वसंत भोईर,वाडा
वनहक्क सहा.व तालुका व्यवस्थापक यांच्या मानधनात वाढ करा,
जिल्हा समन्वयक वनहक्क सहाय्यक व तालुका व्यवस्थापक,या कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांच्या मानधनात अवश्यक ती वाढ करण्यात यावी,अशी मागणी पालघरचे खा.डाॅ.हेमंत सवरा यांनी आदिवासी विकासंत्री अशोक ऊईके यांच्याकडे केली आहे.
जिल्हा कार्यालय पालघर येथे जिल्हा व्यवस्थापक,जिल्हा रामन्वयक वनहक्क राहाय्यक,तालुका व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत असलेले कर्मचारी हे आदिवासी जनतेकरीता आदिवासी जिल्ह्यात वनहक्क कायद्यांतर्गत वनहक्काबाबतच्या कामासाठी गेली १२ ते १५ वर्षांपासून कार्यरत आहेत.सदर कर्मचाऱ्याची आदिवासी विकास विभाग यांचे अंतर्गत वनहक्काच्या कामासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात नियुक्ती झाली आहे.वनहक्क कायद्यांतर्गत काम करत असताना कामाचे स्वरूप पाहता त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे.तरी या तुटपुंज्या मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह होणे शक्य होत नाही.त्यामळे त्यांच्या मानधनात पुरेशी वाढ करण्यात यावी.सदर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मान्य करण्यासंदर्भात आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करावी,असे आदिवासी विकासमंत्री यांना दिलेल्या निवेदनात खा.सवरा यांनी मागणी केली आहे.

