानवी वसाहतीमध्ये कमीत कमी ५०० मी.अंतर असणे आवश्यक आहे.मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून कंपनी सुरु असून या कंपनीमधून दुर्गंधी युक्त रसायन मिश्रित सांडपाणी सोडत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या बोअर दूषित झाल्या आहेत.या दूषित पाण्यामुळे तसेच कंपनीमधून पडणाऱ्या दुर्गंधीमुळे लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्यामुळे श्रमजीवी संघटनेने मौजे – वावेघर येथे बिऱ्हाड मोर्चा काढला व वाडा तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत वस्ती जवळ असणारी सदर कंपनी बंद…
संजय लांडगे,वाडा वाडा येथील मुलीच्या अपहरणाचा पोलीसांनी लावला छडा, काल वाडा शहरातील संजय गांधी नगर येथून अपहरण झालेल्या मुलीच्या आईने वाडा पोलीस ठाण्यात आपली आठ वर्षाची मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती.तीच्या फिर्यादी वरून वाडा पोलिसांनी तात्काळ तपास करून करून आरोपी व मुलीला शोधून काढले. वाड्यातील संजय गांधी नगर येथे तीच्या राहत्या घरासमोर संध्याकाळी खेळत असलेल्या मुलीला फुस लाऊन एका इसमाने पळवुन नेले होते.यासंबधी तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वाडा पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना ठाण्यात बोलावुन त्यांना अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या.तसेच जनसंवाद अभियान अंतर्गत सर्व ग्रुपवर अपहरण झालेल्या मुलीचा फोटो व…
दीपक मोहिते, ” संपादकीय,” बलाढ्य भाजपला दक्षिणात्य राज्यात गेल्या दहा वर्षात पाय रोवता आले नाहीत, भाजप,आजच्या घडीला देशात बलाढ्य पक्ष म्हणून उदयाला आला असला तरी पक्षात सर्वत्र आलबेल आहे,अशी स्थिती नाही.अनेक राज्यात भाजपला इतर प्रादेशिक पक्षाच्या कुबड्या घेल्याशिवाय निवडणुका लढवता येत नाही.दाक्षिणात्य राज्यात आजही त्यांना आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे.केरळ,तामिळनाडू राज्यात त्यांची पाटी कायम कोरीच राहीली तर आंध्रप्रदेशमध्ये चन्द्रबाबू नायडू यांच्या तेलगू देशमचा टेकू घ्यावा लागला.तेलंगणा व कर्नाटक,या दक्षिणेतील दोन महत्वाच्या राज्यात त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून धडपड सुरू आहे.पण यश त्यांना हुलकावणी देत आहे.हिमाचल प्रदेशात गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांच्या पाठीला माती लावली.बिहार राज्यात त्यांना त्यांचे मित्र नितीश कुमार…
शुभम सावंत, विवा महाविद्यालयात “मराठी राजभाषा गौरव दिन,” मोठ्या उत्साहात साजरा.. मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे आता तर मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून देखील दर्जा लाभलेला आहे. या मातृभाषेचा गौरव म्हणून व ज्येष्ठ कवी, साहित्यिक, नाटककार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके कुसुमाग्रज… त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रु.रोजी साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य विश्वात दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून देशभरात हा दिवस ” मराठी राजभाषा गौरव दिन,” म्हणून साजरा केला जातो.या दिनाचे औचित्य साधून विवा महाविद्यालयातील मराठी वाङ्ममय मंडळ व ग्रंथालय विभाग,यांच्या संयुक्त विद्यमाने ” मराठी भाषा गौरव दिन,” दिमाखात साजरा करण्यात…
