वसंत भोईर,वाडा
वेताळ केसरी बोरांडा मानकरी ठरला उदय शेळके,
तालुक्यातील बोराडा येथे कुस्तीचा फड रंगला होता.या कुस्ती स्पर्धेला राज्यासह बाहेरील राज्यातील सुमारे १५० मल्लांनी हजेरी लावली होती.यामध्ये मुलीही सहभागी झाल्या होत्या.तर स्पर्धेत ८० कुस्त्या रंगल्या.उदय शेळके वेताळ केसरी बोरंडाचा मानकरी ठरला.वेताळ क्रीडा मंडळ बोरांडा यांच्यावतीने या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नामवंत मल्लांच्या कुस्त्या या परिसरातील प्रेक्षकांना बघायला मिळाल्या.पुणे येथील सह्याद्री संकुलनाचा मल्ल उदय शेळके याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.त्याला चांदीची गदा व २१ हजार रु.चे प्रथम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमास विरार येथील सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ पाटील,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक निलेश भोईर,उद्धव सेनेचे गोविंद पाटील,सदानंद बागुल,शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद बागुल,भाजपाचे शशिकांत पाटील,अरुण अधिकारी आदीसह सह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

