- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्यात साडेतीन हजार तरुणांना रोजगार मिळणार, कोंटेन्ड्रे सोलर कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील साडेतीन हजार स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत.राज्यातील प्रत्येक गाव खेड्यातील घराघरात सोलर पोहोचवून वीजबिल मुक्त खेडे करण्यासाठी शासनाच्या कार्याला हातभार लावणार असल्याचे कंपनीचे मालक परेश शेठ यांनी सांगितले. तालुक्यातील मुसरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत साडेदहा एकर क्षेत्रात कोंटेन्ड्रे सोलर हा कारखाना उभा राहत असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत aaj सकाळी या सोलर कंपनीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक बाळाराम चौधरी,विधानसभा समन्वयक सचिन पाटील, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील,परेश शेठ,यश शेठ,धर्मेश शेठ,ग्रामपंचायत मुसारणे,ग्रामपंचायत नारेचे सर्व पदाधिकारी,रवींद्र मेने, स्वप्निल…
दिपक मोहिते, लाडकी बहीण योजना ; फुगा लवकरच फुटण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारला राज्यातील ” बहिणी,” अचानक ” लाडक्या,” वाटू लागल्या व त्यांनी खिरापत वाटण्यास सुरुवात केली.आता त्यांचे हे खिरापत वाटणे,अंगलट येऊ लागल्यामुळे ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत नाहीत,त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे सांगत सुटले आहेत.दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत. लाडकी बहीण योजना सुरू राहणार असली तरी ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत,त्यांना या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे.आतापर्यंत अपात्र बहिणींची संख्या ९ लाखाच्या घरात पोहोचली आहे.विधानसभा निवडणूका जिंकल्यानंतर सरकारने लाडक्या बहिणींना १५००/- ऐवजी २१००/- रु.देणार असल्याचे जाहीर आश्वासन दिले होते.पण ते आश्वासन हवेतच विरले.शासनाच्या…
शुभम सावंत विरार, वसई विरार शहर महानगरपालिकेस इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये मानांकन, आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त देशातील १३ किनारी राज्यामध्ये राज्य सरकार/स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने समुद्रकिनारा स्वच्छता उपक्रम/मोहिम २१ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्याचे पर्यावरण व हवामान बदल विभाग,राज्य शासन यांनी निर्देश दिले होते.राष्ट्रीय किनारपट्टी कचरामुक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे,जागतिक महासागर आणि जलमार्गांचे जतन व संरक्षण करण्याबद्दल लोकांमध्ये जागृकता निर्माण करणे,असा हा दिवस साजरा करण्यामागे मुळ उद्देश होता.त्याअनुषंगाने २१ सप्टें.२०२४ रोजी राजोडी बिच,विरार ( पुर्व ) येथे आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिनानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिका व गो-शुन्य प्रा.लि.यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहिम राबवण्यात आली होती. सदर मोहिमे अंतर्गत शहरातील स्वयंसेवक,शाळा, महाविद्यालये,एनसीसी व एनएसएस…
दीपक मोहिते, वृक्ष प्राधिकरण ; करदात्यांची फसवणूक करणारे प्राधिकरण, राज्यातील प्रत्येक महानगरात वृक्ष प्राधिकरण कार्यरत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून या प्राधिकरणाचे काम चालते.मात्र हे प्राधिकरण नक्की काम काय करते ? हा एक संशोधनाचा विषय आहे.आपल्या कार्यक्षेत्रातील वृक्षाचे संवर्धन करणे किंवा वृक्ष कत्तलीला परवानग्या देणे,या दोन महत्वाच्या विषयांपैकी हे प्राधिकरण नक्की कोणत्या विषयावर काम करते,हे त्या त्या भागातील करदात्यांना आजवर कधीच कळले नाही.पण दरवर्षी या महानगरपालिका करदात्यांकडून लाखो रु.चा वृक्ष कर मात्र वसूल करत असते. आपल्याकडून वसूल करण्यात आलेल्या करातून वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे,अशी कामे अपेक्षित असताना हे प्राधिकरण विकासकाच्या बांधकामात अडथळे ठरणारे वृक्ष कापण्यासाठी वारेमाप परवानग्या देत असते.या परवानग्या देताना…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन, जव्हार प्रतिनिधी- पंचायत समिती शिक्षण विभाग,जव्हार यांच्या वतीने के. व्ही. हायस्कूल,जव्हार येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. केंद्रस्तरातून निवड झालेल्या १६ शाळा या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धेच्या आयोजनासाठी गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व विस्तार अधिकारी शिक्षण मनीषा डांगे यांनी विशेष नियोजन केले.बचत गटांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनातर्फे पारितोषिके ठेवण्यात आली होती.सदर स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी विजया टाळकुटे व विस्तार अधिकारी मनीषा डांगे शिक्षक राजेंद्र जोरी व इतर मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. सदर पाककला स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी पंचायत समिती जव्हारचे सहा.प्रशासन अधिकारी व्ही. एस. महाले, तालुका व्यवस्थापक…
