मनिष धानू,डहाणू
डहाणू येथे पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू,
डहाणू येथे ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे काल दोन विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू झाला.सदर दुर्घटना डहाणू तालुक्यातील चळणी ग्रामपंचायत हद्दीतील सुकड आंबा शिरसून पाडा येथे घडली आहे.
या गावात जलजीवन मिशन योजने अंतर्गत टाकीचे बांधकाम सुरु आहे.येथे बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीचे अर्धवट अवस्थेत आहे. तसेच हे बांधकाम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे असुन काल अचानक स्लॅब कोसळल्यामुळे दोन विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर अन्य एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे.
ही घटना काल सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली. यामध्ये हर्षला रशू बागी आणि संजना प्रकाश राव या सातवीत शिकणाऱ्या दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेली आणखी एक विद्यार्थिनी थोडक्यात बचावली.अपूर्ण अवस्थेत असलेल्या या टाकीच्या स्लॅबवर मुली खेळत असताना स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला.यामध्ये साधारणपणे या मुली ३० फूट उंचीवरून खाली पडल्या.यामध्ये हर्षला आणि संजना यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांच्यासोबत असलेली एक विद्यार्थिनी स्लॅबला अडकल्यामुळे तिचा जीव वाचला.
स्थानिकांचा ठेकेदारावर संताप,नित्कृष्ट कामे केल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थाकडून करण्यात येत आहेत.
या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, पालक आणि स्थानिक नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.या पाण्याच्या टाकीचे काम हरेश बोरवेल कंपनीच्या ठेकेदाराने केले आहे.मात्र,या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक ग्रामस्थाचे म्हणणे आहे.
दरम्यान मयत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
या दुर्घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून,ठेकेदाराला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी,अशी मागणी करण्यात येत आहे.

