- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
Author: दीपक मोहिते
अनंत नगरकर,बोईसर, पालघर येथे भाजपचे संगठनपर्व संपन्न,सदस्य नोंदणीला प्रचंड वेग, भारतीय जनता पार्टीच्या पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची संघटन पर्व आढावा बैठक आज पालघर येथे पार पडली.भाजपने राज्यात संघटनपर्व या उपक्रमाच्या माध्यमातून सदस्य नोंदणी मोहिमेला चांगलाच वेग दिला आहॆ. संघटनपर्व अंतर्गत राज्यभरातून दीड कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.या अनुषंगाने भाजपा परिवारातील प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन संपर्क करण्यावर भर द्यावा, असे आवाहन यावेळी भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पालघर येथे झालेल्या संघटन पर्व कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले. या बैठकीला भाजपा प्रदेश उपाध्यक्ष…
दीपक मोहिते, निवडणूक निकाल ; विश्लेषण, दिल्ली विधानसभा निवडणूक ; भाजपची प्रचंड विजयाच्या दिशेने मुसंडी, अपेक्षेप्रमाणे भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे.आज सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासून भाजपने आघाडी घेतली होत, ती शेवटपर्यंत त्यांनी टिकवून धरली.या लढतीत आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनाही चढउतार पाहावे लागले.सकाळी ११.०० वाजपर्यंत भाजप – ४३,आम आदमी पार्टी – २७ व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – ०,असे बलाबल निर्माण पाहायला मिळाले. दिल्ली विधानसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांनी दिल्लीची सत्ता भाजपच्या ताब्यात जाईल,असा अंदाज व्यक्त केला होता.तो आज झालेल्या मतमोजणीत तंतोतंत खरा ठरला आहे.भाजपच्या विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या देखील पिछाडीवर पडल्या होत्या.माजी…
संजय नेवे,विक्रमगड, राज्यस्तरीय आदिवासी आढावा समितीची विक्रमगड येथे शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठक, राज्यस्तरीय आदिवासी विकास आढावा समितीची विक्रमगड तालुक्यातील आदिवासी योजनेचा आढावा घेण्यासाठी विक्रमगड पंचायत समिती हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत आदिवासी विभागातर्फे विविध यंत्रणाना देण्यात येणारा निधी आदिवासींचा विकासासाठी योग्यरीत्या खर्च केला जात आहे का ? याची पडताळणी व माहिती घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी बांधकाम विभागा अंतर्गत ग्रामीण भागात रस्त्यांच्या जाळ्यासाठी लाखो रु.चा निधी आदिवासी विभाग देत असून या निधीचा फायदा ग्रामीण मिळतो का ?याविषयी आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.विक्रमगड तालुक्यामध्ये रस्त्यासंदर्भात अनेक तक्रारी या बैठकीत मांडण्यात आल्या.त्यामुळे येणाऱ्या काळात…
मनिष धानू,डहाणू, पहिल्याच कासा महोत्सवाला पर्यटकांचा उदंड प्रतिसाद, पालघर जिल्ह्यात कृषी,फलोत्पादन व आदिवासीच्या विविध संस्कृती,याचे यथार्थ दर्शन घडवणारे विविध महोत्सवाची मांदियाळी पाहायला मिळते.डहाणू,चिकू व त्यानंतर आता कासा महोत्सवाचा यामध्ये समावेश आहे.काल पहिल्या कासा महोत्सवाचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.या कार्यक्रमास खासदार,आमदार,राजकीय नेते,वरिष्ठ पोलीस, शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.काल पहिल्याच दिवशी पर्यटकांनी या महोत्सवाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.हा महोत्सव ९ फेब्रु.पर्यंत चालणार आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कासा येथे यंदा पहिल्यांदाच कासा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.स्थानिक आदिवासी समाजाची कलाकृती व संस्कृतीचे दर्शन घडावे,त्यांच्या उत्पादीत मालाला बाजारपेठ मिळावी,असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवाचे उदघाटन…
शुभांगी शिंदे,नाशिक, महिला तक्रार निवारण समितीच्या कार्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी – विजया रहाटकर, महिलांना आपल्या कार्यालयात भयमुक्त व सुरक्षित वातावरण मिळाले, तर त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कामातून दिसू शकेल.कार्यालयात असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची आहे.त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातून महिला तक्रार समितीच्या कामकाजाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,असे आवाहन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज दुपारी आयोजित कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून ( प्रतिबंध, मनाई व निवारण ) अधिनियम २०१३ अन्वये गठीत करण्यात आलेली अंतर्गत समितीबाबत आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अवर सचिव शालिनी रस्तोगी, जिल्हाधिकारी जलज…