सुरेश काटे,तलासरी तलासरी तालुक्यात २७ शेतकऱ्यांना विहिरी मंजुर, आदिवासी शेतकऱ्यांनी शेती उत्पन्नातुन आपला विकास करावा,आपले आर्थिक स्रोत वाढावावे,यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना आपल्या शेतात विहीर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते.या अनुदानातुन विहीर बांधून आपल्या शेतीसाठी पाण्याचे स्रोत निर्माण करणे, असा शासनाचा उद्देश आहे. तलासरी तालुक्यात पंचायत समितीतर्फे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवण्यात येत असून या योजने द्वारे आदिवासी शेतकऱ्याला जो खातेदार आहे,त्याला नवीन सिंचन विहीर बांधणे,विहीर दुरुस्ती करणे,शेततळे अस्तरीकरण इ.कामासाठी अनुदान दिले जाते. नवीन विहिरीसाठी अडीच लाख रु.जुनी विहीर दुरुस्ती साठी रुपये पन्नास हजार रु. शेततळे अस्तरीकरणासाठी कमाल एक लाख रु.इतके अनुदान देण्यात येते. तलासरी पंचायत समितीतर्फे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने…
अनंत भोईर,पालघर ” धरणे-सत्याग्रह,” आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, राज्य सरकारी,निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” धरणे-सत्याग्रह,” आंदोलन करण्यात आले.सकाळी ११.०० ते दु.१.०० या दरम्यान झालेल्या या आंदोलनाला कर्मचारी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला. कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत आणि महत्त्वाच्या मागण्यांसाठी आयोजित या आंदोलनात राज्य गट ड व जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटना सक्रिय सहभागी झाली होती. यावेळी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव किशोर प्रल्हाद पाटील,जिल्हाध्यक्ष कल्पेश कोशिंबे,उपाध्यक्ष राजेंद्र वरठा,महिला संघटक सीमा चौधर,सचिव हर्षद निकुळे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला. तसेच समन्वय समितीचे निमंत्रक डी.डी.पाटील, आरोग्य सेवक संघटनेचे अध्यक्ष बालाजी सातपुते, ठाणे-पालघर शिक्षक…
वसंत भोईर,वाडा, घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर वाजवला बॅन्ड तालुक्यातील घोणसई ग्रामपंचायत हद्दीतील काही कारखानदार हे दोन तीन वर्ष उलटूनही घरपट्टी भरत नाहीत. वारंवार बिले बजावूनही त्याची दखल घेतली जात नाही.मार्च महिना उजाडला तरी अनेक कारखानदार घरपट्टी भरीत नसल्याने आज ग्रामपंचायतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बॅन्ड वाजवून त्यांना जागे करण्याचा अनोखा फंडा वापरला.या अनोख्या फंड्याची चर्चा तालुकाभर होत आहे. घोणसई मेट ग्रामपंचायत हद्दीतील अनेक कारखान्यांच्या घरपट्ट्याची थकबाकी अनेक वर्षापासून आहे.वारंवार बिले बजावूनही अनेक उद्योजक त्या भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.अनेक कारखाने सुस्थितीत चालू असतानाही ते बिले भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.वर्ष अखेर मार्च महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी उद्योजक घरपट्टी भरण्यास टाळाटाळ करीत आहेत.अखेर…
वसंत भोईर,वाडा वनहक्क सहा.व तालुका व्यवस्थापक यांच्या मानधनात वाढ करा, जिल्हा समन्वयक वनहक्क सहाय्यक व तालुका व्यवस्थापक,या कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या कर्मचा-यांच्या मानधनात अवश्यक ती वाढ करण्यात यावी,अशी मागणी पालघरचे खा.डाॅ.हेमंत सवरा यांनी आदिवासी विकासंत्री अशोक ऊईके यांच्याकडे केली आहे. जिल्हा कार्यालय पालघर येथे जिल्हा व्यवस्थापक,जिल्हा रामन्वयक वनहक्क राहाय्यक,तालुका व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत असलेले कर्मचारी हे आदिवासी जनतेकरीता आदिवासी जिल्ह्यात वनहक्क कायद्यांतर्गत वनहक्काबाबतच्या कामासाठी गेली १२ ते १५ वर्षांपासून कार्यरत आहेत.सदर कर्मचाऱ्याची आदिवासी विकास विभाग यांचे अंतर्गत वनहक्काच्या कामासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात नियुक्ती झाली आहे.वनहक्क कायद्यांतर्गत काम करत असताना कामाचे स्वरूप पाहता त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे.तरी या…
सुरेश वैद्य,सफाळे पालघर जिल्हा परिषदेत उद्या एक दिवसीय प्रदर्शन व विक्री, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद पालघर येथे महिला स्वयंसहायता समूह गटांचे एकदिवसीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान ( उमेद ) तर्फे उद्या सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत जिल्हा परिषद इमारतीच्या प्रवेशद्वारावर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आहे आहे. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच जिल्हा परिषदेमध्ये येणाऱ्या अभ्यागतांनी प्रदर्शनाला भेट देऊन महिला बचत गटांकडून उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.महिला गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी…
