सुखदेव दुमाडा,मनोर
मनोर येथे बिरसायत भवन सेवा प्रकल्प उद्घाटन व सामुदायिक विवाह सोहळा संपन्न,
मनोर येथेआदिवासी एकता मित्रमंडळाच्या बिरसायत भवन सेवा प्रकल्पाचे उद्घाटन सोहळा पार पडला. पद्मश्री चैत्राम पवार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संघचालक सुरेश भगेरिया,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पालघर जिल्हा संघचालक नरेश मराड,खा. डॉ.हेमंत सवरा,आ.राजन नाईक,आ.हरिश्चंद्र भोये, आ.राजेंद्र गावित,महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर,एमवायएडी फाउंडेशनचे हरेश शाह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
भाजपचे संतोष जनाठे यांनी यावेळी प्रास्ताविक केले.त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला.याप्रसंगी बिरसायत भवन येथे विविध १० सेवा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.या वेळेस मंचावर नंदकुमार पाटील,संदीप पावडे,राघव देशमुख,महावीर सोलंकी,चंदन सिंग,उद्योजक व देणगीदार पीयुष शाह,राहुल बंब,कल्पेश बोहरा, भावेश बोहरा,मनोज डोकानिया,लालाजी गुप्ता,रोहित पवार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बिरसायत भवन उभारण्यासाठी काम केलेले विश्वकर्मा,देणगीदार व आदिवासी एकता मित्र मंडळाला मार्गदर्शन करणाऱ्या जिल्ह्यातील विविध १६ सेवा संस्थांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सर्व महिला पुरुष कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेत

