Author: दीपक मोहिते

नाशिक प्रतिनिधी, किल्ले रामशेज येथे श्रमदान व स्वच्छता मोहीमेचे आयोजन, भारतीय जनता युवा मोर्चा आणि मावळा मित्र मंडळ यांच्यातर्फे आयोजित किल्ले रामशेज येथे श्रमदान आणि स्वच्छता मोहीम पार पडली. या मोहिमेत तरुणांसह किल्ले दुर्ग संवर्धन सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नाशिक पेठ गुजरात महामार्गावर असलेल्या स्वराज्यातील रामशेज किल्ल्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व असून छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मुघलांनी केलेल्या हल्ल्यात रामशेजचा किल्लेदार आणि शत्रूच्या तुलनेत संख्येने खूपच कमी असलेल्या शूर मावळ्यांनी हा किल्ला सहा वर्षे लढवून मोघलांना नामोहरम केल्याचा इतिहास आहे. या किल्ल्याकडे सरकारचे फारसे लक्ष नसले तरी दुर्गप्रेमींनी हल्ली या किल्ल्याकडे विशेष लक्ष दिले आहे.गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता राखण्याच्या…

Read More

मनिष धानू,डहाणू डहाणू येथे पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू, डहाणू येथे ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे काल दोन विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू झाला.सदर दुर्घटना डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीतील सुकड आंबा शिरसून पाडा येथे घडली आहे. या गावात जलजीवन मिशन योजने अंतर्गत टाकीचे बांधकाम सुरु आहे.येथे बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीचे अर्धवट अवस्थेत आहे. तसेच हे बांधकाम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे असुन काल अचानक स्लॅब कोसळल्यामुळे दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर अन्य एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. यामध्ये हर्षला रशू बागी आणि संजना प्रकाश राव या सातवीत शिकणाऱ्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर…

Read More

संजय लांडगे,वाडा पालघर येथे संचमान्यता रद्द करण्यासाठी शिक्षकांचे आंदोलन, पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे काल शिक्षक महामोर्चा आंदोलन करण्यात आले.यावेळी १५ मार्च २०२४ ची संचमान्यता रद्द करण्यासाठी सर्व शिक्षक संघटना यांनी अन्यायकारक शासन निर्णया विरोधात एल्गार पुकारला.यावेळी विविध संघटनाचे शिक्षक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला पाठिंबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते.या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष राजू महाले यांनी केले. यावेळी शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. १५ मार्च २०२४ शासन निर्णयानुसार २०२४-२५ संच मान्यता अंतिम करण्यात आली आहे.शिक्षण कायद्यातील तरतुदीच्या व २८ ऑगस्ट २०१५ सुधारित ८ जाने.२०१६ विसंगत,अशा शासन निर्णयाने शाळांमध्ये शिक्षकच असणार…

Read More

सुखदेव दुमाडा,मनोर मनोर येथे बिरसायत भवन सेवा प्रकल्प उद्घाटन व सामुदायिक विवाह सोहळा संपन्न, मनोर येथेआदिवासी एकता मित्रमंडळाच्या बिरसायत भवन सेवा प्रकल्पाचे उद्घाटन सोहळा पार पडला. पद्मश्री चैत्राम पवार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संघचालक सुरेश भगेरिया,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पालघर जिल्हा संघचालक नरेश मराड,खा. डॉ.हेमंत सवरा,आ.राजन नाईक,आ.हरिश्चंद्र भोये, आ.राजेंद्र गावित,महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर,एमवायएडी फाउंडेशनचे हरेश शाह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. भाजपचे संतोष जनाठे यांनी यावेळी प्रास्ताविक केले.त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.याप्रसंगी बिरसायत भवन येथे विविध १० सेवा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.या वेळेस मंचावर नंदकुमार पाटील,संदीप पावडे,राघव देशमुख,महावीर सोलंकी,चंदन सिंग,उद्योजक व देणगीदार पीयुष शाह,राहुल…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्य सरकार असुन नसल्यासारखे,आता हलाल मटण व औरंगजेबची कबर,राज्यासमोरचे ज्वलंत विषय, राज्यात सध्या जे काही चाललंय ते पाहून सर्वसामान्य माणसाचे डोके पार चक्रावून गेले आहे.राज्यात अनेक प्रश्न व समस्या आ वासून उभे असताना आपले सरकार व आपण गेल्या निवडणुकीत आपली फसगत करून घेत निवडून दिलेले लोक आज हलाल मटण,अकबर व त्याची कबर,अशा फालतू विषयात अकला पाजळू लागले आहेत.गेल्या सहा दशकात फुले,शाहू,आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र इतका रसातळाला गेल्याचा अनुभव कधीच आला नव्हता. आपले अपयश झाकण्यासाठी सरकार अनावश्यक विषय उकरून काढत जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे.दुर्देवाने त्यांच्या या कुटील कारस्थानाला आपणही बळी पडत आहोत. एकेकाळी प्रथम क्रमांकावर असलेले…

