नाशिक प्रतिनिधी,
नाशिक येथे हिंदू एकतातर्फे शिवपुतळ्यांना अभिवादन व महाआरती,
हिंदू एकता आंदोलन पक्ष प्रणित शहीद भगतसिंग क्रांतीदल मंडळ ट्रस्टतर्फे हिंदू तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने शहरातील नाशिकरोड, सीबीएस,पंचवटीसह सर्व शिवरायांच्या पुतळ्यांना सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
द्वारका येथे भव्य देखावा साकारण्यात आला आणि छत्रपती शिवरायांना सामूहिक मुजरा करून येथे महाआरती करण्यात आली. या सोहळ्याला शहरातील विविध भागांतून नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे उपस्थिती लावली.
कार्यक्रमास मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील, गणेशोत्सव महामंडळ अध्यक्ष समीर शेटे, माजी नगरसेवक शाहू खैरे,हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या प्रियांका कैलास ताते हीचा जाहीर सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष किरणसिंग पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

