मनिष म्हात्रे,वसई
वसईत शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य चलचित्र देखावा,
शिवस्मृती प्रातिष्ठाण आणि शिवसेना नवघर पूर्व शाखेतर्फे वसई पुर्व नवघर येथे शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी माता तलवार हाती देतानाचा २० फुट उंच चलचित्र देखावा साकारण्यात आला होता. वसई विधानसभा संघटक व अध्यक्ष शशीभूषण शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पालघर जिल्हा प्रमुख प्रवीण म्हाप्रळकर,लोकसभा संघटक पंकज देशमुख,वसई तालुका प्रमुख प्रथमेश राऊत,काका साहेब मोटे, शहर प्रमूख संजय गुरव,माजी विरोधी पक्ष नेते विनायक निकम जिल्हा सचिव राजाराम बाबर,जिल्हा संघटक किरण चेंदवणकर,नम्रता वैती, नालासोपारा विधानसभा संघटक सुरेंद्र सिंग,उप जिल्हा प्रमूख जनार्दन मात्रे,दिलीप चेंदवणकर,शहर समन्वयक रश्मी राव,जशिंता फिंच, शिवसेने पदाधिकारी,महिला आघाडी,युवा सैनिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक शिवसैनिकांचा हातभार लागला.