Read More

नाशिक प्रतिनिधी, नाशिक येथे हिंदू एकतातर्फे शिवपुतळ्यांना अभिवादन व महाआरती, हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ ट्रस्टतर्फे हिंदू तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने शहरातील नाशिकरोड, सीबीएस,पंचवटीसह सर्व शिवरायांच्या पुतळ्यांना सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. द्वारका येथे भव्य देखावा साकारण्यात आला आणि छत्रपती शिवरायांना सामूहिक मुजरा करून येथे महाआरती करण्यात आली. या सोहळ्याला शहरातील विविध भागांतून नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली. कार्यक्रमास मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील, गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष समीर शेटे, माजी नगरसेवक शाहू खैरे,हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या प्रियांका…

Read More

वसंत भोईर,वाडा नित्कृष्ट दर्जाच्या पाईपमुळे पाणीयोजना अडचणीत, जलजीवन मिशन योजनेअंतर्गत विक्रमगड तालुक्यातील खांड गावाकरीता असलेल्या पाणी पुरवठा योजनेसाठी पुरवठादार कंपनीकडून पुरवण्यात आलेल्या एचडीपी पाईप अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे निघाले आहेत.विशिष्ट दाबावर पाणीपुरवठा केल्यानंतर हे पाईप फुटत आहेत. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे.या संदर्भात ठेकेदाराने संबंधित पुरवठादार कंपनी विरोधात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. विक्रमगड तालुक्यातील खांड ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.या योजनेसाठी एचडीपीई पाईप पुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्राधिकृत केलेल्या मे.सेठी अँड सन्स इंडस्ट्रीज या पुरवठादार कंपनीने पुरवठा केलेले पाईप हे…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्यातील मे.ब्लूबेरी अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स कंपनी बंद करण्याचे आदेश, वाडा तालुक्यातील वावेघर येथील मेसर्स ब्लूबेरी ॲग्रो प्रॉडक्ट्स कंपनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.ही कंपनी सतत नियम व कायद्याचे उल्लंघन करत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. पाणी ( प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण ) अधिनियम,१९७४ च्या कलम ३३ अ अंतर्गत कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.योग्य आणि कार्यक्षम प्रदूषण नियंत्रण साधने बसवणे व पाणी व हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे बंधनकारक होते.परंतू संमतीच्या अनेक अटींचे कंपनीकडून उल्लंघन झाले आहे. या उद्योगातील आढळलेल्या प्रमुख त्रुटी… अद्याप सुधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ( इटीपी ) कार्यान्वित…

Read More

सचिन परब,विरार वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत स्वच्छता रँकिंग स्पर्धेला सुरुवात… वसई विरार शहर महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभाग, संयोगी संस्था अलाईट सोल्युशन सर्विसेस यांच्या संयुक्त सहकार्याने स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ वसई विरार अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी,स्वच्छता रँकिंग स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेमध्ये,शाळा, महाविद्यालये,हॉटेल, रुग्णालय,भाजी मार्केट,मॉल, सोसायटी,शासकीय कार्यालय,खाजगी कार्यालय इ. सहभागी झाले आहेत. वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागाने जनजागृती मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम राबवणे सुरू केले आहे.या उपक्रमाचा मुख्य उद्देश शहरातील नागरिकांना स्वच्छता पर्यावरण आणि कचरा व्यवस्थापनाबद्दल जागरूक करणे आहे.स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे विविध संस्था आणि ठिकाणांसाठी सर्वोत्तम कार्यगतिक…

Read More

मनिष म्हात्रे,वसई वस‌ईत शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य चलचित्र देखावा, शिवस्मृती प्रातिष्ठाण आणि शिवसेना नवघर पूर्व शाखेतर्फे वस‌ई पुर्व नवघर येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी माता तलवार हाती देतानाचा २० फुट उंच चलचित्र देखावा साकारण्यात आला होता. वसई विधानसभा संघटक व अध्यक्ष शशीभूषण शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालघर जिल्हा प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर,लोकसभा संघटक पंकज देशमुख,वसई तालुका प्रमुख प्रथमेश राऊत,काका साहेब मोटे, शहर प्रमूख संजय गुरव,माजी विरोधी पक्ष नेते विनायक निकम जिल्हा सचिव राजाराम बाबर,जिल्हा संघटक किरण चेंदवणकर,नम्रता वैती, नालासोपारा विधानसभा संघटक सुरेंद्र सिंग,उप जिल्हा प्रमूख जनार्दन मात्रे,दिलीप…

Read More