वसंत भोईर,वाडा
वाड्यातील मे.ब्लूबेरी अॅग्रो प्रॉडक्ट्स कंपनी बंद करण्याचे आदेश,
वाडा तालुक्यातील वावेघर येथील मेसर्स ब्लूबेरी ॲग्रो प्रॉडक्ट्स कंपनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत.ही कंपनी सतत नियम व कायद्याचे उल्लंघन करत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
पाणी ( प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण ) अधिनियम,१९७४ च्या कलम ३३ अ अंतर्गत कंपनी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.योग्य आणि कार्यक्षम प्रदूषण नियंत्रण साधने बसवणे व पाणी व हवा प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे बंधनकारक होते.परंतू संमतीच्या अनेक अटींचे कंपनीकडून उल्लंघन झाले आहे.
या उद्योगातील आढळलेल्या प्रमुख त्रुटी…
अद्याप सुधारित सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ( इटीपी ) कार्यान्वित न करणे,सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प योग्य व व्यवस्थितपणे न चालवणे प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट बॉयलरच्या राखेवर पाइपद्वारे सोडणे,प्रक्रिया न केलेले सांडपाणी उघड्या विहिरीजवळच्या जमिनीत आणि बांधकाम सुरू असलेल्या खड्ड्यात सोडणे,प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यासाठी मोटार व पाइप असलेली टाकी उभारणे,उद्योग परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रक्रिया न केलेले सांडपाणी सोडण्यासाठी पाइप बसवणे,इ.कारणामुळे. मंडळाने याआधीही दोन वेळा उद्योग बंद करण्याचे आदेश दिले होते.परंतु तुम्ही सातत्याने उल्लंघन करत आलात.संयुक्त तपासणी अहवालानुसार सांडपाण्यातील प्रदूषक तत्वे संमतीत ठरवलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आहेत.संमतीच्या अटी क्र.२८ नुसार तुम्ही झाडांची लागवड केलेली नाही.वरील सर्व गैरप्रकार केल्याप्रकरणी तुम्हाला तात्काळ उत्पादन थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.हा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सक्षम प्राधिकरणाच्या मान्यतेने दिला आहे.

