भरत जोशी,मुंबई
चॅम्पियन्स ट्रॉफी : दुबई येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध न्यूझीलंड अशी लढत होणार…
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत काल न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारल्यानंतर ९ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत व न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे. हा सामना दुबई येथे खेळला जाणार आहे.हे दोन्ही संघ यापूर्वी किती वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये एकमेकांसमोर आले आहेत,त्रयस्थ ठिकाणी किती वेळा एकमेकांशी भिडले आणि कोणत्या संघाचा वरचष्मा राहिला ? हे सर्वप्रथम जाणून घेऊया.
चॅम्पियन्स ट्रॉफीमधील प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर एकदिवसीय सामन्यांमध्ये एकमेकांविरुद्ध ११९ सामने खेळले गेले.यामध्ये भारताने ६१ वेळा तर न्यूझीलंडने ५० वेळा विजय मिळवला आहे. यापूर्वी,दोन्ही संघ त्र्ययस्थ ठिकाणी ३१ वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत, ज्यामध्ये दोघांनीही प्रत्येकी १५ वेळा विजय मिळवला आहे.एक सामना अनिर्णीत राहिला.गेल्या १० सामन्यांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर भारत खूप पुढे असल्याचे दिसून येते.गेल्या १० सामन्यांमध्ये भारताने ५ वेळा आणि न्यूझीलंडने ३ वेळा विजय मिळवला आहे,त्यापैकी २ सामन्यांचे निकाल अनिर्णीत राहिले.तथापि,भारताने आपल्या घरच्या मैदानावर सर्वच्या सर्व सामने जिंकले.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडसाठी टॉम लॅथम हा सध्याचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.त्याने २ सामन्यांमध्ये एकूण १७३ धावा केल्या आहेत.भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक धावा केल्या आहेत.गिलने २ सामन्यांमध्ये १४७ धावा केल्या आहेत.
सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीने २ सामन्यात ५ विकेटस घेऊन अवव्ल क्रमांक पटकावला आहे.बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या.माइक ब्रेसवेल,हा न्यूझीलंडकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.त्याने २ सामन्यांमध्ये ५ विकेटस घेतल्या आहेत.
काल लाहोर येथे दक्षिण आफ्रिकेशी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजानी धुवांधार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाच्या अक्षरशः ठीकऱ्या उडवल्या.त्यांच्या रचिन व विल्यमसन या दोन फलंदाजानी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी केली., या दोघांना रोखण्यात आपले गोलंदाज किती यशस्वी ठरतात,यावर भारताचे यश अवलंबून आहे.