दीपक मोहिते, ” बॉटमलाईन, ५ लाख लाडक्या बहिणी ठरल्या सावत्र बहिणी, सहा महिन्यांपूर्वी ज्या लाडक्या बहिणींवर धनवर्षाव झाला होता,त्या लाडक्या बहिणींवर आता संक्रात आली आहे.महायुती सरकारने सुमारे ५ लाख लाडक्या बहिणींना आता सावत्र बहिणी ठरवल्या आहेत.आणखी किती बहिणींना महायुतीचे सरकार सावत्र बहीण ठरवणार आहेत,देवजाणे ? गेल्या डिसें.महिन्यात या योजनेचा लाभ देताना लाडक्या बहिणींची आकडेवारी २ कोटी ४६ लाख इतकी होती,ती जाने.२०२५ मध्ये २ कोटी ४१ लाखावर आली.निवडणूकीच्या तोंडावर महायुती सरकारने ही योजना कार्यान्वित करून तमाम विरोधी पक्षांना चारी मुंड्या चित केले.या योजनेसाठी येणारा प्रचंड खर्च हा राज्याला परवडणारा नाही,हे माहीत असतानाही महायुतीच्या नेत्यांनी या योजनेची धुमधडाक्यात अंमलबजावणी केली.त्याचे सकारात्मक परिणाम…
संजय लांडगे,वाडा, खा.सावरा यांनी केली मनरेगाच्या अकुशल कामगारांच्या थकीत निधीची मागणी, आज खा. सवरा यांनी केंद्रीय ग्रामीण विकास कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराज चौहान यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन त्यांना दिले. मनरेगा अंतर्गत पालघर जिल्ह्यातील अकुशल मजुरांचे थकित देयक निधी मिळावे, यासाठी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ.हेमंत विष्णू सवरा यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ( मनरेगा ) अंतर्गत पालघर जिल्ह्यातील अकुशल मजुरांचे थकित देयक निधी त्वरित मुक्त करण्याची विनंती केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज चौहान यांना केली. २६ कोटी ४० लाख इतकी थकबाकी असून मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहॆ.त्यामुळे कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम…
संजय लांडगे,वाडा, सोशल मीडियाच्या वापराबाबत वाडा पोलिसांचे मार्गदर्शन, पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या जनसंवाद अभियान अंतर्गत वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांनी वाडा येथील रियल ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. या सत्रात त्यांनी विशेषतः सोशल मीडियाच्या सुरक्षित आणि जबाबदारीपूर्ण वापरावर भर दिला.आपल्या मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात म्हणाले,सोशल मीडिया हे एक प्रभावी साधन असले तरी त्याचा चुकीचा वापर गंभीर परिणाम घडवू शकतो.विद्यार्थ्यांना सोशल मीडियावरील गोपनीयता, वैयक्तिक माहिती,फोटो, लोकेशन यांसारखी माहिती शेअर करताना दक्षता घेणे आवश्यक आहे.साइबर गुन्ह्यांची ओळख,फेक अकाउंट्स,फिशिंग,सायबर बुलींग यासारख्या धोकादायक गोष्टींपासून सावध राहण्याचे महत्व पटवून दिले. जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने वापर हा महत्वाचा असून कोणतीही…
अविनाश मढवी,नालासोपारा, ९ फेब्रू.रोजी नालासोपाऱ्यात फनस्ट्रीट संडे, वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा विभाग व जागरुक नागरिक संस्था व नारी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रवि.९ फेब्रु.रोजी नालासोपारा पश्चिमेकडे फनस्ट्रीटचे आयोजन करण्यात आले आहे.मोबाईल आणि संगणकाच्या युगात दिवसें दिवस मैदानी खेळाकडे लहान मुलांसह तरुणांचा कल कमी होताना दिसत आहे. नागरिकांना लहानपणी त्यांनी खेळलेल्या सर्व खेळाचा आनंद घेता यावा,त्यांच्यात खेळ व व्यायामाची आवड निर्माण व्हावी,यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने फनस्ट्रीट या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांर्तगत एकाच ठिकाणी अनेक पारंपारिक व इतर खेळात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहॆ.या फनस्ट्रीटच्या आयोजनामुळे वसई विरार शहरामधील…
शुभांगी शिंदे, मालेगाव महानगरपालिकेत अग्निशमन प्रतिबंधक व जीवसंरक्षक प्रणाली कार्यान्वित.* मालेगाव महानगरपालिकेकडून दोन वर्षापूर्वी ३० खाटांचे अलहज हारून अन्सारी हॉस्पिटलच कार्यान्वित करण्यात आले होते.यापूर्वी या महानगरपालिकेत प्राथमिक स्वरूपाची अग्निशमन यंत्रणा अस्तित्वात होती.पंरतु सदर यंत्रणा चालु नसल्याचे बाब मुख्य अग्निशमन अधिकारी यानी आयुक्त तथा प्रशासक रविंद्र जाधव यांचे निदर्शनास आणुन दिली.त्यानंतर आयुक्तानी महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जिवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ अन्वये अग्निप्रतिबंधक उपाययोजना कार्यान्वित करण्या कामी मुख्य अग्निशमन अधिकारी यांना सुचना केल्या.त्यानंतर अग्निशमन विभागाकडून ई – निविदा प्रक्रिया राबवण्यात येवून अग्नि प्रतिबंधक उपाययोजनेचे काम पुर्ण झाले. आयुक्त तथा प्रशासक महोदयांच्या उपस्थितीत मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी त्याची तपासणी नुकतीच…
